Saturday 13 September 2014

श्रीगुरुचरित्र अध्याय ६वा : गोकर्ण लिंग स्थापन कथा व संगीत तज्ज्ञ दशशिर रावण व्यक्तिमत्त्व



                         या अध्यायात पुराणातील 'गोकर्ण लिंग स्थापना' ह्या गोष्टीतून  श्रीगुरुचरित्रकारांनी रावणकालीन संगीतविषयक माहितीचा संकलित ठेवा, तसेच दशशिर रावणह्या राक्षसाच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू उलगडून दाखविलेले आहेत.
मीमांसा:-
                      रावणाला श्रीगुरुचरित्रकार दशशिर रावण म्हणून संबोधतात.
                      महर्षी वाल्मिकी तसेच तुलसीदासजी यांच्या मतानुसार रावण एक शिर (डोक) असलेली व्यक्ती होती. हनुमानजी जेव्हा सीतेच्या शोध घेण्यासाठी लंकेस गेले होते, तेव्हा हनुमानजीला  रावण एक शिर असलेली व्यक्ती दिसली होती. असा वाल्मिकी रामायणात स्पष्ट उल्लेख आहे.
                        महाकवि रविषेणाचार्य यांच्या मते रावणाच्या दशशिरांचे स्पष्टीकरण देताना त्याच्या गळ्यातील ९ मण्यांचा हार असे दिलेले आहे. ह्या ९ मण्यांमध्ये रावणाच्या एका शिराचे प्रतिबिंब पडल्याने तो दशशिर संबोधला गेला, असा महाकवी रविषेणाचार्य यांनी जैन पद्म पुराणातस्पष्ट उल्लेख केलेला आहे.
                         दशशिर  रावण म्हणजे शब्दशः दहा डोकी असलेली व्यक्ती   तसेच६ शास्त्रे व ४ वेदज्ञात असलेली व्यक्ती होय, असाही अर्थ काही लोक लावताना आढळतात.
                                http://hi.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A3 ह्या संकेतस्थळानुसार,
                      रावणाजवळ मायावी विद्या असल्याने, तो शत्रुसमोर दहा तोंडांचा राक्षस म्हणून उभा राहात असे, अन्यथा तो आपल्यासारखाच दिसणारा एक मनुष्य होता. आपण उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम, ईशान्य, नैऋत्य, वायव्य, आग्नेय या आठ दिशा आणि तसेच वरची(उर्ध्व) आणि खालची(धो) अशा दोन मिळून एकूण दहा दिशा मानतो. रावण कोणत्याही अवस्थेत दश दिशांना चौकस दृष्टीने पाहात असे. याचा अर्थ रावणाला दश-फेर बुद्धीहोती असे म्हणता येईल.   (चौफेर बुद्धीची व्यक्ती व्यवहारकुशल असते, असे आपण मानतो).
                        दशशिर ह्या शब्दाचा शब्दशः अर्थ :
दशशिर= दश (दहा) + शिर (मस्तक, डोके, कोणत्याही वस्तूचा माथा)
            =  जीवनातील दहा यशशिखरे (TOP)
                        याचा अर्थ दहा डोकी असलेली व्यक्ती होतो.
                         याचा भावार्थ रावणाने, मायावी पद्धतीने दहा डोकी असलेला रावण, असा आभास जगासमोर उभा केलेला असावा.
                      पुराणकालीन सूर-असूर संघर्षात श्रीविष्णुला
दश-अवतारासाठी दहा विविध जन्म घेऊन असूरांना नष्ट करुन जगाचे रक्षण करावे लागले. श्रीविष्णुच्या ह्या दश अवतारांच्या मागचे प्रयोजन असूर रावणास समजलेले दिसत नाही. त्याने मायावी रुपातील दशशिर रावण उभा करुन जगाला दाखवून दिले असावे की,   श्रीविष्णु सारखे दहा जन्म  घेण्याची गरज नाही.एकाच जन्मात मायावी पद्धतीने दहा डोक्यांची व्यक्ती ह्या स्वरुपात स्वतःस उभे करुन श्रीविष्णुच्या दश अवतारांना आव्हान दिलेले असावे, असे म्हणता येईल.
                         तसेच ही व्यक्ती स्वतःच्या जीवनात दहा क्षेत्रात अत्युच्य ठिकाणी पोहोचलेली असावी, असाही दशशिर ह्या शब्दाचा अर्थ होतो.
                      कोणत्याही क्षेत्रातील प्रयत्नवादी बुद्धिमान व्यक्तीसाठी, नेहमी त्या क्षेत्रातील सर्वोच्च पद रिकामे असते. खालच्या पदांवर नेहमी गर्दी असते.
  ह्यालाच इंग्रजी मध्ये,
‘There is always room at the TOP’
असे म्हणतात.
                    वेदशास्त्रसंपन्न तसेच बलवान रावण व्यक्तीगत  जीवनात लौकिक अर्थाने दहा क्षेत्रात यशस्वी झालेला , आपल्याला श्रीगुरुचरित्रात दिसतो.              
                               असा हा जीवनाच्या  विविध क्षेत्रांत यशस्वी झालेल्या  रावणया शब्दाचा अर्थ:-
रावण = यः रावयति भीषयति सर्वान् सः रावणः
(अर्थ:- जो सर्वांवर सतत आरडा-ओरड करतो आणि सर्वांना भीती
           दाखवतो तो रावण.)
 याचे कारण रावणातील असुरी प्रवृत्ती होय.
              श्रीमद् भगवद् गीतेत असुरीवृत्तीच्या लोकांची सहा लक्षणे सांगितलेली आहेत.
दम्भः  दर्पः  अभिमानः    क्रोधः  पारुष्यम्  एव   
अज्ञानम्    अभिजातस्य  पार्थ  सम्पदम्  आसुरीम्  ॥ १६ - ४ ॥
हे  अर्जुनादांभिकपणा , घमेंड , गर्व , रागीटवृत्ती , कठोरपणा  आणि  अज्ञान  ही  आसुरी  संपत्ती  घेऊन  जन्मलेल्या  पुरुषांची ( सहा  गुण ) लक्षणे  आहेत.
                       संस्कृत भाषेत असुरी आणि आसुरी या दोन्ही शब्दांचा अर्थ राक्षसी असाच होतो.
                        रावणातील असूरी प्रवृत्तींमुळे इतिहासाने  रावणाची नोंद खलनायक अशी घेतलेली दिसते.
                             असुरी प्रवृत्तीच्या व्यक्ती, आपली विचारधारा जगावर लादण्याचा अतिरेक करताना, आजही दहशतवाद्यांच्या रुपात आपण पहातो.

विचारधन :- ओवी क्रमांक  १६  ते ३७
                               पुलस्त ब्राह्मण व त्याची पत्नी कैकया या दांपत्याचा मुलगा रावण हा लंकेचा राजा - लंकाधीश होता. रावणाची शिवभक्त आई मातीच्या लिंगाची पूजा करीत असताना, रावण मातेच्या दर्शनासाठी आला. आपल्या आईने मातीच्या लिंगाची पूजा करणे, ही गोष्ट रावणाला कमीपणा आणणारी होती. त्यामुळे त्याने स्वतःची प्रतिष्ठा सांभाळण्यासाठी, कैलास पर्वतासकट श्रीशंकरास उचलून लंकेला आणण्यासाठी, हिमालय पर्वत रांगातील कैलास पर्वत ह्या ठिकाणी  गेला.
मीमांसा:-
                               वाल्मिकी रामायणातील उल्लेखानुसार, पुलस्त्य मुनीच्या विश्वश्रवा नावाच्या मुलाचा मुलगा म्हणजे रावण होय. विश्वश्रवाला वरवर्णिनी आणि कैकसी नावाच्या दोन बायका (पत्नी) होत्या. वरवर्णिनीने कुबेराला जन्म दिलेल्याने, सवतीमत्सरातून कैकसीने
कुबे-ला  म्हणजे अशुभ वेळीगर्भ धारणा केली. अशुभ वेळी गर्भ धारणा केल्याने रावण, कुंभकर्ण हे क्रूर स्वभावाचे राक्षस  त्या गर्भातून उत्पन्न झाले.
         थोडक्यात मातेच्या मनःस्थितीचा नवजात गर्भावर निश्चित परिणाम होतो.
( संदर्भ:-                              

                             श्रीगुरुचरित्रकारांच्या मते, पुलस्त ब्राह्मण व त्याची पत्नी कैकया या दांपत्याचा मुलगा रावण हा लंकेचा राजा - लंकाधीश होता.
                                  लंकेचा राजा असलेल्या शिवभक्त रावणाला आपल्या मातेच्या मनातील शिवभक्ती ही भावना समजली नाही. भाव तेथे देवही मनाची प्रवृत्ती न कळल्यामुळे लंकेचा राजा रावण, श्रीलंकेहून निघून स्वतःच्याच इष्टदेवतेचे श्रीशंकराचेनिवासस्थान उखडून आणण्यासाठी, कैलास पर्वत स्थानाला मनोवेगे  (त्वरित)  गेला.
गुगल नकाशानुसार श्रीलंका ते तिबेट हे अंतर 2582.604km आहे.
गुगल मॅपनुसार तिबेटमधील कैलासपर्वत सध्या चीनच्या अधिपत्याखाली   आहे. गुगल नकाशावर ह्या पर्वताला  Gangdisê Mountains, Xizang (Tibet), China असे नाव आहे. कैलास पर्वतातून इंडस (सिंधू), सतलेज, ब्रह्मपुत्रा, कर्नाली ह्या आशियातील महानद्या उगम पावतात.
पृथ्वीच्या भूस्तरांमध्ये सतत चालू असलेल्या हालचालींमूळे रावणकालात ह्या दोन्ही ठिकाणांमधील अंतर वेगळे असू शकेल.
                             एवढा प्रचंड प्रवास केल्यावर, रावणाने हा पर्वत स्वबळाने उखडायचा प्रयत्न केला. परंतू हा प्रयत्न फसल्यावर, रावणाने  संगीतातूनशिव आराधनासुरु केली.

विचारधन :- ओवी क्रमांक  ३८ ते ८०    
                                   संगीततज्ज्ञ रावणाने, ‘स्वतःचे शिर व स्वतःची आतडीयांच्या सहाय्याने वीणा बनविली. ह्या  वीणेवर ३६ रागांमधून, सतत २ महिने श्रीशंकराची आराधना केली. अशा ह्या कर्तव्यकठोर रावणावर, भगवान श्रीशंकर प्रसन्न झाले.
मीमांसा:-
रावणाच्या जीवनातील यशशिखर १=संगीततज्ज्ञ वीणा वादक  रावण
                          भावार्थ:-रावणाने स्वतःची आतडीवापरुन म्हणजे पोटतिडकीने व स्वतःचे एक डोके तोडूनम्हणजे बुद्धी एकवटून ३६ रागांमधून वीणा वादन करीत, शिवभक्ती केली.

                                श्रीगुरुचरित्रकारांनी रावणाने शिवशंकराची केलेली संगीत आराधना सविस्तर दिलेली आहे. ह्या सविस्तर माहितीतून रावण कालीन  संगीत शास्त्राचे संकलन पुढील पिढ्यांच्या हवाली केलेले आहे.
संगीतातील प्रख्यात आठ गण :
ओवी क्रमांक ४३ ते ४५
संगीतातील नव रस:
ओवी क्रमांक ४६ ४७
गण  क्रमांक
गण
कुळ
ब्राह्मण
क्षत्रिय
वैश्य
शुद्र
दैत्य =राक्षस
प्रेत
राक्षस
तुरुंग
रस क्रमांक
रसाचे नांव
शांत
भयानक
अद्भुत
श्रृंगार
हास्य
करुण
रौद्र
वीर
बीभत्स
स्वर:-         
                    भारतीय शास्त्रोक्त संगीतात सा, रे, , , , , नी, सा (वरचा स्वर) हे मुख्य स्वर मानले जातात. ह्या स्वरांचे जन्म प्लक्ष, जंबू , शामल, कुश, क्रौंच, शाक, पुष्कर अशा सात द्विपांमध्ये झालेले आहेत, अशी नोंद गोकर्ण पुराणात आहे.
                     ह्या स्वरांच्या सात जन्मद्विपांविषयीची सविस्तर  माहिती http:/gokarnamahabaleshwar.com ह्या संकेतस्थळावर  गोकर्ण पुराण ह्या सदरात  आपल्याला वाचावयास मिळते.
                                  
                         श्रीगुरुचरित्रातील रावणकालीन संगीतात व सध्याच्या अर्वाचीन संगीत शास्त्रात कालानुरुप झालेले बदल पुढिलप्रमाणे :-
१)          षड् = सा (ओवी क्रमांक ४८, ४९)
श्रीगुरुचरित्रातील
रावण कालीन संगीत
अर्वाचीन संगीत
वास जंबुद्वीप
जन्मभूमी जंबुद्वीप
उगम कंठ
षड् ज =षट् + 
(षट् म्हणजे सहा आणि ज म्हणजे जन्मणारा) नासिका, कंठ, उर, तालु, जीभ, दात ह्या सहा स्थानांतून उत्पन्न होतो.
वायु पुराण व अर्वाचीन संगीतातसाह्या स्वराच्या उगमात साम्य आहे.
वायु पुराणातील (२१.३४ ) ध्वनी शास्त्रानुसार (SOUND theory ) :-
षड् (सा)’ स्वर हा सहा अवयवांच्या म्हणजेच नाक, कंठ, उर, जीभ, टाळु, आणि दांत यांच्या सुनियंत्रित प्रयत्नाने निर्माण होतो.
तान  मोराच्या स्वरासारखी
मोर हा पक्षीषड् जउच्चारतो.
कुळ   गीर्वाण
                                   गीर्वाण
गीर्वाणः म्हणजे देव आणि देवता.
गीर्वाणभारती म्हणजे भारतवर्षातील देव आणि देवतांची भाषा.
भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाणभारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥
वंश  ब्राह्मण
------
रंग   कमळाच्या पानाप्रमाणे 
कमलवर्ण (तांबडा)
देवता  अग्नी
वह्नि  = अग्नी
अग्निऋषीने त्याला पाहिले.
रस   शृंगार
  वीर अद् भुत

२)          ऋषभ = रे  (ओवी क्रमांक ५०, ५१)
(ऋषभचा  दुसरा अर्थ बैल आहे.)
श्रीगुरुचरित्रातील
रावण कालीन संगीत
अर्वाचीन संगीत
वास प्लक्ष
जन्मभूमी  शाकद्वीप
उगम हृदयस्थान
ऋषभ= ऋष (जाणे) + अभ (हा प्रत्यय) स्वरसमुहांत उत्पन्न झालेला हा स्वर अधिक लक्ष्यवेधी प्रखरपणाने हृदयाला जाऊन भिडतो.
तान तास पक्षाच्या स्वरासारखी
चातक पक्षी ऋषभउच्चारतो.
कुळ ऋषि
ऋषि
वंश ब्राह्मण
--------
रंग शोभिवंत
पिंगट
देवता यमदेवता
त्याला ब्रह्माऋषींनी पाहिले.
ब्रह्मा ही त्याची देवता  आहे.
रस अद्भुत रस
रौद्र
३)          गांधार = (ओवी क्रमांक ५२, ५३)
(गंधर्व लोकांचे  स्थान म्हणजे गांधारदेश. आज  तो प्रदेश अफगाणिस्तान मधील कंदाहार या नावानी ओळखला जातो. धृतराष्ट्राच्या पत्नीचे नाव गांधारी होते.)
श्रीगुरुचरित्रातील
रावण कालीन संगीत
अर्वाचीन संगीत
वास  कुशद्वीप
जन्मभूमी  कुशद्वीप
उगम  नाक
गांधार =गां +धृ यापासून विभक्ती लोप न होता, गांधार हे शब्दरुप झाले आहे.
तान  बोकडाच्या स्वरात
  गांधार हा बोकडाच्या कंठातून येणारा स्वर
कुळ  देव
 देव
वंश  वैश्य
 वैश्य वर्ण
रंग  सोन्याच्या  रंगाचा
 सोनेरी
देवता  चंद्रदेवता
 चंद्रऋषींनी त्याला पाहिले.
 सरस्वती ही त्याची देवता आहे.  
रस  अद्भुत रस
 करुणरस

४)          मध्यम = (ओवी क्रमांक ५४, ५५)
श्रीगुरुचरित्रातील
रावण कालीन संगीत
अर्वाचीन संगीत
वास   क्रौंचद्वीप
जन्मभूमी   क्रौंचद्वीप
उगम   छाती
सात स्वरां मध्य स्थानी असल्यानेमध्यम
तान   क्रौंचस्वरात
  क्रौंच पक्षी मध्यम स्वर उच्चारतो.
कुळ  गीर्वाण
 गीर्वाण
गीर्वाणः म्हणजे देव आणि देवता. गीर्वाणभारती म्हणजे भारतवर्षातील देव आणि देवतांची भाषा.
भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाणभारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥
वंश   ब्रह्म (ईश्वर)
 ब्राह्मण वर्ण
रंग   कुंदाच्या फुलांसारख्या
         शुभ्र रंगाचा
  कुंदवर्ण (शुभ्र )
देवता   लक्ष्मी
     ----------------
रस   करुणारस
  हास्य (म्हणजेच प्रसन्न )त्याचा रस आहे.

५)          पंचम = (ओवी क्रमांक  ५६, ५७
श्रीगुरुचरित्रातील
रावण कालीन संगीत
अर्वाचीन संगीत
वास   शाल्मली द्वीप
जन्मभूमी   शाल्मलीद्वीप
उगम    कंठ
  स्वरमालिकेत पाचव्या स्थानी असल्यानेपंचम’.
तान    कोकीळ  स्वर
   कोकिळ पंचमस्वर उच्चारतो .
कुळ  

वंश    पितृ
  पितृ, ब्राह्मण वर्ण
रंग    काळा
   काळा
देवता   गणनाथ देव
विष्णू  ही त्याची देवता आहे
नारदऋषींनी त्याला पाहिले.
रस    हास्य
   शृंगार

६)          धैवत = (ओवी क्रमांक  ५८, ५९)
श्रीगुरुचरित्रातील
रावण कालीन संगीत
अर्वाचीन संगीत
वास    श्वेतद्वीप
जन्मभूमी    श्वेतद्वीप
उगम     कपाळ  
   धैवत =धी (बुद्धी ) +वत् .
तान     बेडकाचा स्वर
    बेडूक धैवत  स्वर उच्चारतो.
कुळ   ऋषी
 ऋषी  
वंश    उत्तम ध्यानांतून जन्म
क्षत्रिय वर्ण
रंग     पिवळा
 पिवळा
देवता    नारदगणेश देवता
गणपती ही त्याची देवता आहे.
तुंबरुने धैवत अनुभवला.
रस   बीभत्स  
    बीभत्स व भयानक

७)          निषाद = नी (ओवी क्रमांक  ६१, ६२)
श्रीगुरुचरित्रातील
रावण कालीन संगीत
अर्वाचीन संगीत
वास    पुष्करद्वीप
जन्मभूमी    पुष्करद्वीप
उगम टाळूंच्या मिलाफातून निर्मीत= वरच्या जबड्याच्या मध्यभागी असलेल्या टाळूला  जीभ टेकवून काढलेला नी  हा स्वर मस्तकाच्या अग्रभागी असलेल्या टाळूवर जाणवतो.  
   निषाद =नि +सद् (खाली बसणे )सर्व स्वर त्याच्या ठिकाणी समाप्त होतात (शब्दश: खाली बसतात).   
तान      हत्तीच्या स्वरांत
 हत्ती निषाद स्वर उच्चारतो.    
कुळ    वैश्य
  वैश्य वर्ण
वंश     असुर ( राक्षस )
 असुर ( राक्षस )
रंग      तांबूस गुलाबी
  विचित्र संमिश्र
देवता     तुंबरमुनी  जवळील
            सूर्य देवता
 तुंबरुने त्याला पाहिले.
सूर्य ही त्याची देवता आहे.   
रस    भयानक रस
     करुण
(निषाद हा कारुण्याची उत्कटता दाखवतो.)

श्रीगुरुचरित्रातील ३६ रागांची नावे (ओवी क्रमांक  ६४  ते ७८
क्रमांक
रावणकालीन रागांची नावे
रागांची अर्वाचीन  नावे
     )
श्रीराग
श्रीराग
)
वसंतराग
वसंतराग
     )
भैरव
भैरव
     )
पंचम
पंचम
     )
नटनारायण
नटनारायण
     )
मेघ
मेघ
     )
गौडी
गौडी
८)           
द्राविडराग
द्राविडराग
९)           
कौशिकमाळी
मालकौशिक
१०)      
देवगंधा
देवगंधा
११)      
धनाश्रि
धनाश्री
१२)      
बराडी
वराडी
१३)      
रामक्रिया
शुद्ध रामक्रिया
१४)      
मंजरी
पटमंजिरी
१५)      
गौडक्री
गौडक्री
१६)      
भैरवी
भैरवी
१७)      
गुर्जरी
गुर्जरी तोडी
१८)      
वेळावली
बिलावल
१९)      
ललित
ललित
२०)      
हंसयुक्त कर्णाटकी
हंसयुक्त कर्णाटकी
२१)      
टंकाक्षी
टंकाक्षी
२२)      
सैवी
सिं भैरवी
२३)      
मालवी
मालाश्री
२४)      
बंगाली
बंगाल भैरव
२५)      
सोरटी
सोरट
२६)      
कामबोध
कामोद
२७)      
भूपाळी
भूपाली
२८)      
वल्लभ
वल्लभ
२९)      
राव्हेरी
सावेरी
३०)      
विहंगदात्री
बिहागडा
३१)      
रामकली
रामकली
३२)      
मल्हार
मल्हार
३३)      
आहिरी
आहिर भैरव
३४)      
वसवीज
सध्या अस्तिवात दिसत नाही.
३५)      
देवक्रिया
देवक्री
३६)      
मध्यम राग
सध्या अस्तिवात दिसत नाही.

विचारधन :- ओवी क्रमांक  ७९   
  रावणाचे भक्तीसी। प्रसन्न ईश्वर त्वरितेसीं।
निजरूपें अतिहर्षीं।उभा राहिला सन्मुख॥७९॥
मीमांसा:-
रावणाच्या जीवनातील यशशिखर २= रावणाच्या भक्तीभावमुळे
                                            श्रीशंकर , रावणावर प्रसन्न झाले.  

विचारधन :- ओवी क्रमांक  ८१ 
म्हणे रावण शिवासी। काय मागूं तुजपाशीं।
लक्ष्मी माझे घरची दासी। अष्टै निधि माझे द्वारीं॥८१॥  
मीमांसा:-
रावणाच्या जीवनातील यशशिखर =   ऐश्वर्यसंपन्न रावण  


विचारधन :- ओवी क्रमांक  ८२, ८३
 चतुरानन माझा ज्योतिषी। तेहतीस कोटी देव हर्षीं।
सेवा करिताति आम्हांसी। सूर्य चंद्र वरुण वायु॥८२
अग्नीसारिखा सेवा करि। वस्त्रें धूतसे अतिकुसरीं ।
यम माझा आज्ञाधारी। निरोपावेगळा न मारी कवणा॥८३॥          
मीमांसा:-
रावणाच्या जीवनातील यशशिखर ४ =  रावणाने प्रतिस्पर्धी ३३ कोटी देवांना स्वतःच्या कारागृहात डांबून  स्वतःचा राजकारभार निरंकुश केला.
रावणाच्या जीवनातील यशशिखर ५ =  सूर्य, चंद्र, वरुण, वायू, अग्नि ह्या निसर्ग देवतांना तसेच मृत्यूदेव-यम यांना अंकित करुन नैसर्गिक आपत्तींपासून स्वतःला संरक्षित केले.
                       *चतुरानन माझा ज्योतिषी*--- ह्याविषयीची मीमांसा ओवी क्रमांक १०५  ते १०९  च्या मीमांसेत दिलेली आहे.

विचारधन :- ओवी क्रमांक   ८४
 इंद्रपराविता पुत्र। कुंभकर्णासारिखा भ्रात्र।
स्थान माझें समुद्रांत। कामधेनु माझ्या घरीं॥८४॥  
मीमांसा:-
रावणाच्या जीवनातील यशशिखर =  रावणाचे राज्य लंका-समुद्र वेष्टित            सुरक्षित  राज्य
आजचे श्रीलंकेचे क्षेत्रफळ= ६५६१० चौरस कि. मी.
(संदर्भ URL: http://en.wikipedia.org/wiki/Sri_Lanka)
 आज नासिक जिल्ह्याचे,(महाराष्ट्र) क्षेत्रफळ= १५५३० चौरस कि. मीटर
आजचे श्रीलंकेचे क्षेत्रफळ, नासिक जिल्ह्याच्या पाचपट आहे. रावणकालात श्रीलंकेच्या या क्षेत्रफळात बदल असू शकेल. हे गृहित धरले तरी रावणाचे राज्य छोटे होते, परंतू ते चहूबाजूनी समुद्राने सुरक्षित  राज्य असावे.

विचारधन :- ओवी क्रमांक  १०५  ते १०९
विरिंचि म्हणे विष्णूसी। प्रतिकार करा वेगेसीं।
कारण असे तुम्हांसी।राम-अवतारीं परियेसा॥१०५॥
त्वरित उपाव करावा यासी। पुढें जड  होईल तुम्हांसी।
निर्दाळावया राक्षसांसी। अवतरोनि तुम्हींच यावें॥१०८       
ऐसें विनवी चतुरानन। तंव श्रीविष्णु म्हणे कोपोन।
कार्य नासिलें म्हणोन। निघाला झडकरी कैलासासी॥१०९॥ 
मीमांसा:-
               रावणाने जरी चतुरानन म्हणजे सृष्टीनिर्माणकर्ता आपला ज्योतिषी म्हणून सांगितले असले तरी नियती बदलण्याचा अधिकार प्रत्यक्ष ब्रह्मा, विष्णु, महेश यांनाही नसतो, हे दिसते. कारण श्रीविष्णुने राम अवतार हा जन्म ह्या काळात घेतलेला दिसत नाही.         

विचारधन :- ओवी क्रमांक  ८७
ईश्वर म्हणे रावणासी। जरी चाड असेल पूजेसी।
काय करिसी कैलासासी। प्राणलिंग देईन तुज॥८७
मीमांसा:-
                     ईश्वर रावणास म्हणाला ,”जर पूजेसाठी (शिवलिंगाची)गरज असेल तर  कैलास (नेऊन) काय करशील? मी तुला माझे प्राणलिंगच देतो.”
                      रावण असूर वृत्तीचा असल्याने, त्याला पूजेसाठी फक्त शिवलिंगाची गरज (श्रीमद् भगवद् गीतेनुसार-प्रवृत्ती) आहे, कैलास पर्वताची गरज पूजेसाठी नाही (श्रीमद् भगवद् गीतेनुसार-निवृत्तीहे तारतम्य दिसत नाही.
श्रीमद् भगवद् गीतेनुसार,
  प्रवृत्तिम्    निवृत्तिम्    जनाः    विदुः  आसुराः 
  शौचम्    अपि    आचारः    सत्यम्  तेषु  विद्यते  ॥ १६ - ७ ॥
केंव्हा  काय  करावे  (प्रवृत्ती) आणि  केंव्हा  काय  करू  नये  (निवृत्तीहे  आसुरी  लोकांना  कळत  नाहीशुचिर्भूतपणा , सदाचार    सत्य  हे ( गुण ) त्यांच्या  ठिकाणी  नसतात .

विचारधन :- ओवी क्रमांक  ११८  
धीं दिलें लिंग त्यासी।नेलें असेल लंकेसी।
शंकर  म्हणे विष्णूसी। पांच घटी झाल्या देखा॥११८
       घटी= घटका= चोवीस मिनिटांचा काळ
पांच घटी= पाच घटका = x २४ मिनिटे = १२० मिनिटे =२तास
मीमांसा:-
रावणाच्या जीवनातील यशशिखर =   आकाशमार्गे प्रवासाचे तंत्रज्ञान
                                                   विकसित  करण्यात यशस्वी
गुगल मॅप संदर्भानुसार, सध्याचे कैलास पर्वत ते गोकर्ण हे अंतर १९७२.५२८ कि. मीटर आहे. रावण काळात ह्या अंतरात (कैलास पर्वत ते गोकर्ण अंतर  १९७२.५२८ कि मीटर) बदल असू शकतो. कारण पृथ्वीच्या भूगर्भातील स्तर सदैव सरकत असतात. हे जरी गृहित धरले तरी रावणाला हवाई मार्गे प्रवास करण्याचे, प्रगत तंत्रज्ञान अवगत असावे, असे दिसते.
रावणकालीन हवाई वेग जाणून घेण्याचा एक अल्पसा शास्त्रीय प्रयत्न:-
                      कैलास पर्वत ते गोकर्ण हे हवाई अंतर= १९७२.५२८ कि. मी. पार करण्यास रावणास २ तासांपेक्षा जास्त वेळ लागलेला, श्रीशंकर व श्रीविष्णु यांच्या संवादातून (ओवी क्रमांक ११८) दिसतो.
                       पुराणकालात आवाजाचा वेग ही संकल्पना माहिती असावी. ओवी क्रमांक १९  नुसार रावण आपल्या मातेचे दर्शन घेण्यासाठी
आला तेथें वेगवक्त्र (क्त्र = मुख)
(वेगवक्त्र =बोलण्याच्या वेगाने म्हणजे तोंडातून शब्द बाहेर पडण्याच्या आत)
सध्याच्या शास्त्रानुसार आवाजाचा वेग= ३४०.२९ मीटर प्रति सेकंद  आहे
                                                 = ताशी १२२५.०४४ कि. मीटर आहे.
आवाजाच्या वेगाने (ताशी १२२५.०४४ कि. मीटर)  कैलास पर्वत ते गोकर्ण हे अंतर१९७२.५२८ कि. मी. पार करण्यास १.६ तास (२ तासापेक्षा कमी वेळ लागतो) लागतात.
                          ओवी क्रमांक११८ नुसार २ तासांनंतर रावण गोकर्ण ह्या ठिकाणी पोहोचलेला दिसत नाही.
                          याचा अर्थ रावणाचा हवाई प्रवासाचा वेग आवाजाच्या वेगापेक्षा कमी होता, असे दिसते.

विचारधन :- ओवी क्रमांक  १२५
बोलावूनि गणेशासी। सांगे विष्णु विनयेसीं।
"कैसा रावण परियेसा। तुतें सदा उपेक्षितो॥१२५॥ 
मीमांसा:-
                                रावण हा असूर प्रवृतीचा असल्याने श्रीगणेशह्या देवतेची उपेक्षा करताना दिसतो.
श्रीमद् भगवद् गीतेत आसूरी प्रवृतीचे सांगितलेले लक्षण
असौ  मया  हतः  शत्रुः  हनिष्ये    अपरान्  अपि ।
ईश्वरः  अहम्  अहम्  भोगी  सिद्धः  अहम्  बलवान्  सुखी ॥ १६ - १४ ॥
या  शत्रूला  मी  ठार  केले  त्याचप्रमाणे  इतर  शत्रूंनाही  मी  मारीन , मीच  ईश्वर  आहे , मीच  भोगी  आहेमी  सिद्ध  आहे , मीच  बलाढ्य  आणि  मीच  सुखी  आहे .

विचारधन :- ओवी क्रमांक १२८
आतां तुवां करणें एक। रावणापाशी जावें ऐक।
कपटरुपें व्हावे कुब्जक।बाळवेष धरुनि॥१२८॥     
मीमांसा:-
                 रावण ह्या असुराच्या हाती शिवाचे प्राणलिंग गेल्याने, जगाचा विनाश टाळण्यासाठी श्रीविष्णु श्रीगणेशाला बालब्रह्मचाऱ्याचे रुप घेऊन रावणाकडे पाठवितात.(‘पासिनेमात श्री. अभिताभ बच्चन यांनी वेषांतराच्या सहाय्याने बालकलाकार  रुपात अप्रतिम अभिनय प्रदर्शित केलेला आहे.)
           असुरी प्रवृतीचा विश्वाला असलेला धोका श्रीमद् भगवद् गीता संदर्भानुसार,
एताम्  दृष्टिम्  अवष्टभ्य  नष्टात्मानः  अल्पबुद्धयः 
प्रभवन्ति  उग्रकर्माणः  क्षयाय  जगतः  अहिताः  ॥ १६ - ९ ॥
या  ( आसुरी ) दृष्टीचा  आश्रय  घेऊन , बुद्धिभ्रष्ट  झालेले, अल्पबुद्धीचेक्रूरकर्म  करणारे, सर्वांचे  अहित  करणारे  आसुरी  लोक  जगाच्या  नाशासाठीच  जन्माला  येतात .


विचारधन :- ओवी क्रमांक १५२
सहस्रवेद तूं वाचिसी। संध्याकाळीं मार्ग क्रमिसी।
वाटेसी होईल तुज निशी। संध्यालोप होईल॥१५२॥
मीमांसा:-
रावणाच्या जीवनातील यशशिखर  =  रावण हा वेद शास्त्र संपन्न
                                                     विद्वान.      

विचारधन :- ओवी क्रमांक  १८५   
 आवेशोनि रावण देखा। टोले मारी गणनायका।
हास्यवदनें रडे तो देखा। भूमीवरी लोळतसे॥१८५॥  
मीमांसा:-
रावणाच्या जीवनातील यशशिखर ९ =  तुल्यबळ शत्रूशी सामना करणारा
                                                     ‘महापराक्रमी  रावण
                      बालब्रह्मचाऱ्याने  लिंग जमिनीवर ठेवल्याने रावणाच्या हातात आलेले यश, त्याच्यासमोर निसटून गेल्याने, रावण रागावला होता. चिडलेल्या रावणाने त्या लहान मुलास रट्टे मारले. तो लहान मुलगा (बाल गणेश) रडत निघून गेला. परंतु ह्या प्रसंगाची अखेर रावण-श्रीगणेश युद्धाने झालेली दिसत नाही.                  

विचारधन :- ओवी क्रमांक १८९, १९०
नाम पावलें याचि कारणें। महाबळेश्वर लिंग जाणें।
मुरडोनि ओढितां रावणें। गोकर्णाकार जाहलें देखा॥१८९॥
ऐसे करूनि लंकानाथ। गेला, मागुती तप करित।
ख्याति झाली गोकर्णक्षेत्र। समस्त देव तेथें आले॥१९०॥
मीमांसा:-
            रावणाच्या जीवनातील यशशिखर १० = अपयशाने न खचणारा
                                                               प्रयत्नवादी रावण
    रावणाने परत एकदा आपल्या बळाच्या जोरावर जमिनीतील लिंग उपटून काढण्याचा प्रयत्न केला, परंतू त्याला अपयश आले.
आपण नेहमी म्हणतो
दैव देते पण कर्म नेते
रावणाच्या बाबतीत उलट घडले,
कर्माने दिले पण दैवाने नेले
                     तरीही रावण अपयशयाने खचून न जाता,पुन्हा श्रीशंकराला प्रसन्न करण्यासाठी तप करण्यास निघून जातो.
              ह्याच रावणाच्या प्रयत्नवादी वृत्तीमुळे राखेतून जन्मलेल्या फिनिक्स पक्षाप्रमाणे, रावणाच्या जीवनात अशक्य हा शब्द   दिसत नाही.
अशाप्रकारे गोकर्ण ह्या तीर्थक्षेत्राची निर्मिती झाली.
॥श्रीगुरुदेवदत्त॥