Friday 4 July 2014

भारतीय रेल्वे प्रवासी - हाल हवाला (?)

झुकू झुकू आगीन गाडी । तात्काळ तिकीटाच्या रेषा हवेत सोडी॥
पळती वेटिंग लिस्ट थांबवूया । स्वस्ताईच्या गावाला जाऊया॥
                                भारताची जीवन वाहिनी असलेली भारतीय रेल्वेचे जाळे अरुणाचल प्रदेशात लवकर पसरणे, ही काळाची व तेथील नागरिकांची गरज आहे. आजही अरुणाचल प्रदेशात जाड दोर होडीस बांधून ब्रह्मपुत्रेचा प्रवाह तेथील बांधव पार करतात. जर हा दोर तुटला तर बंगालच्या उपसागरात जलसमाधी (?)  एवढी भयावह अवस्था !
               नकाशात अरुणाचल प्रदेश चीनने गिळंकृत केला म्हणून आपण फक्त वर्षानुवर्षे निषेध करतो. “नकाशा म्हणजे गाव आहे पण माणसे नाहीत, नदी आहे पण पाणी नाही असे कागदावरील चित्र. ह्या चित्रावर स्वामित्व इंग्रज साहेबासारखे अरुणाचल प्रदेशात भारतीय रेल्वे जाळे सर्वदूर विणून मिळविता
येईल. त्यामुळे तेथील भागातील दळणवळण वाढून आर्थिक विकास होईल व भारताला  आपल्या सैन्यासहित पाय रोवून सीमावर्ती भागात उभे रहाता येईल. ह्यासाठी तेथील निसर्गाला धक्का
पोहचू न  देता भगीरथ प्रयत्नजरुर करावे लागतील.
                         रेल्वेच्या नवनवीन प्रक्लपांसाठी  लागणारा निधी दरवाढ करुन प्रवाशांच्या खिशातून घेण्यापेक्षा, सर्व धार्मिक स्थांनांमध्ये देणगी रुपाने येणारा अलोट पैसा, सोने, चांदी यांचा विनियोग केल्यास तो उपयुक्त होऊ शकतो.
                           ह्या भक्तांच्या देणग्यांमधून पेट्रोल, डिझेल, गॅस इत्यादी इंधने खरेदी केल्यास मालवहातूक खर्च कमी होऊन
महागाई आवाक्यात येईल व पगारवाढीची सतत मलमपट्टी करावी लागणार नाही.
                       वास्तविक रेल्वेला प्रवाशांकडून रोजचा ताजा पैसा मिळतो. परंतू तिकीट विक्रीच्या घोटाळ्यांमुळे प्रवासी व रेल्वेची तिजोरी ह्या दोघांनाही घाटा येतो. नुकताच कोकण बांधवांना ह्या वर्षीच्या गणपतीसाठी तिकीट खिडकीवर पहिला क्रमांक असूनही  वेटिंग लिस्ट क्रमांक ३०० ऐकावा लागला. ह्या ३०० नंबरच्या आधीची सर्व तिकीटे आसाम, बंगालमधून बुकींग (?) झाल्याची बातमी वर्तमानपत्रात झळकली.
ही सर्व रेल्वे तिकीटांची दूरावस्था घालविण्यासाठी :-
भारतीय रेल्वेचे तिकीट वाटप सुलभ:-
)तात्काळ तिकीट विक्री फक्त प्रवास करणाऱ्या प्रवाशांपूरती मर्यादित ठेवावी.
)ऑन लाइन तिकीट विक्री सेवा गाडी सुटण्यापूर्वी, २ दिवस आधी संपूर्ण दिवस उपलब्ध ठेवावी. ह्यामुळे तात्काळ तिकीट
विक्रीच्या  ऑन लाइन कालावधीत (२ तास) नेट मॅनुप्युलेट करण्याच्या गैरप्रकारांना आळा बसू शकेल.
)गाडी सुटण्याच्या एक दिवस आधी तिकीट खिडकीवर तात्काळ तिकीटांची विक्री संपूर्ण दिवसभर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना उपलब्ध असावी.
)रेल्वे तिकीटावर प्रत्येक प्रवाशाची ओळख  (पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसेन्स, इत्यादी) माहिती देणे बंधनकारक केल्यास नियमित व तात्काळ तिकीटांची बोगस विक्री होण्यास आळा बसू शकेल.
               तात्काळ तिकीटे रेल्वेची कनेक्टिव्हिटी न मिळाल्याने दोन मिनिटांत वेटिंगमध्ये जातात. हा प्रचंड मोठा तात्काळ घोटाळा सदैव अनुभवयास येतो. ह्या घोटाळ्यामुळे लोक टॅक्सी, बस, विमान ह्या इतर साधनांचा आसरा घेताना दिसतात. रेल्वेच्या
साइटवर वेटिंगलिस्टची स्थिती दिसते, परंतु प्रत्यक्षात रेल्वेत बर्थ रिकामे दिसतात.
                  ह्याचाच अर्थ रेल्वेचे तिकिट तात्काळ मिळणे दुरापास्त असल्याने लोक ह्या देशाच्या जीवन वाहिनीस बायपास करतात, रेल्वेचे उत्पन्न बुडते. त्याचा परिणाम तिकीटांच्या दरवाढीत होतो
                 तिकीट विक्रीचे सुलभीकरण  केल्यास रेल्वेचे उत्पन्न वाढेल व रेल्वेचा चक्का दरवाढ न करता व्यवस्थित फिरू शकेल.
रेल्वे प्रशासनाने तिकीट- अतिरेक्यांचा त्वरित बंदोबस्त करावा, ही विनंति.’

॥ श्रीगुरुदेवदत्त॥

No comments:

Post a Comment