Monday 26 May 2014

त्रिपुरा रहस्य: चैतन्य म्हणजे काय ? (भाग ४ था)



त्रिपुरा रहस्य: चैतन्य म्हणजे काय ? (भाग ४ था)
              ब्रह्मराक्षस राजपुत्रास माणसाचे  अत्त्युच्य गुण १२ व्या प्रश्नात विचारतो,
१२)निर्भय कोण?  दुर्दशेपासून मुक्त कोण? गरज मुक्त कोण?”
राजपुत्र उत्तर देतो,
ह्या तीनही गुणांचे मुर्तिमंत उदाहरण म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर होय.
उत्तर :          अनासक्त माणूस निर्भय असतो.
                            स्वातंत्रवीर सावरकरांची फ्रान्सच्या किनाऱ्याजवळ इंग्रजांच्या कैदेतून सुटण्यासाठी जहाजातून समुद्रात मारलेली उडी त्यांची अनासक्त वृत्ती व त्यातून येणारी निर्भयता दर्शविते.
उत्तर :        मनावर सयंम असणारा माणूस दुर्दशेपासून मुक्त असतो.
                            अंदमानातील जेलमध्ये स्वातंत्र्यवीर सावकरांना तेल काढण्याच्या घाण्याला बैलासारखे जुंपले होते. त्यांची खोली फाशीच्या वधस्तंभासमोरील होती. स्वातंत्र्ययुद्धातील सहकाऱ्यांना फाशी देताना पाहून स्वातंत्र्यवीरांना मानसिक यातना व्हाव्यात, हा ब्रिटिश सत्तेचा हेतू.
                            परंतु अतिशय संयमी वृत्तीने त्यांनी ही काळ्या पाण्याची शिक्षा उपभोगली. अंदमान कारागृहातील कैद्यांमध्ये त्यांनी हिंदू मुस्लीम हा भेद दूर केला स्वतः उर्दू शिकले, कुराण शिकले. इंग्रजी सत्तेच्या प्रचंड जुलमातही त्यांनी कैद्यांचे मनोधैर्य खच्ची हो वू दिले नाही अट्टल गुन्हेगारांना सन्मार्गाला आणले. एवढेच काय स्वातंत्र्यवीर सावरकरांवर अन्याय करणारे इंग्रजी अधिकारीही स्वातंत्रवीरांना मानू लागले, त्यांचा आदर करायला लागले.
उत्तर :    स्वतःला ओळखणारा माणूस कधीच गरजू नसतो.
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी काळ्या पाण्याच्या शिक्षेसाठी अंदमान तुरुंगात प्रवेश केल्यावर तेथील आयरीश तुरुंगाधिकाऱ्यानेबारी साहेबाने त्यांना विचारले, “सावरकर तुम्हाला माहित आहे का? आता ५० वर्षे तुमची इथून सुटका नाही.”
                           सर्वसामान्य माणूस ५०वर्षे गजाआड ह्या कल्पनेने ठेपाळला असता परंतू त्यांचे उत्तर हे त्यांच्या स्वतःवरच्या स्वतः हाती घेतलेल्या स्वातंत्र्यलढ्याच्या पवित्र कामावरील विश्वासाचे प्रतिक दिसते.
                      ज्या निर्दयी अधिकाऱ्याच्या हातात स्वतःचे आयुष्य कंढायचे आहे, त्याला सावरकर सांगतात तुमची इंग्रजी सत्ता ५०वर्षे आमच्या देशात रहाणार आहे काहे खरोखरच गरजमुक्ततेचे उदाहरण म्हणावयास पाहिजे
--------------------------------------------------------------- 
ब्रह्मराक्षस राजपुत्रास १३व्या प्रश्नात एकाच व्यक्तीत देह आहे व नाही ही संकल्पना विचारतो,
13) अशी व्यक्ती कोण जी देहाने दिसते पण ती देहरहित असते.
        निष्क्रीय क्रिया म्हणजे नक्की काय?”
राजपुत्र उत्तर देतो,
      “ जीवनमुक्त व्यक्ती दिसते परंतू ती देहरहित असते.
         त्याच्या क्रिया हीच निष्क्रीय क्रिया होय.” ह्यालाच भगवद् गीतेत निष्काम कर्मयोग म्हटलेले आहे.

जीवनमुक्त, निष्काम कर्मयोगी व्यक्ती आदरणीय बाबा आमटे यांच्या रुपात आपण पाहिलेली आहे.
                         बाबा आमटे व त्यांच्या पत्नी साधनाताई आमटे यांनी कुष्ठरोग्यांच्या सेवेमध्ये आपले देह आयुष्य झोकून दिले. ह्यातून त्यांनी आपली प्रसिद्धी, मानमरातब किंवा सरकार दरबारी आपली नोट वटावी, ही अपेक्षा बाळगली नाही. ह्यातूनच त्यांचे निष्क्रिय व्रत दिसून येते. त्यांच्या पुढील पिढीनेही हे असितधारा व्रत स्विकारलेले दिसत आहे.
--------------------------------------------------------------- 
ब्रह्मराक्षस राजपुत्रास सांगतो,
शेवटच्या प्रश्नाचे उत्तर दे आणि तुझ्या भावाला घेऊन जा.”
14)ह्या जगात सत्य काय आहे? आभासी काय आहे ?
      आणि अनुचित कशाला म्हणायचे ?”
राजपुत्र उत्तर देतो,
        आत्मा सत्य आहे. आत्माविरहीत सर्व गोष्टी ह्या आभासी आहेत.
        सांसारीक व्यवहार हे अनुचित आहेत.”
---------------------------------------------------------------
                         अशाप्रकारे राजपुत्राने सर्व प्रश्नांची उत्तरे दिल्यावर ब्रह्मराक्षसाने त्याच्या भावाला आनंदाने सोडून दिले. त्या ब्रह्मराक्षसाच्या जागी एक तेजपुंज ब्राह्मण राजपुत्रासमोर उभा राहिला. ह्या ब्राह्मणाला पाहिल्यावर दोन्ही राजपुत्रांनी त्या ब्राह्मणाला  आश्चर्याने विचारले, “आपण कोण?”
                   ब्राह्मणाने सांगितले मी मूळचा मगध देशातला, माझे नाव वसूमनमी खूप शास्त्र शिकलेला व वाद विवादात निपूण असा ब्राह्मण होतो. मला स्वतःविषयी खूप अभिमान होता. एकदा राजाने आमच्या देशात सर्व विद्वान शास्त्री लोकांची सभा घेतली  ह्या सभेला अष्टक नावाचा थोर संत, अत्यंत हुशार व ज्ञानी माणूस आलेला होता
                         मी स्वतः वाद विवादपटू असल्याने मी त्याच्याशी आपण स्वतः कसे परिपूर्ण असतो ? म्हणून जोरजोरात वाद घातला. त्याने त्याचे म्हणणे पवित्र अशी शास्त्र वचने सांगून मला पटवून देण्याचा प्रयत्न केला. मला सभा जिंकायची होती, त्यामुळे मी माझेच म्हणणे जोरदार मांडत राहिलो. मी माझे म्हणणे सुधारत नाही हे पाहून तो शांत राहिला. परंतू माझ्या उद्धटपणाने त्याचा एक कश्यप गोत्री शिष्य संतापला. त्याने मला राजासमोर शाप दिला, “अरे मूर्ख ब्राह्मणा, माझ्या गुरुंचे म्हणणे समजावून न घेता, तू त्यांच्याशी वाद घालण्याची हिंमत कशी केलीस? तू ह्या क्षणापासून ब्रह्मराक्षस बनून जगशील.”  मी घाबरलो आणि त्या संत अष्टकाचे पाय धरले. तो आत्मज्ञानी असल्याने त्याने आपल्या शिष्याच्या शापावरील उःशाप दिला. त्याला माझी दया येऊन तो म्हणाला आताच्या तुझ्या वाद विवादात मी तुला तुझ्या प्रश्नांची दिलेली उत्तरे तुला एखाद्या आत्मज्ञानी व्यक्तीकडून परत मिळतील. आत्ता वादाच्या नादात तू त्या उत्तरांकडे दुर्लक्ष केलेपरंतू हा आत्मज्ञानी माणूस तुझे योग्य उत्तरांद्वारे समाधान करेल, तेव्हा तू शापमुक्त होशील. राजपुत्रा तू माझ्या प्रश्नांची उत्तरे देऊन मला शापमुक्त केलेस व मला परत जीवन दान दिलेस.
                     ब्रह्मराक्षसाचा परत वसूमन ब्राह्मण होणे हा दत्तगुरुंच्या विषय सोपा करुन सांगण्यासाठी केलेला ल्पनाविलास आहे. येथे कोणतीही मनाला न पटणारी अद् भूतता दिसून येत नाही.
                      ब्रह्मराक्षसाचे रुपांतर झालेला वसूमन ब्राह्मण राजपुत्रास विचारतो, तू एवढा मोठा ज्ञानी माणूस असून शिकारीला कसा जातोस? काम आणि शहाणपणा ह्या दोन्ही विरुद्ध गोष्टी आपण मानतो.”
                            राजपुत्र शहाणपणाची जरुरी स्पष्ट करण्यासाठी आकाशाचे उदाहरण देतो. अज्ञानी माणसाला आकाशापलिकडचे रंगहीन अवकाश माहीत नसते, तो आकाशाचा रंग निळा आहे सांगतो. ज्ञानी माणसाला रंगहीन अवकाश माहीत असले तरी तो मनात कोणताही संभ्रम न ठेवता आकाशाचा रंग निळा आहे सांगतो. त्यामुळे तुमच्याकडे असणारे हे अवकाशाचे शहाणपण तुमच्या कामात व अज्ञानी माणसाच्या कामात फरक करीत नाही. तुमच्याकडे असलेले अवकाशाचे ज्ञान जरुर पडली तर कामात मदत करु शकते, परंतू काम केल्याने शहाणपण निरुपयोगी होत नाही.
                        शहाणपण हे शाश्वत व नैसर्गिक आहे ते कामाच्या विरुद्ध कसे असेल? काम जर शहाणपणास निरूपयोगी करत असेल तर शहाणपण व स्वप्न ह्यांच्यात फरक काय राहिला ?
                    ज्ञानी माणसाचे काम हे आरशासारखे स्वच्छ असते. ज्ञानी माणसाकडे खरे ज्ञान असते, त्यामुळे तो बिनचूक निष्कर्ष काढतो. अज्ञानी माणसाच्या संकल्पना अस्पष्ट असतात त्याचे निष्कर्ष पूर्वग्रहदूषित असतात.
                       पूर्ण अज्ञानी माणसाची चुकीची माहिती सुधारता येते.
ह्याचाच अर्थ   त्या कोऱ्या पाटीवर लिहिता येते.
परंतू चूकीने मिळविलेली माहिती सहजासहजी सुधारता येत नाही.
तुकाराम महाराज म्हणतात,
नाही मन निर्मळ काय करील साबण
हेच खरे.
                      वसूमन ब्राह्मणाचे समाधान होते तो व दोघे राजपुत्र एकमेकांना नमस्कार करुन आपा आपल्या घरी जातात श्रीदत्तगुरुंची गोष्ट जीवनाची मुलभूत तत्वे सांगून संपते.
समाप्त

॥श्रीगुरुदेव दत्त॥

No comments:

Post a Comment