Sunday 23 July 2017

मायबोलीचे भुक्कड ६

३ कीर्ती कठीयाचा दृष्टान्त
 म्हाइंभट (तेरावे शतक) :  मराठीतील पहिले चरित्रकार महानुभाव पंथाचे प्रवर्तकमहात्मा चक्रधरांचे निष्ठावान अनुयायीचक्रधरांच्या उत्तरापंथ प्रयाणानंतर नागदेवाचार्यांच्या सहकार्याने अनुयायांकडून चक्रधरांच्या आठवणींचे परिश्रमपूर्वक संकलन करून ‘लीळाचरित्र’ हा मराठीतील पहिला चरित्रग्रंथ लिहिलानंतर ‘गोविंदप्रभूचरित्रही लिहिलेमहानुभाव पंथाचे तत्वज्ञानतत्कालीन सामाजिक-सांस्कृतिक परिस्थितीभाषा व समाजजीवन यांच्या अभ्यासाच्या दृष्टीने ‘लीळाचरित्र’ हा अत्यंत महत्वाचा ग्रंथ आहे.
               कोणताही जीव विकारापासून वेगळा राहत नाहीहे स्पष्ट करण्यासाठी प्रस्तुत लीळेत चक्रधर स्वामींनी ‘कीर्ती कठीयाचा दृष्टान्त’ सांगितलेला आहेकोणत्याही कार्याचा आणि व्रतस्थपणाचा अहंकार बाळगणे हा सुद्धा विकारच आहे हेप्रस्तुत लीळेतून पटवून दिले आहे.
---------------------------------------------------------------------------------
              डोमग्रामी गोसावीयांचा ठायी उद्याचे मातीकाम होत होतेः ते सी बाजत होतेः तेणे भक्तीजनासी व्यापार होववे नाः आन भट व्यापार करु लागले नाथोबाय म्हणीतलें:  नागदेयाः तू कैसा काही हिंवसी ना तवं भटी म्हणीतलें:  आम्ही वैरागीः काइसीया हिवुः यावर सर्वज्ञे म्हणीतलें: वानरेयाः पोरा जीवासी वैराग्य मिरवु आवडेः हाही एकू विकारुचि कीं गाः यावरि भटी म्हणीतलें: जी जीः निर्विकार तो कवणः सर्वज्ञें म्हणीतलें वानरेयाः पोर जीव वीकारावेगळा केव्हळाही जालाचि नाहीः मा तु काई वेगळा अससिः हो कां जीः यावरि गोसावी कीर्ती कठीयाचा दृष्टान्त निरोपिलाः कव्हणी एकू कठीया असे भोगस्थानाची सुश्रुषा करीः झाडीः सडा संमार्जन करीः ते देखौनि गावीचे म्हणतिः कठीये नीके करीत असा बरवे करीत असाः ते आईकौनि दीसवडीचा दीसवडी हात हात चढवीः तयासि देवता आपुले फळ नेदीः तयासि कीर्तीचेचि फळ झालेः
लीळाचरित्र उत्तरार्ध : एकांक लीळा क्र. १२०
संपादक प्रा. पुरुषोत्तम नागपुरे
शब्दार्थ :-
ग्राम =गाव
ठायी = समोर
द्या = सकाळी
ते= तेव्हा
सी = थंडी
तेणे =त्यामुळे
व्यापार = काम
आन = आणि / परंतु
वैरागी = तपश्चर्या करणारे
काइसीया = कशाला
वानरेया = माकडा
सर्वज्ञ = स्वामी
गा = अहो
कव्हणी= कोणी
सुश्रुषा =  सेवा
कठीया = मंदिराचा पुजारी
निका= चांगला
बरवा = सुंदर
भोगस्थान =दैवतस्थान
दीसवडीचा दीसवडी= रोजच्या रोज
हात हात चढवीः = काम वाढवू लागला
नेदणे = न देणे

भाषांतर :-
         डोमगावी स्वामींच्या समोर सकाळच्या वेळी मातीकाम (बागकाम वगैरे) होत होते. तेव्हा थंडी वाजत होती, त्यामुळे भक्तजनांना काम करता येत नव्हते. परंतु भट (नागदेवाचार्य) काम करत होते. नागोबाए (भक्ताचे नाव),” नागदेवा, तुला थंडी कशी वाजत नाही ? (तुला थंडी वाजत नाही का?) तेव्हा नागदेवाचार्य म्हणाले, “आम्ही तपश्चर्या करणारे, आम्हाला थंडी कशी वाजेल?”  यावर स्वामी म्हणाले, “भटो, वानरेया (कौतुकाने माकडा) स्वतंत्र जीवाला वैराग्य मिरवायला आवडते. अहो, हा सुद्धा एक विकारच आहे.” यावर भट नागदेवाचार्य म्हणाले, “जी जी (स्वामी स्वामी) असा कोण आहे ? ज्याला विकारच नाही.” स्वामी म्हणाले, “भटा, वानरेया (कौतुकाने माकडा) स्वतंत्र जीव हा विकारापासून वेगळा नाही मग तू काय वेगळा आहेस ? “ “हो का?” असे भट म्हणाले. यावर स्वामींनी प्रसिद्धी हवी असणाऱ्या मंदिराच्या पुजाऱ्याचा दृष्टान्त सांगितला. कोणी (कोणी  एके काळी) एक पुजारी होता. तो दैवतस्थानाची (देवतेची) सेवा करी, झाडी (मंदिर झाडायचा), सडा रांगोळी करायचा. ते बघून गावातले म्हणायचे, “पुजारी चांगले काम करीत आहे. सुंदर करीत आहे.” हे ऐकून रोजच्या रोज तो पुजारी काम वाढवू लागला. त्याला (पुजाऱ्याला) देवता आपुले फळ देत नाही. कीर्ती हेच त्याचे फळ झाले.
{ तात्पर्य :- लोकांनी वाहवा केल्यामुळे, मंदिराच्या पुजाऱ्याने आपले काम वाढविले. पूजा करण्यामागचा मुख्य हेतू (मोक्ष मिळविण्याचा)बाजूला राहिला. लोकांनी केलेली वाहवा वाढत गेली म्हणजे पुजाऱ्याला फक्त कीर्ती - प्रसिद्धी मिळत गेली.}
स्वाध्या : -
प्रश्न १ कोणांस उद्देशून म्हटले आहे ते लिहा
१ वानरेया - नागदेवाचार्य
२ सर्वज्ञ - स्वामी
३ गोसावी - स्वामी
प्रश्न २ आकृती पूर्ण करा
स्तुतीप्रिय
कठीयाची जाणवलेली स्वभाव वैशिष्ट्ये
मोक्ष मार्गाचे (ज्ञानमार्गाचे)   
प्रश्न ३  : प्रस्तुत दृष्टान्तातील उपदेश तुमच्या शब्दांत सांगा
प्रसिद्धीच्या हव्यासापोटी कोणतेही काम करु नये.
प्रश्न ४ : पुढील शब्दांना प्रमाणभाषेतील शब्द सांगा
कठीया = पुजारी
सी = थंडी
काइसीया = कशाला
कव्हणी = कोणी
                  इयत्ता ९वीच्या पाठ्य पुस्तकातील धड्याचे भाषांतर, महानुभावपंथीय गुरु आदरणीय डोळसकर बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली, श्री. अमोल गेटे (मराठी साहित्याचे गाढे अभ्यासाक) ह्यांनी करुन दिले. श्री. डोळसकर बाबांना दंडवत तसेच श्री. अमोल गुटेसाहेबांना  मनःपूर्वक  धन्यवाद.
                   तेराव्या शतकातील चक्रधर स्वामींचे लीळा चरित्र हा मराठी भाषेतील आद्य चरित्र ग्रंथलीळाचरित्र, ज्ञानेश्वरी, श्रीगुरुचरित्र, तुकाराम गाथा, दासबोध अशा अनेक प्राचीन ग्रंथातील ग्रंथभांडार शालेय शिक्षणात समाविष्ट करताना, कठीण शब्दांचे शब्दार्थ धड्याखाली दिल्यास, शिक्षकांना तसेच विद्यार्थ्यांना समजणे सोपे होईल.
                      मराठी साहित्याच्या ग्रंथ भांडार तसेच इतिहासातील शिवशाही त्याच्या मूळ अर्थासकट- उद्देशांसकट नवीन पिढीपर्यंत पोहोचणे गरजेचे आहेशिवशाहीचे स्वप्न साकारण्याकरिता, सांगावेसे (भुक्कड*)वाटते,
शिकण्या येतील लेक बालके
तीच लेकरे जाण सखे
जरीपटक्याचे दिवस आणण्या जगी
तयाची आण मायबोलीच्या मुखे

समाप्त
अनुप्रभा, नाशिक

संदर्भ:-
कविवर्य बा. . बोरकर यांच्याकांचनसंध्याकवितेतील  शेवटचे (६वे) कडवे
शिणुनी येती गुरें-पाखरें 
तीच लेकरें जाण सखे,

दिवस जरेचे आले जरी 
त्या काठ जरीचा लावू सुखें...!

* भुक्कड = निरुद्योगी बुभुक्षित (भुकेला हपापलेला गरजू )

॥ जय श्री गुरुदेवदत्त॥

Sunday 9 July 2017

मायबोलीचे भुक्कड (५) : घंटा वाजे घणघणा

घंटानाद देई स्मृतीस उजाळा
खुणावते मनी मज मम शाळा
सक्षमतेचे गिरविले इथे धडे
शाळा आमुची आम्हा आवडे
                         शालेय शिक्षणाने मिळालेली सक्षमता कुठे तरी कमी पडत आहे का? गंगा सफाईसाठी भारतीय पंतप्रधानांना इस्त्रायलसारख्या वाळवंटातील चिमुकल्या देशाची मदत घ्यावी लागत आहे. गंगा, गोदा, ब्रह्मपुत्र, सिंधू, यमुना, कावेरी, कृष्णा अशा महान नद्यांनी सुजलाम असलेल्या देशात स्वतःचे तंत्रज्ञ शास्त्रज्ञ हे स्वच्छता अभियान पेलू शकत नाहीत का? समुद्राच्या खाऱ्या पाण्यापासून पिण्यायोग्य गोड पाणी बनविण्याचे इस्त्रायलयचे संशोधन अभिनंदनीय असले तरी व्यावाहारिक आहे का? भारतीय उपखंडावर मान्सून पावसाचा जन्म भारतीय उपखंडाला वेढणाऱ्या अरबी समुद्र, हिंदी महासागर, बंगालचा उपसागर ह्या त्रिसमुद्रांनी होतो तर हिमालय पर्वत परतीच्या मान्सून पावसाची कृपा करतो.
                     समुद्राचे पाणी पिण्यासाठी वापरणे किंवा समुद्रात शिव स्मारक बनविणे म्हणजे आपणच ह्या सुजलाम् सुफलाम् देशाचे वाळवंटात रुपांतर करणे होईल का ? तसेच समुद्रातील मत्स्य मगर वगैरे जलसृष्टीने व त्यावर जीवन जगणाऱ्या कोळीबांधवांनी कुठे जायचे?
                            इस्त्रायलने वाळवंटात नंदनवन निर्माण केले तर आपल्या देशाची वाळवंटाकडे नेणारी घोडदौड का होत आहे ?
                             २१व्या शतकातील इंग्रजाळलेल्या शिक्षणातून झालेली देशाची दुरावस्था पाहिल्यावर, २०व्या शतकातील मराठी भाषिक शाळांची उणीव प्रकर्षाने जाणवते. बालपणीच्या शाळेची घंटा आजही मनाला साद घालते.
 घंटेला सांगावेसे वाटते,
                       घण   घण  घंटा   वाजली  आणि  घटें,  मला  तुझ्या  आगमनाची  चाहूल लागलीतुझे  आगमन  किती  सुखद  वाटते  सांगू !  
तुझा  मधूर  आवाज  आसंमतात  घुमतो. ‘परमेश्वर  हा  नादब्रह्मात  असतो’,  असे  म्हणतात. तो  दृश्य  स्वरुपात  दिसत  नाही पण  तुझ्या  आवाजात  त्याचे  अस्तित्व  जाणवते. घंटेतुझे  मानवी  जीवनात  स्थान  जाणवते. कोणत्याही  पूजेची  तयारी  तुझ्याशिवाय  पूर्ण  होत  नाही. पूजा  संपल्यावरतुझ्या  तालावर  आरती  म्हटली  जातेदेवाची  भक्ती  संगितातून   व्यक्त होते. आरती  तालासुरात  म्हणण्यास  इतर  वाद्यांची  साथ  आवश्यक  असतेपण  तू  नसलीस  तर  त्या  आरतीत  ताल - सूर  हरवल्यासारखा  वाटतोघरातील  देवघरात  घंटीतुझे  आस्तित्व  प्रामुख्याने  आढळते .
                              स्थल - काल  परिस्थितीनुसार  तुझ्या  आकारात  बदल  झालेले  असतील. लहान  घंटा, ध्य  घंटामोठी  घंटास्टीलची  घंटातांब्या-पितळेची  घंटाचांदीची  घंटासोन्याची  घंटा  असे  बदल  आढळतीलपण  मूळ  गाभा  असतोतुझा  कर्णमधूर  आवाज.
                             कोणत्याही  देवळात  मूर्तीची  पूजा  सकाळ -संध्याकाळ  होत  असते    शेवटी  आरती    प्रसाद  असतोआरतीची  घंटा  ऐकल्यावरभाविकांना  धन्य  वाटतेमनात  म्हणतात, “चलादेवाची आरती  तरी  मिळाली”, ही  एक  श्रद्धाभावना  असते. जीवनात  श्रद्धा  असणे  फार  महत्वाचे  असते.
                            घंटेगौरी  आणि  गणपतीचे  आगमन  व विसर्जन  तुझ्याशिवाय  होऊच शकत  नाहीगौरी  गणपतीचे  आगमन  तुझ्या  सहवासात  मोठे  आनंदाने  होते. विसर्जनाच्यावेळी  तू  घण - घण  आवाज  करत  त्यांच्याबरोबर   जातेसत्या  आवाजात  निरोपाची  भावना  असते तसेच    पुढल्या  वर्षी  लवकर  येण्याचे  आश्वासन  असतेतू  भक्तांच्या  भावना  जाणून  घेतेस.
                           इतिहासात  तुला  किती  मानाचे  स्थान  आहे  म्हणून  सांगू! तू  पराक्रमाचे  प्रतिक  आहेसतुला  तर  माहिती  आहेचिमाजीप्पा  या  शूर  वीराने  वसईच्या  लढ्यातून  तुला  सुरक्षित  आणूननाशिकला  नारोशंकराच्या  मंदिरात  ऊंच  जागी बसवली  आहे. तू  शौर्याचे  प्रतिक  आहेसऊंचावर  बसून  तू  समाजाला  क्षात्रतेजाचे  महत्व  सांगत  तू  अहोरात्र  उभी  आहेसस्वातंत्र्य  टिकवायचे  असेल  तर  क्षात्रतेज  प्रज्वलित  झाले  पाहिजेहा महान  संदेश  तू  अखंड  देत  आहेसदेश  सबल  व्हावयास  पाहिजेदुर्बलांच्या  शब्दाना  काहीही  किंमत  नसते. हेच  तुझ्या  जीवनाचे  ध्येय  आहेतू  बोलत  नाहीस  पण  आवाजातून  जीवनाचा  मंत्र  देत  आहेस.
                            घंटेतुझी  महती  किती  सांगू ! तू  जगाला  जागृतीची  जाणीव  करून  देतेस.   तू  जणू  म्हणते  आहेस,  “डोळे  उघडून  पहासांगायचे  काय काय ?” तू  देवळात  जाऊन  बसलीस  पण  तुझा  सर्वत्र  संचार  मला दिसतो. तू  शैक्षणिक  क्षेत्रातही  प्रवेश केलास. घंटा   वाजली  की  मनाला  ह्या  ठिकाणी  जवळपास  मंदिर  किंवा  चर्च  आहेह्याची  जाणीव  होतेआपोआप  भाविकांची  पाऊले  त्या  बाजूला   वळतात. तसेच  घंटा  वाजली  कीशाळेची  जाणीव  होतेअर्थात  ह्या  दोन  घंटामध्ये  बारीक  फरक  जाणवतोशेवटी  तीच  तू  असते.
                          शाळा  सुरू  होताना, घंटा  वाजतेपाटी  दप्तर  घेतलेली    बालकेआनंदाने  शाळेत  प्रवेश  करतातउत्साही  वातावरण  असतेप्रार्थना  निरनिराळे  विषय- मराठीइंग्लिशहिंदीसंस्कृत, इतिहासभूगोलनागरिकशास्त्रसायन्स  जीवनावश्यक  विषय    इतकेच  काय  कलाविषय जे  मानवी  जीवनाला  समृद्ध  करतातसंगित, चित्रकला, पाककला  वगैरे    शेवटी   खेळाचा  तास   जो  सर्वांचा  आवडता  विषय.ह्या  सर्वाची  सुरुवात  घंटे तुझ्या  आवाजाने  होते     समाप्तीही  तुझ्या  निरोपाच्या  घंटेने  होतेपाटी दप्तर  घेतलेली  मुलेआनंदात  घराकडे  धूम  पळताततुझे  एकंदर अस्तित्वच  चैतन्यपूर्ण  असते
                               काळाप्रमाणे  तुझे  रुप  बदललेतू दुचाकीवरसायकलवर  जाऊन  बसलीससायकलची  घंटी  वाजली  की, तुला  रस्त्यावर  सायकल  चालवावयास  अडथळा होत  नाहीदेशाच्या  स्वच्छता  अभियानात  तू  प्रवेश  केलास. गावाची  स्वच्छता  करण्यासाठी   कचरापटी  गोळा  करण्यासाठी  तू  घंटागाडीत  जाऊन  बसलीस  पण  काहीवेळा  तू गैरहजर  का रहातेस ? मला  कारण  काही  समजत  नाही ?
                               हळू   हळू  तुझे  स्थलांतर  निरनिराळ्या  ठिकाणी  दिसू  लागलेतू स्कूटर, मोटारसायकल, रिक्षा  तसेच  कारमध्ये  जाऊन  बसलीसवेगवान  जगात  तू  मागे  राहिली  नाहीस. तुझे  नाव  तेवढे  बदललेलोक  तुला  हॉर्न  म्हणू  लागलेतू  जमिनीवरच  काय  तुला  पाण्यातही  जीवनकार्य  करावयाचे  होतेतू  जहाजावर  ‘भोंगाह्या  स्वरुपात  बसलीस
                             बदलत्या  काळाप्रमाणे  तू  विद्युत  उपकरणात  प्रवेश  केलास. घड्याळात  ‘गजर’  हे  नाव  धारण  केलेसजीवनात  धड्याळ  फार  आवश्यक  आहे. दिवसाची  सुरुवात  घड्याळ व त्याचा  गजर  ह्यांच्या 
तालावर  होते
                             घंटेतुझे  जीवनकार्य    किती  मोठे  आहे  म्हणून  सांगूपण  तुला  त्याची  जाणीव  आहे  का नाही  मला  माहित  नाही. तुझी  महती  वर्णन  करण्यास  माझ्याजवळ  शब्द  अपूरे  पडतात.
                          जीवाचे  जीवनकार्य  संपल्यावर  त्या  जीवाला  निरोप  देण्याची  वेळ  आल्यावरमृत्यूची  घंटा  वाजतेअसे  म्हणतातजीवन  हे  क्षणभंगूर  आहेजीवनात  सत्कर्म  करावगैरे  तत्वज्ञान भारतीय  संस्कृती  सांगते
                     ही   मृत्यूची  घंटा  केव्हा  वाजतेत्याची  जाणीव  त्या   जीवाला  नसतेत्यावेळी  तू  फारच  अदृश्य  स्वरुपात  असतेसकोणालाच  दिसत  नाहीस. तुला  निश्चित  माहित  असतेआत्मा  अमर  आहे.  ‘पुनरपि  जननं  पुनरपि  मरणम्’  त्यामुळे  तुझे  कार्य  अमर  आहे.
                      प्रसिद्ध भौतिक शास्त्रज्ञ स्टिफन हॉकिंग्ज ह्यांनी प्रदुषणामुळे मानव जात नष्ट होण्याचा इशारा दिलेला आहे. जलतज्ज्ञ श्री.राजेंद्रसिंहजींनी गोदावरीस सिमेंटच्या विळख्यापासून वाचवा, अन्यथा गोदा प्रलयाची शक्यता वर्तवलेली आहे. ह्या सर्व धोक्याच्या घंटाचा नाद समजण्यासाठी, ह्या मातीतल्या  मायबोलीतून शिक्षणाची गरज सांगताना म्हणावेसे वाटते,
                         ‘ हे कर्मयोगिनी घंटे, परत एकदा आपल्या माय मराठी शाळांमधून तुझा आवाज दिमाखात ऐकू येऊ दे. मायबोलीच्या तीर्थक्षेत्री घडणारी गणित शास्त्र - इंग्रजी ह्या विषयांची त्रिस्थळ यात्रा (भुक्कड ५) *        
हीच आपुली तीर्थत्रिस्थळी
वाहील आपुल्या जळी-मूळी
असू दे तिथे घंटेचा हिंदोला
मिळविण्या महासत्तेच्या माला
अनुप्रभा, नाशिक
॥ जय  श्री  गुरुदेवदत्त ॥
* संदर्भ:-
कविवर्य बा. . बोरकर यांच्याकांचनसंध्याकवितेतील  पाचवे  कडवे
 इथेच अपुली तीर्थत्रिस्थळी
वाहे अपुल्या मुळी तळी
असू तिथे सखिओला वट मी
आणिक तू तर देव तळी
* भुक्कड = निरुद्योगी, बुभुक्षित (भुकेला हपापलेला गरजू )
  हिंदोल = गायनातील एक राग