Monday 31 March 2014

श्रीगुरुदेवदत्त शिष्य भगवान परशुराम

                  भगवान परशुराम श्रीगुरुदेवदत्तांचे शिष्यत्व स्विकारण्याआधी  आपले वडील श्री. जमदग्नी ऋषी व आई रेणुका यांच्यासह घनदाट जंगलात रहात होतापरशुरामाचे तो रहात असलेल्या भागातील राजघराण्यातील लोकांबरोबर भांडण झाले. परशुरामाने राजघराण्यातील लोकांना त्या जंगलातून पळवून लावले. हा पराभव राजघराण्यातील लोकांच्या जिव्हारी लागलात्यांच्या इज्जतीचा प्रश्न निर्माण झाला. ह्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी राजघराण्यातील लोकांनी परशुराम बाहेरगावी गेल्याची संधी साधली. परशुरामाच्या घरावर हल्ला करुन त्यांनी जमदग्नी ऋषींचा खून केला. घरी परत आल्यावर परशुरामाला आपल्या आईकडून, रेणुका मातेकडून  घरावर झालेल्या हल्ल्याची व त्यात त्याच्या वडिलांचा क्षत्रिय राजघराण्यातील लोकानी केलेल्या खूनाची बातमी समजली. त्याच्या आईने गंगेकाठी श्रीजमदग्नी ऋषींना अग्नि देऊन, त्याच चितेत सती जाण्याचा केलेला  आपला निश्चय सांगितला. या सर्व गोष्टींनी स्वाभाविकच तरुण परशुरामाचे मन उद्विग्न झाले. त्याने भूतलावरील सर्व समाजकंटक क्षत्रिय राजांना संपविण्याची प्रतिज्ञा केली. तो वडीलांचे पार्थिव व आईला बरोबर घेऊन गंगा नदीकडे निघाला .वाटेत श्रीदत्तगुरुंनी या मायलेकरांना पाहिले.
 त्यांनी   रेणुका मातेला   नमस्कार केला. परशुरामाच्या आईने सती जाऊन आपले आयुष्य संपविण्याचा केलेला निश्चय श्रीदत्त गुरुंना सांगितला व परशुरामाला तिने सल्ला दिला की आयुष्यात कधीही गरज पडली तर तू श्रीदत्तगुरुंकडे जा. श्रीदत्तगुरुंच्या सल्ल्याने श्रीपरशुराम गंगा नदीपर्यंत गेला नाही. त्याने वडिलांवर तिथेच अंत्यसंस्कार केले व  त्याची आई रेणुका माता सती गेली.
                    प्राचीन इतिहासात आपण पहातो, नवरा गेल्यावर त्याची पत्नी त्याच चितेवर त्या पुरुषाबरोबर स्वतः जळून आपले आयुष्य संपवित असे काळाप्रमाणे समाजाचे व विशेषतः समाजातील  स्त्रियांचे विचार बदलेले दिसतात. शिवाजीराजांचे वडील शहाजीराजे यांना देवाज्ञा झाल्यावर, शिवाजी राजांच्या आईने बाल शिवाजीसाठी सती न जाण्याचा निर्णय घेतला. जिजाऊमातेने बाल शिवबावर लहानपणापासून संस्कार करुन शहाजीराजांचे स्वातंत्र्याचे स्वप्न साकार केले. शिवाजीराजांनी मोठेपणी जिजाऊमातेच्या आज्ञेनुसार हिंदवी स्वराजाची स्थापना केली. जिजाऊमातेप्रमाणे अहिल्याबाई होळकर यांनी पतीनिधनानंतर सती न जाता लोककल्याणाची कामे करुन होळकरांची गादी सांभाळली. ह्या नंतरच्या काळात राजा राम मोहन रॉय यांनी सती जाण्याची अघोरी प्रथा बंद व्हावी, म्हणून अत्यंत परिश्रम घेतले. ह्या त्यांच्या प्रयत्नांतून इंग्रजी राज्यसत्तेने कायदा करुन सतीची चाल बंद केली.
                   जिजाऊ माता अहिल्याबा ई होळकर तसेच राजा राम मोहन रॉय ह्या घटना अलिकडच्या ३०० ते ३५० वर्षांपूर्वीच्या परंतु श्रीदत्तात्रेयांचे वडील श्री. अत्रीऋषी यांनी चित्रकुट पर्वतावरुन पाहिलेल्या खग्रास सूर्यग्रहणाच्या नोंदी करुन ठेवलेल्या आहेत. श्री अत्रीऋषी हे स्वतः खगोलशास्त्रज्ञ होते. त्यामुळे त्यांनी केलेल्या अचूक नोंदी हे खग्रासग्रहण सुमारे ७००० वर्षांपूर्वी घडले असावे, असे  सांगतात.
                     तात्पर्य, रेणुकामाता सुमारे ७००० वर्षांपुर्वी त्याकाळाच्या प्रथेप्रमाणे सती गेलेली असावी. संशोधकांच्या  दत्तगुरुंची ह्या मायलेकरांशी झालेली भेट, माहुरगड परिसरात घडली  असावी. आजही आपण माहुरगडावर रेणुकामातेच्या मंदिरात दर्शनासाठी जातो.
                    श्रीपरशुरामाने आपल्या पराक्रमाने सर्व क्षत्रिय राजांचा युद्धांत पराभव करुन त्यांना मारुन टाकले. अर्थात श्रीपरशुरामावर तरुणपणी झालेल्या आघातातून त्याचे मन जास्तच बहिर्मुख झाले. मनाचा विवेक संपला व सुडाने पेटलेल्या मनाने स्वतः केलेल्या प्रतिज्ञेतील समाजकंटक शब्दाला तिलांजली दिली व निरपराध क्षत्रिय राजांनाही युद्धात मारुन टाकले.
                     अशाप्रकारे जास्तच बहिर्मुख झालेल्या परशुरामाने पापाच्या मार्गावरुन चालताना प्रभू रामचंद्रांना क्षत्रिय राजा म्हणुन युद्धाचे आवाहन दिले. प्रभू रामाने हे आवाहन स्वीकारले व युद्धात परशुरामाला पराभूत केले.  परशुरामास ठार न मारता जिवंत सोडून दिले. वास्तविक पशुरामास देहदंड देऊन एक क्षत्रिय राजा या नात्याने इतर क्षत्रिय राजांच्या वधाचा बदला घ्यायला पाहिजे होता. परंतू अशा सूडाने विचार मरत नसतात ती व्यक्ती तेवढी मरते. परशुराम शूर होता परंतू प्रभू रामचंद्रांमध्ये असलेल्या क्षमाशील शौर्यामुळे ते देवत्वाला पोहोचले.
                  परशुरामाला कोकणचा आद्य पुरुष मानतात. आपल्याला माहित आहे की  भुकंप पृथ्वीच्या भूगर्भातील हालचालींमुळे होतात. अशाच पृथ्वीच्या भूगर्भातील हालचालींमुळे मोहेंजोदरो, हडपा संस्कृती  लुप्त झाल्या. श्रीकृष्णाची  द्वारका समुद्राच्या पोटात गेली. आजही ह्या भागात समुद्राच्या तळाशी  द्वारका नगरीचे अवशेष सापडतात. व्दारका नगरी जशी समुद्रात गडप झाली.तसाच कोकणचा किनारा हा भूभाग समुद्रातून वर आला. माणूस ह्या समुद्रातून वर आलेल्या जमिनीवर रहाण्यास घाबरत होता. माणसाच्या मनात निश्चितच भिती असणार परत हा भाग समुद्रात गेला तर आपणासही जलसमाधी ! भगवान पशुरामाने ह्या जमिनीवर मनुष्य वस्ती निर्माण करण्याचे मोठे काम आयुष्यात केलेले आहे. इतिहासाने त्याची फक्त शूर  व कोकणचा आद्य पुरुष म्हणून नोंद घेतलेली आहे.
                  परशुरामास खून का बदला खून हा न्याय न लावल्याने परशुराम शरमिंधा झाला. त्याच्या आईने, रेणुका मातेने सांगितल्याप्रमाणे परशुराम श्रीदत्तगुरुंना शरण आला.
श्रीदत्तगुरुंनी आपल्या ह्या पश्चातापदग्ध शिष्याचे  शिक्षण केले.
॥ श्रीगुरुदेवदत्त


                        ------------ ‘श्रीगुरुचरित्र आशय - निधी
गुढीपाडवा, दि. ३१ मार्च २०१३   
  (संदर्भ ग्रंथ :
                    The Mystery Beyond the Trinity
                    Tiprura Rahasya
                    Translated by
                   SWAMI SRI RAMANANANDA SARASWATHI

                 ॥श्रीदत्तात्रेय ज्ञानकोश॥ लेखक डॉ. प्र. . जोशी
                  प्रकाशक : श्रीदत्तात्रेय ज्ञानकोश प्रकाशन, पुणे )
              


Wednesday 19 March 2014

श्रीगणेशाचे चिंतामणि रुप

श्रीगणेशाचे चिंतामणि रुप  
मुद् गल पुराणात चिंतामणिह्या श्रीगणेशाच्या नावाची व्याख्या दिलेली आहे.
चिंतामणि ह्या शब्दाची व्याख्या सांगताना मनाच्या ५ बिघडलेल्या अवस्था सांगितलेल्या आहेत.
बर्हिमुख व्यक्तीबाहेरच्या जगाचा विचार करणारी व्यक्ती).
२ जास्त बर्हिमुख व्यक्ती बाहेरच्या जगाचाच विचार करताना पापाच्या मार्गाकडे जाऊ शकते.
अंतर्मुख व्यक्ती तिला आपण विक्षिप्त म्हटले आहे.
जास्त अंतर्मुख व्यक्ती तिला एकाग्र म्हटलेले आहे.
५ निष्क्रीय मन ह्याला निरुद्ध म्हटलेले आहे.
मनाच्या ह्या पाचही स्थिती ज्ञानाच्या सहाय्याने नष्ट करतो व  मनाला शांती देतो तो चिंतामणि.
आता आपण बहिर्मुख मनही कसे घातक असते ते पाहू या
शाळेत शिक्षिका म्हणून काम करताना बर्हिमुख झालेली विद्यार्थिनी मी पाहिली. ही मुलगी हुशार होती परंतु तिला दर परिक्षेत कमी मार्कस पडायला लागल्यावर मी तिच्या मैत्रीणींकडे तिची चौकशी केली, तर मला ध क्कादायक समजले. मधल्या सुट्टीत ही मुलगी शाळे बाहेर जाते, ती परत शाळेत दुसऱ्या दिवशीच येते. ह्या मुलीला न रागवता तिच्याकडून कुठे जाते? काय करतेस? ही माहिती मिळविली. ही मुलगी वेश्यावस्तीतील एका मावशीकडे दुपारी जात असे, परंतु ह्या मुलीला वैश्यावस्ती वगैरे काहीच माहित नव्हते. रस्त्यात ओळख झालेली ही मावशी तिचे खूप लाड करीत असल्याने, तिला आवडत होती. मी तिच्या वडीलांना शाळेत भेटायला बोलावून सांगितले, तिला रागावू नका पण तिचे गाव बदला, तिचे जग बदलले तरच ती ह्यातून बाहेर येईल. त्या पालकांनी माझे ऐकले. दोन दिवसात स्वतःची दुसऱ्या गावाला बदली करुन  मुलीला त्या बाह्य जगातून बाहेर काढले.

) बाह्य जगाचा जास्त विचार करणारी व्यक्ती पापाकडे जाते, असे
मुद् गल पुराण सांगते ह्याचे उदाहरण म्हणजे श्रीदत्त शिष्य भगवान परशुराम,  असे आम्हाला वाटते.
--------------------------------------------------------------------
अंर्तमुख व्यक्तीला विक्षिप्त म्हटलेले आहे अशा विक्षिप्त व्यक्तींपासून समाज चार हात दूर पळतो
) नंतरची अवस्था येते ती व्यक्ती जास्तच अंतर्मुख होते. स्वतःच्या कोशात गुरफटायला लागते. जास्त अंतर्मुख मनाला एकाग्र म्हटलेले आहे.
 श्रीदत्तगुरु सांगतात एकाग्र चित्ताने कोणतेही काम करावे, परंतु जास्त एकाग्र होऊ नये म्हणजे विचारांच्या भोवऱ्यात मनाला गुरफटू देऊ नये यासाठी श्रीदत्तगुरुंनी कोळी या किड्याचे उदाहरण दिलेले आहे. कोळी हा किडा आपल्या लाळेने जाळे विणतो व त्या स्वतःच्या जाळ्यात स्वतः अडकतो, तसेच मनालाही जास्त स्वतःत गुरफटू देणे चांगले नाही, त्यामुळे बाहेरच्या जगाचा संपर्क तुटतो, माणूस शेखमहंमदी करू लागतो अशा माणसाला लोक मूढ म्हणतात. समाज तिच्याकडे एक मूढ, मूर्ख व्यक्ती म्हणून पहातो.
) ह्या नंतर अंर्तमुखतेचा कडेलोट होतो ती व्यक्ती निष्क्रीय होते.
हल्ली किशोर वयातील मुले अंर्तमुखतेचे बळी पडताना दिसत आहेत. ही मुले विचारांनी   परिपक्व न झाल्याने आपल्या कोशात गुरफटतात, परंतु त्यांच्या आजुबाजुच्या लोकांनी पौगंडावस्था म्हणुन दुर्लक्ष करु नये, त्यांचे प्रश्न समजावून घ्यावेतशिकवणीला येणारा एक विद्यार्थी निष्क्रीय   झालेला शिकवणीच्या बाईंना आढळला. त्या बा ईंनी त्या मुलाच्या आई वडिलांना बोलावून ह्या मुलाला ताबडतोब मानस रोग तज्ञाकडे घेऊन जा म्हणून सांगितले. ते पालक मुलाला मानस रोग तज्ञाकडे घेऊन गेले. डॉक्टरांनी त्याच्या अंर्तमुखतेचे कारण त्याच्याकडून गप्पा मारुन काढून घेतले. मित्रांबरोबर अश्लील सीडी पाहिल्याने घरी खूप बोलणी बसली. त्यातून ह्या सरळ मार्गी मुलाला आपण काहीतरी मोठे पाप केले, असे वाटायला लागले. वेळीच उपचार झले म्हणून तो मुलगा सावरला नाहीतर डॉक्टरांच्या मते ह्या मन खाण्याचा शेवट आत्महत्त्येत झाला असता.

जग झपाट्याने बदलत आहे मुलांचे  प्रश्न रागावून बंद करण्यापेक्षा मोठ्या लोकांनी त्यांच्याशी नीट संवाद साधला तर पुढे पश्चाताप करण्याची वेळ येत नाही.
 श्रीगणेशाचे चिंतामणि रुप आपल्याला सांगत असते :
मन रहाण्यासाठी मनाला अंतर्मुख किंवा बहिर्मुख होण्यापासून थांबवायला पाहिजे.
                                                                     समाप्त
दिनांक २० मार्च २०१४
(संदर्भ ग्रंथ : What is the implied meaning of the many Names of Lord Ganapati?
                   By Hindu Janjagruti Samiti)




Friday 7 March 2014

महिला दिनाच्या शुभेच्छा

महिला दिनाच्या शुभेच्छा

( दि. मार्च २०१४ )
                       स्त्री असे प्रकृति, पुरुष तिची स्थिती
                       दोहोंच्या युतीने मिळते, जीवनी गती
                       आरक्षण नीति करिते, अवकाश मर्यादित
                       निकोप स्पर्धा घेईल, झेप अंतराळात
                                       संकलक – ‘श्रीगुरुचरित्र आशय निधी
---------------------------------------------------------------------  
बैल गाडी - टाकाऊतून टिकावू बनविताना वापरलेल्या वस्तू : -
बैल - बागेतील झाडालगतची माती, पांढरा रंग ,पिवळ्या चिंध्यांच्या झेंडूच्या माळा,
         वाया गेलेल्या टेप तुकड्याचा लगाम.
गाडी - साडी फॉलच्या पॅकींग पुठ्याची उरलेल्या कापडाचे धमणीला आवरण,
           धमणी  - सोलडरींग मेटलचे रिकामे रीळ चाके
गाडीवान त्याची लक्ष्मी (बायको ) - वाणसामानास असणारा पुडाचा दोरावाया गेलेल्या
              तारेचा सांगाडयातून बाहुल्या, चिध्यांचे कपडे इत्यादी

Monday 3 March 2014

विद्या व ज्ञान या संकल्पना : अज्ञात पूर्वजांची देणगी

                                                                                 भाग ३ रा
श्रीगणेशाचे विद्याधर रुप : ‘विद्याधर ह्या नावातीलविद्याशब्दाची व्याख्या : -
१)   संस्कृत डिक्शनरी लेखक  M.Monier – Williams पान नंबर १६३ नुसार 
विद्या या शब्दाचा अर्थ Science (विज्ञान), Learning (शिक्षण),  
                                Scolarship (शिष्यवृत्ती),Phylosophy (तत्वज्ञान)
२)   काही लोकांच्या मते विद्येचे चार भाग आहेत :-
त्रयी  - ग्वे , सामवेद आणि यजुर्वेद
आन्विक्षिती - तर्कशास्त्र जीवन शास्त्र
दंडनीति - लोक संचलित करण्याचे शास्त्र
वार्ता - व्यावहारिक कला / शेती, व्यापार, औषध इत्यादी विषयक विज्ञान
३)   सूर्यदेवाचा मुलगा राजा मनू याने  ‘अध्यात्म  विद्याही पाचवी विद्या सांगितली.
अध्यात्म - आत्म ज्ञान, मूलभूत अध्यात्मिक सत्य
श्रीमद् भगवद् गीतेत श्रीकृष्ण सांगतात,
सर्गाणाम्  आदिः  अन्तः    मध्यम्    एव  अहम्  अर्जुन
अध्यात्मविद्या  विद्यानाम्  वादः  प्रवदताम्  अहम् ॥ १ - ३२
अर्थ : हे  अर्जुनासृष्टीचा  आदी  अंत  आणि  मध्य  मीच  आहेसर्व  विद्यांमध्ये  अध्यात्मविद्या वाद     करणाऱ्यांमध्ये     तत्त्वनिर्णयासाठी     केला     जाणारा     वाद  
( तत्त्वबो )  मीच  आहे.
श्रीगुरुचरित्रकार अध्याय पहिलामध्ये श्रीगणेशाला वंदन करताना म्हणतात,
सकळ मंगल कार्यासी। प्रथम वंदिजे तुम्हांसी।
चतुर्दश -विद्यांसी। स्वामी तूचि लंबोदरा॥७॥
ह्या ओवीचा अर्थ  : सर्व मंगल कार्यारंभी तुला प्रथम वंदतात (पूजा करतात).  हे लंबोदरा , तू
१४ विद्यांचा स्वामी आहेस.
 ह्या १४ विद्या पुढीलप्रमाणे  :  चार वेद = ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद
                                       सहा वेदांगे, पुराणे, मीमांसा (पूर्व आणि उत्तर),
                                        न्याय शास्त्र, धर्म शास्त्र

अविद्या : अनित्य, अपवित्र, दुःखकारक आणि अनात्मा यांना नित्य, पवित्र, सुखदायक आणि  शाश्वत मानणे याला अविद्या म्हणतात.
अविद्येच्या उलट तिला विद्या म्हणतात.
आधुनिक शास्त्रात अणुशक्ती म्हणजेविद्याव अणुबॉम्ब म्हणजेअविद्याम्हणता येईल.

ज्ञान ह्या शब्दाचा शब्दकोशातील अर्थ जाणीव, विषयाचे आकलन, माहिती होय.
ह्याचाच अर्थ
विद्या म्हणजे मूलभूत शास्त्र
ज्ञान म्हणजे ह्या विद्येची (अविद्येची नव्हे) शास्त्रीय जाणीव, विषयाचे आकलन, माहिती
दि .२ मार्च २०१४                                                                       क्रमशः


संदर्भ ग्रंथ सूची :
           by Shri  Shrikant Hanumant Joshi
    
2)What is the implied meaning of the many Names of
        Lord       Ganapati? By Hindu Janjagruti Samiti