Sunday 10 December 2017

अतिथी देवो भव।


{सत्य घटनेवर आधारित कथा}

                                     त्यादिवशी भोसला मिलिटरी स्कूलमध्ये उत्साहाचे वातावरण होते. शाळेतील विद्यार्थीवर्ग, ध्यापक वर्ग, कर्मचारी वर्ग सर्वजण कामात दंग होते. धूनमधून मुख्याध्यापकांची फेरी होत होती व ते सूचना देत होते. कोणी शाळेची स्वच्छता करण्यात दंग होते, तर कोणी वर्ग सजावटीत दंग होते. ध्यापक वर्ग मुलांच्या कामावर लक्ष ठेवून बोर्डवर सुविचार, सुभाषिते विद्यार्थ्यांकडून लिहून घेत होते. कर्मचारीवर्ग घोडे व घोड्याची पागा, कवायतीचे ग्राऊंड, मेसची जागा, शुटींगचे ग्राऊंड स्वच्छ करण्यात गढला होता.

                  उद्या ब्रिटीश अधिकाऱ्याची शाळेला अचानक भेट होणार होती. ते १९४२ साल होते. देश गांधींच्या चले जावचळवळीने भारावलेला होता. इंग्रजांची सत्ता उखडून टाकून देश स्वतंत्र करावयाच्या ईर्षेने भारतीय जनता पेटून उठली होती. असहकाराचे अस्त्र पुकारले गेले. सत्याग्रह, मोर्चे, प्रभात फेऱ्या, रेल्वे रूळ तोडणे, टेलीफोनच्या तारा तोडणे असे अनेक मार्ग हाताळण्यात आले. इंग्रज राज्यकर्ते  रपकड, गोळीबार, लाठीमार वगैरे अनेक तंत्राचा वापर करुन चळवळ दडपण्याचा प्रयत्न  करीत होते.

                          अशा तंग वातावरणात ब्रिटीश अधिकाऱ्याची शाळेला भेट होती. ‘सत्तेपुढे शहाणपण काय कामाचे!’ ब्रिटीश अधिकाऱ्याचे स्वागत करणे, संस्थेला प्राप्त होते.

                  दुसरे दिवशी ब्रिटीश अधिकाऱ्याचे लवाजम्यासह आगमन झाले. मिलिटरी स्कूल असल्यामुळे लष्करी पद्धतीने शिस्तीत स्वागत झाले. बॅंड पथकाच्या साथीने कवायत, राईडिंग, स्वीमिंग, शुटींग वगैरे उपक्रम क्रमाक्रमाने दाखविण्यात आले. नियोजनबद्ध कार्यक्रम पाहून पाहुण्यांच्या चेहऱ्यावर समाधान विलसत होते.

                       कार्यक्रम संपल्यावर सर्व विद्यार्थी असेंब्लीत एकत्रित झाले. व्यवस्थित युनिफॉर्ममले शिस्तीत बसलेले विद्यार्थी, कार्यक्रमाची शोभा वाढवित होते. सर्वत्र शांतता होती.

                               मुख्याध्यापकांचे पाहुण्यांसमवेत व्यासपीठावर आगमन झाले. कार्यक्रमाची सुरुवात झाली. इतक्यात विद्यार्थ्यांमधून एक मोठा आवाज आला, ‘गांधीजी की जय।समारंभाचा बेरंग झाला. ब्रिटीश अधिकारी रागाने लाल झाले. मुख्याध्यापक व अध्यापकवर्ग गोंळून गेला. ताबडतोब कार्यक्रम आटोपता घेतला गेला.

                        संपूर्ण शाळा गोंळून गेली. ‘ब्रिटीश सरकार काय निर्णय

घेईल ?’ मोठा प्रश्न निर्माण झाला. म्हणतात ना, ‘ज्याच्या हाती सत्ता, तो मारी लत्ता’.

                       त्यादिवशी तब्येत बरी नसल्यामुळे, ‘डॉक्टर मुंजेह्या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते.अखिल भारताचे एक छोटेसे जिवंत प्रातिनिधिक चित्र असलेल्या ह्या शाळेची विद्यार्थी संख्या जेमेतेम १०० होती. काही वर्षे ही विद्यार्थी संख्या ६० - ६५ पर्यंत कमी होती.

                         देशाला स्वातंत्र्य मिळविण्याकरता व देशाचे स्वातंत्र्य टिकविण्याकरिता, ऐन परकीय अंमलात १९३७ साली डॉक्टर बा. शी. मुंजे ह्या द्रष्ट्या नेत्याने ही शाळा नाशिक येथे स्थापन केली. ब्रिटीश सरकारचा अतिशय जाच असताना, डॉ मुंजेंनी ही शाळा एका विशिष्ट्य हेतूने काढली व चालविली. डॉक्टर साहेबांचे लक्ष्य भारतीय सैन्याचे भारतीयकरण करण्याकडे व तसेच अन्य सरकारी कारभारांत लागणाऱ्या अधिकाऱ्यांत योग्य असे भारतीय तरुण निर्माण करण्याकडे होते. त्या काळच्या लोकसभेत त्यांनी महनीय कामगिरी केली. त्यामुळेच ब्रिटीश सरकारलाही मनांतून इच्छा नसतानाही ह्या शाळेला परवानगी द्यावी लागली.

                    डॉक्टर साहेबांच्या कार्यप्रणालीत शाळा व राजकारणही दोन भिन्न गाठोडी होती. ते आपल्या भाषणांत सांगत असत, “मी माझे राजकारणाचे गाठोडे नाशिकरोड स्टेशनवर ठेवून शाळेत येतो व परत राजकीय कामासाठी जाताना, स्टेशनवरुनच ते गाठोडे उचलून नाशिक बाहेर जातो.” राजकारणाचा वारा न लागलेली शस्त्र व शास्त्र पूजक संस्था र्मसंकटात पडली होती. डॉक्टरसाहेबांची झालेल्या प्रकारावर प्रतिक्रिया काय असेल?

                          शस्त्र सामर्थ्यावर विश्वास ठेवणारे डॉक्टर मुंजेतर अहिंसेचे पुजारी गांधीजीदोघांचे राजकीय मार्ग भिन्न, परंतु भारतीय स्वातंत्र्य मिळविणेहे एकच ध्ये.

                    डॉक्टर साहेबांनी त्या विद्यार्थ्याला बोलावून घेतले. बिछान्यावर झोपलेले डॉक्टरसाहेब त्या मुलाला म्हणाले, “तू तुझ्या वयाप्रमाणे योग्यच केले. मी तुझ्या वयाचा असतो तर हेच केले असते. परंतु एक लक्षात घे, ते इंग्रज अधिकारी आपल्या शाळेत पाहुणे म्हणून आले होते. आपली भारतीय संस्कृती सांगते, ‘अथिती देवो व।घरी आलेल्या पाहुण्याचा अपमान करणे चूक आहे. जीवनांत पुन्हा अशी चूक करु नकोस.”

                       डॉक्टर साहेबांच्या खोलीतून तो रामदंडी विद्यार्थी एक नवीन डा घेऊन बाहेर पडला. शाळा पूर्ववत चालू झाली. डॉक्टरसाहेबांनी प्रकरणावर पडदा कसा टाकला? हे कोणालाच समजले नाही.

                                ब्रिटीश सरकारच्या जाचाबरोबर, पराकोटीचा आर्थिक ताण सहन करीत असलेल्या भोसला शाळेने, अनेक भूमीगत स्वातंत्र्यसैनिकांना लपण्यासाठी आश्रय देऊन स्वातंत्र्यलढ्यात योगदान दिले.

                        इंग्रजी कॅडेटशब्दास भारतीय प्रतिशब्द रामदंडीवापरुन डॉक्टर मुंजेंनी पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांचा आदर्शविद्यार्थ्यांसमोर ठेवला. भोसला मिलिटरी स्कूलच्या माजी रामदंडींनी भारतीय लष्कर, सरकारी विभा, शिक्षण क्षेत्र, औद्योगिक क्षेत्र, वैद्यकीय व्यवसाय, शेती अशा विवि क्षेत्रांत दिलेल्या योगदानाद्वारे डॉक्टर मुंजेचे सक्षम भारताचे स्वप्न साकारलेले आहे.
श्रीमती प्रभा आठवले

माजी शिक्षिका, . . हायस्कूल, नाशिक

Saturday 9 September 2017

लोक (तडजोड ?) न्यायालय

                          आज दि. ९ सप्टेंबर २०१७ रोजी आम्हा माय-लेकींना लोक न्यायालयात एका प्रथितयश सेल्युलर कंपनीने आमंत्रण दिले. हे आमंत्रण लेखी नोटिसद्वारे का आले नाही? हे गुढ आम्हाला उलगडले नाही, परंतु मोबाईल फोनवर आलेल्या smsमुळे आमची स्वारी सर्व कागदपत्र-पुराव्यांसहित लोक न्यायालयात  दाखल झाली.
                              डिसेंबर २०११ मध्ये सदर कंपनीचे प्रतिनिधींनी  आमच्या एम. आय. डी. सी. ऑफिसमध्ये येऊन त्यांच्या नेट सेटरची माहिती दिली. त्याकाळी असलेल्या डायल अप नेट कनेक्शनने जेरीस आलेल्या आम्हाला हा नेट सेटरएक वरदान वाटला. वार्षिक वर्गणी (नेट सेटर सहित) रुपये ३०१०/= रोख व कागदपत्रांची पुर्तता करुन (दिनांक २० डिसेंबर २०११ रोजी पावती क्रमांक १०७) आम्ही नेट सेटर बुक केला. जानेवारी २०१२ पासून नेट सेटर कार्यन्वित झाला.
                                    दि. १४ जानेवारी २०१३ रोजी, सदर कंपनीच्या जानेवारीत आमच्या ऑफीसमध्ये आलेल्या प्रतिनिधीला मागील वर्षी प्रमाणे रुपये ३०१०/= रोख अॅडव्हान्स देऊन (पावती क्रमांक २९७३- नेट सेटर २०१३साठी) आम्ही निश्चिंत झालो.

                                      जुलै २०१३मध्ये कंपनीने वकिलाची नोटिस पाठवून थकबाकी रुपये ११६६/९६ ची मागणी केली. ह्या वकिलांना तसेच सदर कंपनीच्या पुणे ऑफिसला कुरीअरने पत्र पाठवून अॅडव्हान्स रुपये ३०१०/= च्या पावतीची झेरॉक्स पाठवली. ह्याचा परिणाम कंपनीने आमच्या नेट सेटरची सेवा बंद करुन, तुमची केस पुण्याच्या कोर्टात दाखल झाली आहे, वगैरे धमक्या देण्यास सुरवात केली. नासिकच्या नेट सेटरसाठी पुणे कोर्टाची गरज काय? त्याचे उत्तर कोर्टाचे समन्स आल्यावर कळेल, वगैरे दमदाटीवजा फोन.
                                   एका अर्थी कंपनीला अॅडव्हान्स पैसे देऊन आपण पाप केल्याची जाणीव मनाला त्रस्त करीत होती. ह्याच काळात दि. ५ ऑगस्ट २०१३ रोजी लोकसत्ता वर्तमानपत्रात चुकीचे शुल्क आकारणाऱ्या मोबाईल नेटवर्क कंपनीला सहा हजारांचा दंडही बातमी वाचनात आली.
                                    ‘कोर्ट कचेऱ्या करण्यापेक्षा उरलेल्या ६ महिन्यांच्या पैशावर पाणी सोडून द्यावे’  ह्या सुज्ञ विचाराने जग-रहाटी चालत असताना, अचानक १५ दिवसांपूर्वी मोबाईलवर ९ सप्टेंबर २०१७ च्या लोक-न्यायालयाचे आमंत्रण sms ने आले.
                                       नेट सेटरचे टोंगल तसेच दोन्ही वर्षांच्या ओरिजनल पावत्या पुरावा म्हणुन सादर केल्या,तरीही आम्हाला तडजोड करुन प्रकरण मिटवावे लागले. वास्तविक आमची ६ महिन्यांची अॅडव्हान्स रक्कम कंपनीकडे जमा असताना, झटपट तडजोड ह्या न्यायाने कंपनीशी बारगेनिंग करीत रुपये १६१४/१६च्या ऐवजी रुपये ७००/= त प्रकरण मिटले.
                         ‘लोक न्यायालयात न्याय मिळेलह्या अपेक्षेने आलेल्या आम्हाला तडजोडीचा अन्याय सहन करावा लागला.
प्रभा आठवले, नाशिक
सेवानिवृत्त हायस्कूल शिक्षिका

Tuesday 5 September 2017

अनंत चतुर्दशी : व्रत अनंताचे

                गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या
म्हणत श्रीगणेशाला वार्षिक निरोप देणारा दिवस - अनंतचतुर्दशी.
                          भाद्रपद शुद्ध चतुर्दशीला अनंताचे म्हणजे श्रीविष्णुचे व्रतकरावे, असे श्रीगुरुंनी सायंदेवाला सांगितले (श्रीगुरुचरित्र अध्याय ४१) आहे. श्रीगुरुचरित्रकारांनी हे व्रत कसे करावे? ह्याची माहिती महाभारतातील कथेद्वारे अध्याय ४२मध्ये दिलेली आहे.
अनंत  व्रत  कसे  करावे ?
                                   तांबड्या  रेशमी  दोऱ्याच्या  १४  गांठीचा  अनंत  करावातो  घेऊन  नदीवर  यावेशूचिर्भूत  स्ना  करावेचांगले  वस्त्र  नेसूनहळद  कुंकू  लावूनदोन  नवीन  कलश  आणावेतोंडाने  ‘गंगा - यमुनाम्हणत ह्या कलशांत  पाणी  रावेपंचपल्लव-पाच प्रकारच्या वृक्षांची पाने  (पिंपळ,वड,आंबा इत्यादी)   त्नासहित  कलशांत  घालून  षोडशोपचार  करून  त्याचे  त्वरित  पूजन  करावेगंगा-यमुनेची  नानाप्रकारची  आरती  करूनर्भाचा  शेष  करून  पूजा  करावीदोन  कलशावर  नवीन वस्त्र  ठेवावेत्या  कलशापुढे  शंख - पद्म  पंचरंगी  पुडीनी  भरलेल्या  रांगोळ्या  काढाव्यात. र्भाचे  शेष  पुजावेशेषाची  षोडशोपचारे  पूजा  करावी.  ‘शेषशाई’  म्हणून  विष्णुचे  ध्या  करावेसातफणीच्या  शेषाबरोबर  नेहमी  विष्णु  असतोयाच  कारणास्तव  त्याचे  नाव  ‘अनंतअसे  म्हणून  ध्यान  करावे
                           पिंगट  रंगाचे  डोळेचार  बाहूउजव्या  हातात  शंख- पद्मडाव्या  हातात  चक्र    गदा  अशा  विष्णुमुर्तीचे  ध्या  करावे.  ‘  नमो  भगवते’  या मंत्राचा  उच्चार  करूनर्भग्रंथीची  षोडशोपचारे  पूजा  करावी.
                        नवीन  दोन  नवे  दोरे  आणून  ‘पुरुषसुक्त’  म्हणून  पूजा  करावी.  ‘अतोदेवा’  मंत्र  म्हणावाषोडशोपचारे  पूजा  करावीउजव्या हातात  ‘संसारगव्हरेती’  मंत्र  म्हणून  धागा  बांधावा.   ‘नमस्ते  वासूदेव’  मंत्र  म्हणून हातातील  जीर्ण  गत वर्षीच्या दोऱ्याचे  विसर्जन  करावे.  ‘दाताच  विष्णुर्भगवान’  म्हणत   एक  शेर गव्हात  गूळ  वगैरे  मिसळून फळांसहित वाण द्यावे.  तसेच ब्राह्मणाला तांबूल दक्षिणेबरोबर गव्हाची खीर द्यावी. उरलेल्या अर्ध्या खीरीचे स्वतः (व्रत करणाऱ्या व्यक्तीने ) भोजन करावे. असे हे व्रत चौदा वर्षे करावे. चौदा वर्षे अनंताचे व्रत पूर्ण केल्यावर, ह्या व्रताचे उद्यापन करताना चौदा कलश दान देऊन ब्राह्मण भोजन करावे. क्तीभावाने उद्यापन केल्यावर, मनातील इच्छा पूर्ण होऊन चतुर्विपुरुषार्थाचा ला होतो.
                                  कृतयुगात कौंडिण्य ऋषींची पत्नी सुशीलाहिने आचरलेले अनंत व्रतभगवान श्रीकृष्ण पांडवांना आचरण्यास सांगतात. “अशा प्रख्यात अनंत व्रताचा धागा तू सतत बां, तसेच ह्या व्रताची  दीक्षा तुझ्या ज्येष्ठ मुलाला  (नागनाथाला) दे”, असे श्रीगुरु सायंदेवाला सांगतात.
प्रभा आठवले, नाशिक
संकलक : श्रीगुरुचरित्र आशय-निधी
www.shrigurucharitra.com



Tuesday 15 August 2017

देशाचे गाणे : आज / ७५ वर्षांपूर्वी*

( आज -स्वतंत्र भारत  )
धाव धाव गा, भारतीय जनता   (गा = अहो)
करील बा साह्य, भारत-माता॥ धृ॥

आग लागली ह्या देशाला
स्वस्थ कसे हो तुम्ही बसला
चला जलदी विझवायला
अवधी नसे ह्या कार्याला॥ १॥
                                धाव धाव गा,----- ॥ धृ॥
देशसेवेला बहुत लागले
राजकारणी जाऊन पडले
कठीण समयी ते नच अडले
भ्रष्ट नीतीने तयांना सोडविले॥ २॥
                               धाव धाव गा,----- ॥ धृ॥
आज पेरिले बीज अर्थक्रातींचे
नमो दावती ब्रीद प्रगतीचे
पाश तोडूनी कृष्ण पैश्याचे
व्यवहार व्हावे  धवल धनाचे॥ ३॥
                                     धाव धाव गा,----- ॥ धृ॥
भुलू नका त्या गारुडाला
परदेशीच्या भूलभूल्लयाला
जुलुमी अशा चिनी सत्तेला
सत्य जाणूनी घेरा तयाला॥४॥
                                  धाव धाव गा,----- ॥ धृ॥
करावी मुक्त ही क्षिती
संपवूनि दहशतवादी नीती
एकनिष्ठ पुत्र भारताचे
भोगिती फल महासत्तेचे ॥ ५॥
                                  धाव धाव गा,----- ॥ धृ॥
अनुप्रभा, नाशिक
www.shrigurucharitra.com
------------------------------------------------------------------ 
*        संदर्भ :-
सुमारे ७५ वर्षांपूर्वी (पारतंत्र्यातील भारत)
देशाचे गाणे
(चाल  - तारी प्रभो महाराष्ट्राला)
धाव धाव त्वरे धाव ईशा ।
करी बा साह्य ह्या क्षणी देशा॥धृ॥

आग लागली देशाला।
स्वस्थ कसे हो तुम्ही बसला।
चला जलदी विझवायाला।
अवधी नसे ह्या कार्याला॥ १॥
                            धाव धाव त्वरे --- ॥धृ॥
देशसेवेला बहूत लागले।
कारागृही जाऊन पडले।
कठीण समयी ते नच खचले।
लाठ्यांचे ते हल्ले सोशीयले॥२॥
                                धाव धाव त्वरे --- ॥धृ॥   
आधी लोकमान्य टिळकांचे।
ब्रीद दावा स्वातंत्र्याचे।
पाश तोडा भूमातेचे।
नाम जपा गांधीजींचे॥ ३॥
                                    धाव धाव त्वरे --- ॥धृ॥
भुलू नका गारुड्याला।
परदेशाच्या मोहाला।
जुलमी अशा इंग्रजाला।
सत्य लढूनी घेरा त्याला॥४॥
                               धाव धाव त्वरे --- ॥धृ॥
करी मुक्त गांधीजींना।
प्रभू यश देई त्यांना।
एकनिष्ठ सत्यतेचे।
फल देई स्वातंत्र्याचे॥ ५॥
                               धाव धाव त्वरे --- ॥धृ॥
कै. राधाबाई आठवले, नाशिक

Sunday 23 July 2017

मायबोलीचे भुक्कड ६

३ कीर्ती कठीयाचा दृष्टान्त
 म्हाइंभट (तेरावे शतक) :  मराठीतील पहिले चरित्रकार महानुभाव पंथाचे प्रवर्तकमहात्मा चक्रधरांचे निष्ठावान अनुयायीचक्रधरांच्या उत्तरापंथ प्रयाणानंतर नागदेवाचार्यांच्या सहकार्याने अनुयायांकडून चक्रधरांच्या आठवणींचे परिश्रमपूर्वक संकलन करून ‘लीळाचरित्र’ हा मराठीतील पहिला चरित्रग्रंथ लिहिलानंतर ‘गोविंदप्रभूचरित्रही लिहिलेमहानुभाव पंथाचे तत्वज्ञानतत्कालीन सामाजिक-सांस्कृतिक परिस्थितीभाषा व समाजजीवन यांच्या अभ्यासाच्या दृष्टीने ‘लीळाचरित्र’ हा अत्यंत महत्वाचा ग्रंथ आहे.
               कोणताही जीव विकारापासून वेगळा राहत नाहीहे स्पष्ट करण्यासाठी प्रस्तुत लीळेत चक्रधर स्वामींनी ‘कीर्ती कठीयाचा दृष्टान्त’ सांगितलेला आहेकोणत्याही कार्याचा आणि व्रतस्थपणाचा अहंकार बाळगणे हा सुद्धा विकारच आहे हेप्रस्तुत लीळेतून पटवून दिले आहे.
---------------------------------------------------------------------------------
              डोमग्रामी गोसावीयांचा ठायी उद्याचे मातीकाम होत होतेः ते सी बाजत होतेः तेणे भक्तीजनासी व्यापार होववे नाः आन भट व्यापार करु लागले नाथोबाय म्हणीतलें:  नागदेयाः तू कैसा काही हिंवसी ना तवं भटी म्हणीतलें:  आम्ही वैरागीः काइसीया हिवुः यावर सर्वज्ञे म्हणीतलें: वानरेयाः पोरा जीवासी वैराग्य मिरवु आवडेः हाही एकू विकारुचि कीं गाः यावरि भटी म्हणीतलें: जी जीः निर्विकार तो कवणः सर्वज्ञें म्हणीतलें वानरेयाः पोर जीव वीकारावेगळा केव्हळाही जालाचि नाहीः मा तु काई वेगळा अससिः हो कां जीः यावरि गोसावी कीर्ती कठीयाचा दृष्टान्त निरोपिलाः कव्हणी एकू कठीया असे भोगस्थानाची सुश्रुषा करीः झाडीः सडा संमार्जन करीः ते देखौनि गावीचे म्हणतिः कठीये नीके करीत असा बरवे करीत असाः ते आईकौनि दीसवडीचा दीसवडी हात हात चढवीः तयासि देवता आपुले फळ नेदीः तयासि कीर्तीचेचि फळ झालेः
लीळाचरित्र उत्तरार्ध : एकांक लीळा क्र. १२०
संपादक प्रा. पुरुषोत्तम नागपुरे
शब्दार्थ :-
ग्राम =गाव
ठायी = समोर
द्या = सकाळी
ते= तेव्हा
सी = थंडी
तेणे =त्यामुळे
व्यापार = काम
आन = आणि / परंतु
वैरागी = तपश्चर्या करणारे
काइसीया = कशाला
वानरेया = माकडा
सर्वज्ञ = स्वामी
गा = अहो
कव्हणी= कोणी
सुश्रुषा =  सेवा
कठीया = मंदिराचा पुजारी
निका= चांगला
बरवा = सुंदर
भोगस्थान =दैवतस्थान
दीसवडीचा दीसवडी= रोजच्या रोज
हात हात चढवीः = काम वाढवू लागला
नेदणे = न देणे

भाषांतर :-
         डोमगावी स्वामींच्या समोर सकाळच्या वेळी मातीकाम (बागकाम वगैरे) होत होते. तेव्हा थंडी वाजत होती, त्यामुळे भक्तजनांना काम करता येत नव्हते. परंतु भट (नागदेवाचार्य) काम करत होते. नागोबाए (भक्ताचे नाव),” नागदेवा, तुला थंडी कशी वाजत नाही ? (तुला थंडी वाजत नाही का?) तेव्हा नागदेवाचार्य म्हणाले, “आम्ही तपश्चर्या करणारे, आम्हाला थंडी कशी वाजेल?”  यावर स्वामी म्हणाले, “भटो, वानरेया (कौतुकाने माकडा) स्वतंत्र जीवाला वैराग्य मिरवायला आवडते. अहो, हा सुद्धा एक विकारच आहे.” यावर भट नागदेवाचार्य म्हणाले, “जी जी (स्वामी स्वामी) असा कोण आहे ? ज्याला विकारच नाही.” स्वामी म्हणाले, “भटा, वानरेया (कौतुकाने माकडा) स्वतंत्र जीव हा विकारापासून वेगळा नाही मग तू काय वेगळा आहेस ? “ “हो का?” असे भट म्हणाले. यावर स्वामींनी प्रसिद्धी हवी असणाऱ्या मंदिराच्या पुजाऱ्याचा दृष्टान्त सांगितला. कोणी (कोणी  एके काळी) एक पुजारी होता. तो दैवतस्थानाची (देवतेची) सेवा करी, झाडी (मंदिर झाडायचा), सडा रांगोळी करायचा. ते बघून गावातले म्हणायचे, “पुजारी चांगले काम करीत आहे. सुंदर करीत आहे.” हे ऐकून रोजच्या रोज तो पुजारी काम वाढवू लागला. त्याला (पुजाऱ्याला) देवता आपुले फळ देत नाही. कीर्ती हेच त्याचे फळ झाले.
{ तात्पर्य :- लोकांनी वाहवा केल्यामुळे, मंदिराच्या पुजाऱ्याने आपले काम वाढविले. पूजा करण्यामागचा मुख्य हेतू (मोक्ष मिळविण्याचा)बाजूला राहिला. लोकांनी केलेली वाहवा वाढत गेली म्हणजे पुजाऱ्याला फक्त कीर्ती - प्रसिद्धी मिळत गेली.}
स्वाध्या : -
प्रश्न १ कोणांस उद्देशून म्हटले आहे ते लिहा
१ वानरेया - नागदेवाचार्य
२ सर्वज्ञ - स्वामी
३ गोसावी - स्वामी
प्रश्न २ आकृती पूर्ण करा
स्तुतीप्रिय
कठीयाची जाणवलेली स्वभाव वैशिष्ट्ये
मोक्ष मार्गाचे (ज्ञानमार्गाचे)   
प्रश्न ३  : प्रस्तुत दृष्टान्तातील उपदेश तुमच्या शब्दांत सांगा
प्रसिद्धीच्या हव्यासापोटी कोणतेही काम करु नये.
प्रश्न ४ : पुढील शब्दांना प्रमाणभाषेतील शब्द सांगा
कठीया = पुजारी
सी = थंडी
काइसीया = कशाला
कव्हणी = कोणी
                  इयत्ता ९वीच्या पाठ्य पुस्तकातील धड्याचे भाषांतर, महानुभावपंथीय गुरु आदरणीय डोळसकर बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली, श्री. अमोल गेटे (मराठी साहित्याचे गाढे अभ्यासाक) ह्यांनी करुन दिले. श्री. डोळसकर बाबांना दंडवत तसेच श्री. अमोल गुटेसाहेबांना  मनःपूर्वक  धन्यवाद.
                   तेराव्या शतकातील चक्रधर स्वामींचे लीळा चरित्र हा मराठी भाषेतील आद्य चरित्र ग्रंथलीळाचरित्र, ज्ञानेश्वरी, श्रीगुरुचरित्र, तुकाराम गाथा, दासबोध अशा अनेक प्राचीन ग्रंथातील ग्रंथभांडार शालेय शिक्षणात समाविष्ट करताना, कठीण शब्दांचे शब्दार्थ धड्याखाली दिल्यास, शिक्षकांना तसेच विद्यार्थ्यांना समजणे सोपे होईल.
                      मराठी साहित्याच्या ग्रंथ भांडार तसेच इतिहासातील शिवशाही त्याच्या मूळ अर्थासकट- उद्देशांसकट नवीन पिढीपर्यंत पोहोचणे गरजेचे आहेशिवशाहीचे स्वप्न साकारण्याकरिता, सांगावेसे (भुक्कड*)वाटते,
शिकण्या येतील लेक बालके
तीच लेकरे जाण सखे
जरीपटक्याचे दिवस आणण्या जगी
तयाची आण मायबोलीच्या मुखे

समाप्त
अनुप्रभा, नाशिक

संदर्भ:-
कविवर्य बा. . बोरकर यांच्याकांचनसंध्याकवितेतील  शेवटचे (६वे) कडवे
शिणुनी येती गुरें-पाखरें 
तीच लेकरें जाण सखे,

दिवस जरेचे आले जरी 
त्या काठ जरीचा लावू सुखें...!

* भुक्कड = निरुद्योगी बुभुक्षित (भुकेला हपापलेला गरजू )

॥ जय श्री गुरुदेवदत्त॥