Thursday 4 September 2014

शिक्षक दिनानिमित्त्य (दि. ५ सप्टेंबर २०१४)

आमच्या शालेय जीवनाविषयी कृतज्ञता
मार्गी पाऊल पडता खुणावते, मम ती दगडी शाळा
जिच्या सत्संगे बालपणी विहरलो, मुक्त आम्ही बाला

फळा-फुलांनी बहरलेली शोभिवंत होती, ती इमारत
विहरत होता जलामध्ये, सोनेरी मासा भाव मारत

जीवनी विविध कलागुणांचा विकास, हेच खरे शिक्षण
शिक्षणातून भारतीय संस्कृती-परंपरांचे व्हावे सदैव रक्षण

शिक्षण म्हणजे संस्कार जोपासण्या लाभले खंबीर कर्तृत्व
कर्तृत्वाचे शिव-धनुष्य पेलण्या सहकाऱ्यांनी स्वीकारले नेतृत्व

शिक्षण म्हणजे पुस्तकी ज्ञान नव्हे, सुप्तगुणांचा विकास
प्रयत्नाते विकास साधता दिसू लागतो, प्रगतीचा प्रकाश

नृत्य, नाट्य, क्रिडा, गायन, चित्रकला ही विविध अंगे
आनंद निर्मितीतून संस्कारीत, जीवनप्रवाह अखंड रंगे

हेलावते मम मन, जाणवते काही गुरुजनांची अनुपस्थिती
                                                अंतर्मन वदे इथे आहे, निश्चित त्या आत्म्यांची उपस्थिती

शिक्षक दिनी मम शालेय स्मृतींना उजाळा मिळे
सिंहावलोकन करता जीवनाचा खरा अर्थ आज कळे
                                                समस्त माजी विद्यार्थिनी
                                           शासकीय माध्यमिक कन्या शाळा
                                          नासिक ४२२-००२

ताजा कलम :-
गुगल नकाशा यांनी नकाशात तत्परतेने आमच्या शाळेचे नाव Government Girls’ High School फोटो, पत्यासहित विराजमान केल्याबद्दल Google maps ला धन्यवाद

No comments:

Post a Comment