Tuesday 23 December 2014

विषय : विश्वव्यापक परमात्मा ( श्रीगुरुचरित्र आशय - अध्याय क्रमांक १० )


                          ‘श्रीगुरु श्रीपाद वल्लभ’ हे ‘विश्वात्मक’ परमात्मा कुरवपुर या क्षेत्री अदृश्य रुपात असून त्यांचे अनेक अवतार झाले, हा सिद्धांत अध्याय १० मध्ये श्रीगुरुचरित्रकार मांडतात.(ओवी क्रमांक ३, ४)    
                            हा सिद्धांत नामधारक शिष्याप्रमाणे आपल्यासारख्या वाचकांच्या मनात प्रश्नांचे मोहोळ उठवितो. ह्या प्रश्नाचे उत्तर देताना श्रीगुरुचरित्रकार सांगतात,“मी भगवान परशुराम पाहिलाअसे एखादा माणूस उद्या सांगेल. तो त्याचे म्हणणेखरे आहेह्या मतावर अजूनही स्थिर   ठाम असेल.” (ओवी क्रमांक ५)
मीमांसा :-
चिरंजीव = चिर(दीर्घकालिक) + जीव (जगणारा)  = दीर्घायुषी.
                           इतिहासामध्ये अश्वत्थामा, बली , व्यास, हनुमंत, बिभीषण, कृप व परशुराम ह्या व्यक्ती चिरंजीव म्हणजे दीर्घायुषी होत्या.
ह्यापैकी हनुमंत, परशुराम व अश्वत्थामा ह्या तीन व्यक्ती चिरंजीव म्हणजे अजूनही जिवंत आहेत, असा प्रचलित समज आहे.

हनुमंत:- नासिक जवळील अंजनेरी पर्वतावर, मारुती जन्माला आल्याबरोबर, सूर्यबिंबास फळ समजून, सूर्याकडे झेपावला. तेव्हा इंद्राने ह्याच्या अंगावर वज्र   टाकले, तेव्हा मारुतीची हनुवटी भग्न झाली. म्हणून मारुतीरायास हनुमंत हे नाव पडले.
असा हा हनुमंत त्याच्या बलोपासनेच्या संदेशाने  तसेच श्रीरामभक्तीने अजरामर झाला.

परशुराम विष्णुचा अवतार असलेला परशुराम भृगुवंशीय जमदग्नि ऋषींचा पुत्र होय. भृगुवंशातला राम म्हणून परशुरामास ‘भार्गवराम’ असेही म्हणतात. जमदग्नी ऋषींची गाय कार्तवीर्याने नेल्यामुळे, परशुरामाने कार्तवीर्यास मारले.  ह्या घटनेनंतर कार्तवीर्याच्या मुलांनी जमदग्नी ऋषींचा वध केला. परशुरामाने आपल्या वडिलांच्या खुनाचा सूड घेण्यासाठी प्रतिज्ञा करुन पृथ्वी २१वेळा निःक्षत्रिय केली.   परशुरामाने प्रभुरामचंद्रांना युद्धाचे आवाहन दिले. या युद्धात पराभूत झालेल्या परशुरामास प्रभू रामचंद्रांनी जिवंत सोडले. त्यामुळे खजिल झालेला परशुराम श्रीगुरुदेव दत्तात्रेयांचा शिष्य झाला. क्षत्रिय राजांकडून युद्धात जिंकलेले राज्य परशुरामाने कश्यप ऋषींना दान दिले व आपण स्वतः पृथ्वीच्या भूगर्भीय घडामोडीने अरबी समुद्र किनाऱ्यावर निर्माण झालेल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगावर देश वसविण्यासाठी गेला. कोकणचा ‘आद्य पुरुष भगवान परशुराम’ होय.
विद्या व शस्त्र यांच्या संगमातून जग जिंकणाऱ्या  परशुरामाची नोंद इतिहासात अजरामर झाली.

अश्वत्थामा द्रोणाचार्यांचा पुत्र असून उत्तम धनुर्वेत्ता होता. महाभारतकालीन युद्धात पांडवांचा जय झाल्यावर,  अश्वत्थामाने रात्रीच्या वेळी पांडव निद्रिस्त असताना, पांडवांचे पुत्र तसेच धृष्टधुम्न इत्यादि अनेक वीर ठार मारले. अर्जुनाशी  अश्वत्थामाचे युद्ध झाले. ह्या युद्धात पराभूत झालेल्या अश्वत्थामाने, पांडवांच्या नाशार्थ सोडलेले ब्रह्मास्त्र, अभिमन्युपत्नी- उत्तरेच्या गर्भात शिरले. श्रीकृष्णाने ह्या ब्रह्मास्त्राचा नाश करुन गर्भाचे रक्षण केले.
स्वतःचा झालेला पराभव मान्य  करता न आलेला अश्वत्थामा,  प्रतिशोधातून आलेल्या अस्वस्थतेमुळे, दीर्घायुषी होऊनही, ऐतिहासिक व्यक्ती म्हणून   स्वतःचे स्थान निर्माण करु शकला नाही.
                   “चिरंजीव परशुराम म्हणजे अजूनही जिवंत असलेला परशुराम दिसला, हा सिद्धांत ज्याप्रमाणे आपण मान्य करतो, त्याचप्रमाणे श्रीपाद वल्लभ कुरवपुरात आहेत, हा सिद्धांत मान्य करावा” असे श्रीगुरुचरित्रकार म्हणतात.
                   हा सिद्धांत समजावून सांगण्यासाठी श्रीपाद वल्लभांच्या जलसमाधीतून झालेल्या अवतार समाप्तीनंतर प्रसिद्ध झालेली आख्यायनी (दंतकथा) श्रीगुरुचरित्रकार सांगतात.
                    या दंतकथेतील ‘वल्लभेश’ नावाचा ब्राह्मण व्यापार करण्याचा उद्योग करीत असल्याने, श्रीगुरुचरित्रकार त्याला ब्राह्मण न म्हणता ‘व्यापारी म्हणतात’ (ओवी क्रमांक १५)  ह्यावरुन ६५०वर्षांपूर्वी मनुष्याची जात ही जन्मावर आधारीत नव्हती तर त्याच्या कर्मांवर ठरत असावी, असे दिसते.
                           ‘वल्लभेश’  हा श्रीपाद वल्लभभक्त दरवर्षी कुरवपुर यात्रेस जात असे. एकदा   व्यापारास निघण्याआधी  त्याने नवस  केला  की ‘व्यापारात फायदा झाला तर कुरवपुर क्षेत्री ब्राह्मणांना इच्छा भोजन घालून तृप्त करीन.’
         व्यापार यशस्वी झाल्यावर, व्यापारी द्रव्य बरोबर घेऊन कुरवपुर यात्रेस निघालेला चोरांनी पाहिला. यात्रेकरुच्या रुपात चोरही व्यापाऱ्याबरोबर निघाले. कुरवपुरास जंगलमार्गे जात असताना, रात्र झाली. चोरांनी व्यापाऱ्यास मारुन त्याच्याकडचे द्रव्य लुबाडले.
                         हातात खड्ग, त्रिशूळ घेतलेली.  जटाधारी  व्यक्ती अचानक घटनास्थळी आली. जटाधाऱ्याने चोरांना मारुन टाकले. एका चोराने ह्या त्रिशूळधाऱ्याच्या विनविण्या करुन आपले स्वतःचे  प्राण वाचविले. ह्या जटाधाऱ्याने ह्या चोराच्या हातात भस्म देऊन ते व्यापाऱ्यावर शिंपडण्यास सांगितले. (ओवी क्रमांक २८)   
               ब्राह्मण जिवंत झाला. सूर्योदय झाला, जटाधारी अदृश्य झाला. जिवंत राहिलेला चोर ब्राह्मणास गोष्ट रंगवून   सांगू लागला. वास्तविक जटाधाऱ्याच्या हाता पाया पडल्याने, चोरास जीवदान मिळालेले असते, परंतु चोर घडलेली घटना लबाडीने सांगतो,  
तुझ्या निमित्याने मला राखले,अतिशय प्रेमाने धरुन बसविले. भस्म मंत्रून तुला लावून तुझा देह सजीव केला.” (ओवी क्रमांक ३३)  
                         चोराच्या मते, ब्राह्मण शंकराचा भक्त असल्याने, त्रिपुरारीच ब्राह्मण व्यापाऱ्याच्या मदतीला धावून आलेला असावा.
त्रिपुरारि= त्रिपुर + अरि (शत्रू)= श्रीशंकर
त्रिपुर= तारकासुराच्या तीन मुलांनी, ब्रह्मदेवाकडून सोने, रुपें आणि लोखंड यांची आकाश, अंतरिक्ष व पृथ्वी यांवरील अभेद्य फिरती शहरे मागून घेतलीह्या तीनही शहरांना मिळून त्रिपुर म्हणतती शहरे श्रीशंकराने जाळली.
                       जटाधाऱ्याच्या रुपात ईश्वर आपल्या मदतीला आला, ह्यावर व्यापाऱ्याचा विश्वास बसला.   त्याने चोराकडून आपले द्रव्य परत घेतले  . कुरवपुरास जाऊन ‘वल्लभेशने’ श्रद्धेने आपला नवस पूर्ण  केला .
                            “श्रीगुरु श्रीपाद वल्लभ  कुरवपूर क्षेत्री आहेत.” ही श्रीगुरुचरित्रकारांची श्रद्धा या गोष्टीतून दिसून येते.
               भौतिक जगात अवतार घेण्यासाठी श्रीपाद वल्लभ रुपी विश्वात्मक परमात्म्याची उर्जा कुरवपूर ह्या तीर्थ क्षेत्री अस्तित्वात आहे, ह्या श्रद्धेतून  श्रीगुरुचरित्रकार म्हणतात  श्रीगुरुचरित्रकार म्हणतात,
पुढें अवतार असे होणें। म्हणोनि गुप्त, न दिसे कवणा
अनंतरुप नारायण। परिपूर्ण असे सर्वां ठायीं१०-४०॥

                          श्रीमद् भगवद् गीतेतील परमात्मा ह्या शब्दाची व्याख्या पुढीलप्रमाणे

द्वौ  इमौ  पुरुषौ  लोके  क्षरः  च  अक्षरः  एव  च  ।
क्षरः  सर्वाणि  भूतानि  कूटस्थः  अक्षरः  उच्यते ॥ १५ - १६ ॥
अर्थ:-
या  संसारात  नाशवंत  आणि  अविनाशी  असे  दोन  प्रकारचे  पुरुष  आहेतत्यामध्ये  सर्व  प्राणिमात्रांची  शरीरे  नाशवंत  ( क्षर - पुरुष आणि  जीवात्मा  अविनाशी  (अक्षर - पुरुष म्हटला  जातो.
उत्तमः  पुरुषः  तु  अन्यः  परमात्मा  इति  उदाहृतः ।
यः  लोकत्रयम्  आविश्य  बिभर्ति  अव्ययः  ईश्वरः ॥ १५ - १७॥
अर्थ:-
परंतु  या  दोन्ही  पुरुषांपेक्षा  उत्तम  पुरुष  तर  आगळाच  आहे त्यालाच  परमात्मा  म्हटले  जाते तोच  अविनाशी  परमेश्वर  असून तो  तीन्ही  लोकांत  प्रवेश  करुन  सर्वांचे  धारण - पोषण  करतो .
यस्मात्  क्षरम्  अतीतः  अहम्  अक्षरात्  अपि  च  उत्तमः ।
अतः  अस्मि  लोके  वेदे  च  प्रथितः  पुरुष  उत्तमः ॥१५ - १८॥
अर्थ:-
मी  परमात्मा,   क्षर  पुरुषाच्या  अतीत  आणि  अक्षर  पुरुषापेक्षा  उत्तम  असल्यामुळे  या  लोकांत  आणि  वेदांत  पुरुषोत्तम ”  या  नावाने  प्रसिद्ध  आहे .
 थोडक्यात क्षर आणि अक्षर यांच्या पलीकडे जो आहे त्याला परमात्मा म्हणतात, असे आपल्याला म्हणता येईल

क्षर म्हणजे नाशवंत होणाऱ्या सर्व गोष्टींना आपण भौतिक शास्त्राच्या सहायाने अभ्यासू शकतो     यालट अक्षर म्हणजे कधीही नष्ट न होणाऱ्या गोष्टी म्हणजे उर्जा शक्ती.
ही उर्जा शक्ती श्रीभगवद् गीतेनुसार
यावत्  सञ्जायते  किंचित्  सत्त्वम्  स्थावरजङ्गमम्  ।
क्षेत्र  क्षेत्रज्ञ  संयोगात्  तत्  विद्धि  भरतर्षभ  ॥ १३ – २७ ॥
अर्थ:-
हे  भरतश्रेष्ठ  अर्जुना !  जेवढे  काही  निर्जीव अचर आणि   सजीव चर )प्राणिमात्र  उत्पन्न  होतात;ते  सर्व  क्षेत्र (matter) वक्षेत्रज्ञ (energy) यांच्या  संयोगाने  उत्पन्न  होतात ,  हे  तू  जाण .
                                       सुमारे ५००० वर्षांपूर्वी श्रीमद् भगवद् गीतेत वर्णन केलेल्या उर्जा शक्तीचा अभ्यास, भौतिक शास्त्रात इसवी सन १६७० मध्ये जर्मन गणितज्ञ श्री गॉटफ्रा इड लेबनिझ (Gottfreid Leibniz) ह्यांच्या ‘लिव्हिंग फोर्स (Living force)’ ह्या सिद्धांताने सुरु झालेला आढळतो.
इसवी  १८४१मध्ये मेयर ह्या शास्त्रज्ञानी प्रथम केलेली उर्जेची व्याख्या
Energy can be neither created nor destroyed
अर्थ:-
उर्जा उत्पन्न किंवा नष्ट करता येणे शक्य  नाही.
इसवी सन १८४९ मध्ये आयरिश भौतिक शास्त्रज्ञ थॉमस विल्यमस् यांनी उर्जेचे वर्णन करताना म्हटले आहे
Nothing can be lost in nature --- no energy can be destroyed
अर्थ:-
निसर्गात कोणतीच गोष्ट नष्ट  होणे शक्य नाही.------- उर्जा नष्ट करता येणे शक्य नाही.
Fundamental,irreducible primordial energy exists in the absence of matter,
but matter is entirely dependent  upon nonmaterial  primordial energy
and cannot exist in the absence of primordial energy.
अर्थ:-
भौतिक गोष्टी अस्तित्वात नसतानाही, मूलभूत संक्षिप्त न करण्यासारखी, आदिम उर्जा अस्तित्वात आहे  परंतु भौतिक गोष्टींचे अस्तित्व पूर्णतः ह्या अभौतिक आदिम उर्जेवर  अवलंबून असते तसेच ह्या आदिम उर्जेच्या अस्तित्वाविना भौतिक गोष्टी  अस्तित्वात येणे शक्य नाही.
                       आजच्या आधुनिक विज्ञानयुगाचे ‘पितामह’ असलेले थोर तत्वज्ञ तसेच भौतिक शास्त्रज्ञ श्री अल्बर्ट आइनस्टाइन हे श्रीमद् भगवद् गीता नियमित वाचत असत. श्रीमद् भगवद् गीतेविषयी आपले मत नोंदविताना श्री आइनस्टान म्हणतात,
“When I read the Bhagwad-gita and reflect about how God created this universe everything else seems so superfluous”
अर्थ:-
“मी जेव्हा भगवद् गीता वाचली आणि (भगवद् गीतेत सांगितलेल्या)  परमात्म्याने कशी विश्व निर्मिती केली? (ह्या विचारांवर) मी खोलवर जाऊन विचार केला, तेव्हा मला इतर (सर्व विश्वनिर्मितीविषयक गोष्टी) अवाजवी असल्याचे दिसून आले.”
 ‘The World as I See it’ ह्या  स्वलिखित पुस्तकात आइनस्टाइन म्हणतात,
‘I maintain that the cosmic religious feeling is the strogest and noblest motive for Scientific research.’
‘माझे मत आहे की वैश्विक श्रद्धेवरील विश्वास हीच शास्त्रीय संशोधनामागची जबरदस्त आणि प्रामाणिक प्रेरणा आहे.’
            व्यावाहारिक जगातील लोकांना, आध्यात्मिक भक्तीमार्गाकडे   नेताना, श्रीगुरुचरित्रकारांची विश्वात्मक परमात्मावरील दृढ श्रद्धा पाहून, माझे मन म्हणते,
विश्वात्मक परमात्मा। जाणावया मी किमात्मा।
अपार महिमा तुम्ही सांगता। अनन्य श्रद्धेने नमन करीतसे॥

                                      ॥ श्रीगुरुदेवदत्त॥

Wednesday 17 December 2014

आध्यात्मिक संदीपन

विषय : आध्यात्मिक संदीपन
                                    श्रीगुरुचरित्र अध्याय ५, ८, ९ मध्ये  श्रीपाद श्रिया वल्लभांच्या चरित्र कथा सांगितलेल्या आहेत. ह्या कथांमधून श्रीपाद वल्लभांनी अध्यात्म मार्गाने सर्व समाजात सम (सारखे) दीपन (जागृती निर्माण करण्याचे काम) केलेले दिसते.
दीपन ह्या शब्दाचा अर्थ चेतविणे असा आहे.
  चेतविणे ह्या शब्दातील चेत = जागृत , पेट 
 (त्यामुळे चेतविणे म्हणजे पेटवणे किंवा उत्तेजित करणे ह्या अर्थी व्यवहारात वापरला जातो.
तसेच चेतविणे म्हणजे जागृत करणे असल्याने
दीपन =  चेतविणे= जागृत करणे)
           सर्व सामान्य माणसास आध्यात्मिक मार्गे  प्रवृत्त करताना
निसर्ग निर्मित  लिंग भेद (अध्याय क्रमांक ५)
तिमंद बुद्धीने येणारे अपंगत्व (अध्याय क्रमांक ८)
तसेच
मनुष्य निर्मित जात, धर्म भेद (अध्याय क्रमांक ९)
 दूर करण्याचे  काम श्रीपाद वल्लभांनी केलेले दिसते.
 ----------------------------------------------------------------------
 (अध्याय क्रमांक ५)
निसर्ग निर्मित लिंग भेद : स्त्रीचा सन्मान करणारे श्रीपाद वल्लभ:-
                     श्रीपाद वल्लभांचा जन्म, आपळराज व सुमता या ब्राह्मण दांपत्याच्या घरी सध्याच्या आंध्रप्रदेशातील पीठापूर गावी झाला (ओवी क्रमांक १०, ११,  ४६).                                   
                    वयाच्या  ७ व्या वर्षी   मुंज  झाल्यावर श्रीपाद आचार, व्यवहार प्रायश्चित, वेदान्तावर भाष्य करुन वेदार्थ  इत्यादी ज्ञान तसेच चारही वेद सांगायला लागले. गुरुगृही शिक्षणास न जाता हे प्रचंड ज्ञान सांगणारा हा ७  वर्षीय मुलगा पाहून गावातले लोक आश्चर्य चकित झाले व हा मुलगा पुढे निश्चित अवतार (म्हणजे महात्मा) होईल, असे म्हणू लागले.
                         तत्कालिन समाजाने अंधश्रद्धेने ह्या ७ वर्षीय श्रीपादांची व्यक्ती पूजा केलेली दिसत नाही (ओवी क्रमांक ४९ )
              वर्षाच्या श्रीपादास मातापिता   म्हणू लागले, “तुझा विवाह करु”.
                   त्यावर श्रीपादांनी व्यक्त केलेले विचार ”वैराग्यस्त्री हिच आमची नेमस्त (वधू) आहे. तिच (विरक्ती) इच्छा आम्ही धरलेली आहे.  दुसऱ्या सर्व स्त्रिया आम्हाला मातेसमान आहेत. मी तापसी, ब्रह्मचारी आहे. योग - लक्ष्मी शिवाय मला दुसरी स्त्री चालत नाही, हे निश्चित समजा. ’श्रियावल्लभमाझे नाव आहे.” (ओवी क्रमांक ५३, ५४, ५५)
                  पुरुषप्रधान संस्कृती असलेल्या आपल्या समाजात सर्वसामान्यपणे स्वतःचे नाव नंतर (मध्यम नाम) पित्याचे किंवा पतीचे नाव व शेवटी आडनाव किंवा गावाचे नाव लिहिण्याची प्रथा दिसून येते.
हंगेरी सारख्या मातृप्रधान राष्ट्रात मध्यम नाम आईचे लावतात.
हल्ली काही लोक आपल्या आईचे नाव आडनावाच्या आधी (मध्यम नाम)  लिहिताना दिसतात.
                         श्रीपाद वल्लभांनी इसवी सन सुमारे १३२८ च्या सुमारास “मी स्वतः विष्णु आहे” असे न सांगता आपल्या पत्नीची ओळख आपल्या नावात दिलेली दिसते. श्रियेचा वल्लभ म्हणजे लक्ष्मीचा नवरा होय. आजच्या जमान्यातही पत्नीकडे पाहाण्याचा हा नवीन दृष्टिकोन आहे असेच म्हणावे लागेल.
                          श्रीपाद श्रिया वल्लभांनी लग्न केले नाही परंतु ‘आपल्या पत्नीचा सन्मान करा’ हा संदेश समाजास दिलेला दिसतो.
-------------------------------------------------------------------- 
(अध्याय क्रमांक ८)
तिमंद बुद्धीने येणारे अपंगत्व :तिमंदत्व दूर करण्यासाठी मातेचे कथारुपी केलेले प्रबोधन
                   श्रीपाद वल्लभांनी हिमालयातील बदरीनाथ पर्यंत विविध तीर्थ स्थानांना भेट देऊन नंतर श्रीगिरी  पर्वत तसेच गोकर्ण क्षेत्री काही काळ वास्तव्य केले, नंतर कृष्णा नदीकाठची कुरवपुर ही कर्मभूमी निश्चित केलेली दिसते.
                    कुरवपुर क्षेत्री जीवनास कंटाळेली एक विधवा आई (अंबिका नावाची सुशील वर्तनाची ब्राह्मण स्त्री) आपल्या मतिमंद मुलासह श्रीपाद वल्लभांकडे असा मंत्र मागते” की, ज्याच्यामुळे जन्मोजन्मीच्या क्रमांत असा मंद बुद्धीचा पुत्र होऊ नये.
                  श्रीपाद वल्लभ ह्या मायलेकरांना कोणताही मंत्र  देत नाहीत, तर ते स्कंदपुराणातील उज्जनी नगरीतील राजाची गोष्ट सांगतात.   ह्या गोष्टीतील ‘चिंतामणी’ ह्या माणकाचे वर्णन तसेच शंकर प्रसन्न झाल्यावर रत्न जडीत झालेले भातुकलीतील शिवमंदीर  ह्या काल्पनिक गोष्टींचे आकर्षण मानवी मनास असते.
                   गोष्टीतील चंद्रसेन राजास त्याचा शिवभक्त मित्र ‘मणिभद्र’ हा चिंतामणी हे माणिक भेट   देतो. हे माणिक मिळविण्यासाठी आजुबाजूचे राजे एकत्र येऊन चंद्रसेन राजाच्या उज्जनी नगरीस वेढा घालतात.    माणिक मिळविण्याच्या हेतूने प्रेरित झालेल्या राजांच्या साम, दाम, दंड, भेद ह्या  अस्त्रांमुळे चंद्रसेन राजा सर्व बाजूंनी   संकटात अडकतो.   चंद्रसेन राजा अशा कडेलोटाच्या संकटकाळी शनिप्रदोषाची शिवपूजा करण्यास बसतो.
                 ‘चंद्रसेन राजाप्रमाणे प्रत्येक व्यक्तीने संकटकाळी  निरुपायस्थितीत परमेश्वरावरची श्रद्धा ढळू देऊ नये’ असा संदेश श्रीपाद वल्लभ मायलेकरांना देतात.
       चंद्रसेन राजाची  पूजा पहाण्यासाठी आलेल्या  गवळणींची मुले शिवपूजा हा भातुकलीचा खेळ घरी परत आल्यावर खेळतात. चंद्रसेन राजाच्या शिवपूजेचे अनुकरण गवळणींच्या मुलांनी भातुकलीच्या खेळात केलेले दिसते.
                ‘मुलाच्या अनुकरणशीलतेचा फायदा घेऊन मतिमंद मुला  सुस्थापित करता येईल’ हा विचार ह्या गोष्टीत सांगितलेला असावा.
                         रात्र झाल्यावर सर्व मुले आपल्या मातांबरोबर घरी जातात. परंतु एक मनस्वी मुलगा खेळ सोडून घरी येण्यास तयार नसल्याने, त्याची आई तो खेळ रागाने मोडून घरी जाते. रडून दमलेल्या मुलावर रत्नजडीत शिवमंदिरासह शंकर भगवान प्रसन्न होतात.
                       बालक श्रीशंकरास विनवितो,”माझ्या आईला रागावू नका. तिने प्रदोषाची पूजा मोडली. तिला क्षमा करा.” शंभू महादेव “तुझी आई पुढील जन्मी परमेश्वरी अवताराची माता समजली जाईल” असा वर बालकाच्या मातेस देतात तसेच ‘सुख समृद्धीचा आशिर्वाद’ त्या  बालकास न मागता देतात.
                 ‘मुलाच्या भल्यासाठी वेळ प्रसंगी माता रागावल्यास मूल आईवर राग धरत नाहीत’,हा संदेश गोष्टीतील अंबिका ह्या स्त्रीला श्रीपाद वल्लभ देतात.
तिमंद मुलांना घडविताना मातेच्या जागरुक संगोपनाचा मंत्र श्रीपाद वल्लभ यांनी ह्या गोष्टीतून अधोरेखीत केलेला असावा.
 --------------------------------------------------------------------
 (अध्याय क्रमांक ९):
मनुष्य निर्मित जात, धर्म भेद  न मानता मोहाचा क्षय करा हा संदेश देणारे श्रीपाद वल्लभ  
                       कुरवपुरक्षेत्री श्रीपाद वल्लभ स्नानासाठी तर एक धोबी कपडे धुण्यासाठी रोज कृष्णानदीवर जात असत. रोजच्या होणाऱ्या गाठीभेटीतून श्रीपाद वल्लभांकडे जातीभेद नसावा, असे दिसते. धोब्याच्या मनातील दुःख ओळखून ‘तू राजवैभव उपभोगशील’ हा आशीर्वाद त्यांनी धोब्यास दिला. धोब्याच्या मनात ‘आपण राजा व्हावे’ अशी प्रामाणिक इच्छा होती.
                          तत्कालीन समाजाने श्रीपाद वल्लभांविषयी शंका घेतलेल्या असाव्यात, त्यामुळे धोब्याची मनःस्थिती द्विधा झालेली असावी. धोब्याने लोक घेत असलेल्या शंका सोडून दिल्या.  निश्चित भक्त झालेला धोबी, श्रीपादवल्लभांचा सेवक झाला.( ओवी क्रमांक  ११, १२,१३).
                            
                              एके दिवशी कृष्णा नदीत जलक्रिडा करण्यास आलेला मुसलमान राजा पाहून, धोबी स्वतःच्या कष्टमय आयुष्यावर खिन्न झाला. ह्या धोब्याला श्रीपाद वल्लभ सांगतात, “तू आता पुढील जन्मात मुसलमान राजघराण्यात जन्माला येऊन राज वैभव उपभोगशीलसर्व इंद्रिये शांत करावीत, नाहीतर मन स्वच्छ होत नाही. पुढील जन्मांमध्ये केवळ (ह्या इंद्रियांच्या अतृप्त इच्छा) पीडा करतात (त्रास) देतात.” (ओवी क्रमांक  २९)
                             ह्याचा अर्थ माणसाला मोक्ष मिळवायचा असल्यास, प्रथम मोहाचा क्षय करावयास हवा. त्यामुळे मोक्ष म्हणजे मोहाचा क्षय असे म्हणता येईल.
                          मोहाचा क्षय करणे म्हणजे मोक्ष मिळविणे हा संदेश ह्या गोष्टीतून श्रीपाद वल्लभांनी दिलेला दिसतो.
                        श्रीपाद वल्लभांनी धोब्याला कथन केलेला ‘श्री नृसिंह सरस्वती’ हा अवतार श्रीपाद वल्लभ अवतार समाप्ती नंतर सुमारे २८ वर्षांनी  झालेला इसवी सन १३७८ ते १४५८ ह्या काळात जगाने पाहिला.
                   नृसिंह सरस्वती वैदुर(बिदर)च्या मुसलमान राजास भेटलेले आहेत. हा मुसलमान राजा पूर्वजन्मातील श्रीपाद वल्लभांचा शिष्य धोबी होय. मनुष्यास जात, धर्म ही बिरुदे जन्मानंतर चिटकवली जातात. हेच ह्या कथेतून श्रीपाद वल्लभांनी सांगितलेले दिसते. ते त्या त्यांच्या शिष्यास पुढील जन्मी स्वधर्मात बांधीत नाहीत. (ओवी क्रमांक ३०)   
श्रद्धा, अंधश्रद्धा आणि कर्मकांड प्रत्येक धर्मात काळ आणि परिस्थितीनुसार भिन्नभिन्न आढळून येतात पण तत्त्वज्ञानामध्ये एकरुपताच आढळून येते.
वैदिक सनातन धर्मात ब्रह्मन् म्हणजे परमात्मा वा परमेश्वर आहे. इस्लाम मध्ये त्याला अल्लाह् म्हणतात तर ख्रिस्तीधर्मात त्याला आकाशातील पिता (बाप्पा) म्हणतात.

                      "तुझ्या अंतकाळी (मृत्युसमयी) आम्ही तुला भेट देऊ. आम्हाला भेटण्याच्या (तुझ्या) पूर्ववासनेमुळे (आत्ताच्या जन्मात तू व्यक्त केलेल्या इच्छेमुळे) आम्हाला यावे लागेल.” (ओवी क्रमांक ३३ ).  
             माणसाच्या मनातील प्रामाणिक इच्छा परमेश्वरास पूर्ण करावी लागते. तिथे जात, धर्म, लिंग भेद आड येत नाही.
                              अश्विन वद्य द्वादशी ह्या दिवशी सिंह राशीत मघा नक्षत्र असताना, श्रीपाद वल्लभांनी स्वानंदाने कुरवपुरक्षेत्री कृष्णा नदीत जलसमाधी घेऊन आपला अवतार संपविला.
                       श्रीपाद वल्लभ कुरवपुरास रहात असताना, त्यांची थोरवी तत्कालीन लोकांना (समाजास) समजली नाही. नंतरच्या काळात  श्रीपाद वल्लभ  प्रसिद्ध झाले. (ओवी क्रमांक ४२).
                     श्रीपादराव हे त्रयमूर्तिंचा (श्रीदत्तात्रेयांचा) अवतार ठरविलेला आहे (मानलेला आहे). (ओवी क्रमांक ४९)
 ----------------------------------------------------------------------
                            श्रीपाद वल्लभ हा अवतार इसवी सन १३२० ते १३५० अशा ३० वर्षांच्या कालखंडात झाला. काळाच्या पुढे असणारा हा द्रष्टा तत्कालीन समाजास समजला नाही. त्यांनी धोब्याला सांगितल्यानुसार इसवी सन १३७८ ते १४५८ ह्या कालखंडात नृसिंहसरस्वतींच्या रुपाने समाज मार्गदर्शक अवतार समाजाने अनुभवल्याने, श्रीपाद वल्लभ यांना तसेच त्यांचे वास्तव्य असलेल्या कुरवपुर ह्या त्यांच्या कर्मभूमीस अलौकिक प्रसिद्धी मिळाली.
अलौकिक ह्या शब्दातील
लोक म्हणजे मनुष्य लोक अथवा पृथ्वीवरील मानवी जीवन होय.
लौकिक म्हणजे पृथ्वीतलावरील सामान्य प्रसिद्धी अथवा कीर्ति अथवा प्रतिष्ठा.
अलौकिक म्हणजे असामान्य प्रसिद्धी अथवा कीर्ति अथवा प्रतिष्ठा.
                              ‘ किम् कर्तव्य मूढः ‘ही समाजाची सद्यस्थिती पाहिल्यावर,  ‘श्रीपाद श्रिया वल्लभ’ चरणी मम प्रार्थना,
                               लौकिकार्थ अलौकिक कार्य तू केले
भक्तिमार्गे भक्तजना सन्मार्गी तू नेले
विश्वशांतीस्तव पुनश्च प्रवेश तुझा हवा
कर जोडोनी नम्रपणे प्रार्थिते तुज देवा
                   

॥ श्रीगुरुदेवदत्त॥