Wednesday 23 April 2014

त्रिपुरा रहस्य : ज्ञानी लोकांचे प्रकार

                                श्रीगुरुदेवदत्तांनी आपला शिष्य भगवान परशुराम यांस  ज्ञानी लोकांचे तीन प्रकार सांगितले आहेत : -
    ) कनिष्ठ
    ) मध्यम
     ) श्रेष्ठ
श्रीदत्तगुरुंनी सांगितलेली ज्ञानी माणसाची लक्षणे आजही आपण  समाजात पहातो.

) कनिष्ठ ज्ञानी :
                        खालच्या दर्जाचा ज्ञानी माणूस हा त्याच्या स्वतःच्या देहाची काळजी घेत नाही. हे लोक जेव्हा शांत असतात, तेव्हाच फक्त व्यवस्थित असतात. हे लोक जेव्हा आपल्या ज्ञानाचे प्रदर्शन करीत नसतात, तेव्हा त्यांच्यातील पशुतुल्य भावना  म्हणजे शारिरिक जाणीवा प्रखर असतात. एरवी त्यांच्यावर ह्या पशुतुल्य भावनांच्या खूणा दिसत नाहीत, त्यामुळे ते बंधमुक्त असतात.
                    जग ह्या कनिष्ठ दर्जाच्या ज्ञानी लोकांच्या इतके आहारी
जाते की, त्यांच्या दोषांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते. श्रीदत्तगुरु सांगतात, ज्याप्रमाणे काडाच्या किनारीला नक्षीकामासाठी लावलेला रंग कापड धुतल्यावर कपड्यावर पसरतो, तशा ह्या लोकांच्या नैसर्गिक पशुतुल्य जाणीवा, त्यांच्या वागणुकीत येतात. काही काळानंतर जग त्यांचे गुलाम राहू शकत नाही.
                हल्लीचे समाजातील अंधश्रद्धा पसरविणारे बाबा लोक  हे कनिष्ठ दर्जाचे ज्ञानी लोक म्हणायला पाहिजेत. कै. नरेन्द्र दाभोळकर व त्यांची अंधश्रद्धा निर्मूलन समिती, समाजाला ह्या लोकांच्या बळी पडू नका म्हणून झटत असते. परंतू पुण्य मिळविण्याच्या नादात आपला समाजच ह्या लोकांना मोठे करतो व नंतरचे   त्या बाबा लोकांचे होणारे अधःपतन व त्यात बळी जातो तो समाजच. आज सुद्धा बाबाला अटक, मुलगा पळून गेलाह्या बापलेकांच्या अत्याचाराने पिडीत स्त्रीची पोलिसात तक्रार अशा बातम्या वाचून मन उद्विग्न होते.  कनिष्ठ दर्जाच्या ज्ञानी लोकांची उदाहरणे वर्तमानपत्रे, टी. व्ही. यांवरुन आपल्याला समजतात.

ह्या कनिष्ठ दर्जाच्या ज्ञानी बाबांना वेळीच ओळखून खड्यासारखे समाजातून बाजूला करणे, हीच कै. नरेन्द्र दाभोळकरांना खरी आदरांजली होईल व हाच खरा दत्तगुरुंचा जयजयकार असेल.

)मध्यम दर्जाचे ज्ञानी :-
                     मध्यम दर्जाचे ज्ञानी लोक त्यांच्या स्वतःच्या शरीरात गुंतलेले नसतात. खूप काळ तप साधना केल्याने त्यांची मने निर्जीव झालेली असतात. हे लोक काम करीत नाहीत, कारण त्यांनास्वची बाधा झालेली असते, म्हणजे त्यांना अंहकार झालेला असतो. जसा माणूस झोपेत चालतो, बोलतो तशा पद्धतीने हे लोक त्यांच्या असलेल्या किमान जीवनावश्यक गरजांपुरते काम करतात. ते या जगात वावरत नसल्यासारखे जगाच्या पलिकडे स्वतःच्याच धुंदीत वावरत असतात. ह्या लोकांना स्वतःची वर्तणूक कळत असते. हे लोक त्यांच्या वासना व नशीब ह्यानुसार जगात वावरत असतात.

                   कोणत्याही व्यक्तीला मध्यम दर्जाचा ज्ञानी ह्या श्रेणीत टाकण्याचा अधिकार आपला सर्वसामान्य लोकांचा नाही
समाजात काही हुशार ज्ञानी माणसे खरोखरच त्यांच्या ज्ञानाच्या धुंदीत वावरताना दिसतात. त्यांच्याकडे खरे ज्ञान असते परंतु त्यांना जीवन जगण्याची कला येत नाहीत. हेच बहुतेक श्रीदत्तगुरुंनी सांगितलेले, मध्यम दर्जाचे ज्ञानी लोक असावेत.

) सर्वश्रेष्ठ दर्जाचा ज्ञानी :
                     सर्वश्रेष्ठ दर्जाचा ज्ञानी माणसाच्या स्वतःविषयीच्या कल्पना शारीरिक नसतातहे खरे ज्ञानी लोक असतातहे ज्ञानी लोक  आपले काम रथाच्या सारथ्यासारखे करतात. ते कधीही स्वतःला तो रथ समजत नाहीत. कोणत्याही कामात ते गुंतलेले नसतात, परंतू पहाणाऱ्याला मात्र ते त्यात खरोखरच गुंतल्यासारखे दिसतात. ते त्यांचे काम नाटकातल्या नटासारखे चोख करतात. जगाचे माय बाप असल्यासारखे जगाला सांभाळतात.
                   श्रीगुरुदेवांनी सांगितलेले, सर्वश्रेष्ठ ज्ञानी आपल्याला श्रीकृष्णाच्या रुपाने मिळालेले आहेत. महाभारतात अर्जुनाच्या रथाचे सारथ्य करताना, श्रीकृष्णाने अर्जुनास गीता सांगितली. ही भगवद् गीता आजही ज्ञानामृताद्वारे जगाला मार्ग दाखवित आहे.
                      श्रीदत्तगुरुंनी सांगितलेले ज्ञानी लोकांचे प्रकार पाहिल्यावर गुरु करतानाही त्या व्यक्तीतील   गुण दोष नीट पारखून घ्यावेतपूर्वी ब्रूसलीचा  इंग्लिश सिनेमाएन्टर द ड्रॅगनहोता. ह्यात जुदो कराटे शिकायला आलेला शिष्य जपानी प्रथेनुसार गुरुला वाकून अभिवादन करतो. क्षणात गुरु शिष्याच्या डोक्यावर फटका मारतो. शिष्य भेलकांडत खाली पडतो. शिष्याला आपली चूक काय झाली? हे समजत नाही. गुरु त्याला सांगतो, “कोणालाही अगदी गुरुलासुद्धा अभिवादन करताना नजर जागृक पाहिजे, हाच आजचा तुझा धडा.”



Saturday 19 April 2014

त्रिपुरारहस्य : ज्ञान म्हणजे काय ?


एकदा भगवान परशुरामानी श्रीदत्तगुरुंना विचारले,” ज्ञान कशाला म्हणायच? त्याची लक्षणे कोणती?”
श्रीगुरुदेवांनी आपला शिष्य परशुरामाला शिकविलेल्या त्रिपुरारहस्यात ज्ञानाविषयी माहिती दिलेली आहे.
त्रिपुरारहस्यात श्रीगुरुदेव म्हणतात,
                    ज्ञानी माणूस ओळखणे खूप कठीण आहे. त्यासाठी ते उदाहरण देतात, पदार्थाची चव चाखल्याशिवाय तो कसा आहे? हे नुसते पाहून सांगता येत नाही. कोणताही ज्ञानी माणूस हा त्याच्या कपड्यांवरुन बोलण्या- चालण्यावरुन आपल्याला ठरविता येत नाही.
                   ज्ञानी माणसाचे मन शुद्ध व साधेभोळे असल्याने, त्याला वैराग्य, चिंतन, प्रार्थना ह्या सर्व गोष्टी नैसर्गिक असतात. वैराग्य, चिंतन, प्रार्थना ह्या
गोष्टींचे  समाजात आजही खूप अवडंबर  लोक माजविताना दिसतात.
                     परिपूर्ण ज्ञानी माणसावर  मान- अपमान, यश -अपयश यांचा परिणाम होत नाही. सर्वश्रेष्ठ ज्ञानी माणूस द्विधा मनस्थिती न करता खरी उत्तरे  देऊन अत्युच्य सत्य  सांगतो. कोणताही ज्ञानासंबंधी प्रश्न असल्यास हा ज्ञानी माणूस स्वत:हून तो सोडवतो. तो आपल्या ज्ञानाचे प्रदर्शन करीत नाही.
श्रीगुरु सांगतात समाधानी वृती व पवित्र मन त्याच्याकडे असते. कोणत्याही संकटकाळी त्याच्या मनाची शांती ढळत नाही.
                 ज्ञानी माणसाचा कष्ट न करता जगण्याकडे कल असतो, हा दोषही श्रीगुरुदेव सांगतात.
 हे सर्व गुण असलेल्या माणसाला समाजात दांभिकम्हणतात.
                 आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाला खरेच ज्ञान मिळवायचे असेल तर  काय करावे? हे  श्रीगुरुदेवांनी सोप्या शब्दात पायरीपायरीने समजावून सांगितले आहे.
दुसऱ्याला जोखण्यात वेळ घालवू नका, म्हणजे आंधळेपणाने त्यांचे अनुकरण करु नका. कारण काही वेळेला आपल्याला अद्वितीय ज्ञानी माणसाचे गुण असलेल्या व्यक्तीत आजुबाजूच्या परिस्थितीनुसार बदल होतो.
त्यामुळे माणसाने स्वतः ज्ञान मिळविण्याचा प्रयत्न करावा.
ज्ञानी होण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. नवनवीन गोष्टी आत्मसात कराव्या लागतात. कमीतकमी मेहनतीने स्वतःला ज्ञानी म्हणविणारा माणूस आपल्या जुन्या पद्धती अनुसरतो. त्याचे मन नवीन गोष्टींचा स्वीकार करीत नाही. तो सर्वसामान्य माणसासारखा असतो.
( येथे श्रीगुरुदेव आधुनिक काळाबरोबर येणारे नवीन तंत्रज्ञान शिकायला तर सांगत आहेत, असे दिसते.)
ज्ञान मिळविण्यासाठी खूप साधा मार्ग श्रीगुरुदेव सांगतात
ज्ञान मिळविण्यासाठी आधी आपल्या मनोदेवतेला, आपल्या मनाला शरण जा. स्वतःच स्वतःला ओळखायला शिका.
                 आपण आधी आपले गुण दोष ओळखले पाहिजेत. आपल्याला कोणत्या क्षेत्रात गती आहे ते समजले पाहिजे. ह्यासाठी श्रीदत्तगुरु सांगतात, कोणत्याही बाह्य उपायांची किंवा दुसऱ्या व्यक्तीची गरज नसते.
( श्रीगुरुदेवांनी सांगितलेले विचार अगदी practical आहेत.आपले आपल्याच समजते, आपली कोणत्या क्षेत्रात गती आहे? उदहरणार्थ गाणे  किंवा एखादा विशिष्ठ खेळ क्रिकेट वगैरे तसेच गणित, एखादे शास्त्र, अगदी स्वयंपाकसुद्धा
एकदा आपल्याला आपली दिशा कळाली की आपण त्या क्षेत्रातील ज्ञान मिळवू शकतो.)
 इथे म्हणावेसे वाटते,
तुझे आहे तुजपाशी का वणवण फिरशी बाजारी ?
खरी हुशारी ही अज्ञानाच्या बुरख्याखाली झाकलेली असते. तिचे खरे रुप हे विवेकाने अज्ञानाचा बुरखा दूर केला असता दिसते. अर्थात हे चंचल मनाच्या माणसाला अवघड असते.
(आपण पहातो चंचल मनाची व्यक्ती सत्राठिकाणी क्लास लावते, व एक ना भाराभर चिंध्या अशी स्वतःची अवस्था करुन घेते.)
ह्याचाच अर्थ चंचल मन ज्ञान मिळवू शकत नाही त्यामुळे मनातील चंचलता प्रथम दूर केली पाहिजे.
जे लोक स्वतःच्या मनोदेवतेला भक्तीभावाने ओळखतात. ते इतरही विचार मनांत शिरु देतातत्यांना अज्ञानाचा स्वतःच्या  मनावरील बुरखा दूर करणे सहज शक्य होते
    येथे भक्तीभाव  स्वतःच्या मनाशीच वापरायचा आहे कोणत्याही कर्मकांडाची गरज नाही.
(संदर्भ ग्रंथ :
                       1)The Mystery Beyond the Trinity
                           Tiprura Rahasya
                           Translated by
                           SWAMI SRI RAMANANANDA SARASWATHI
                 2)॥श्रीदत्तात्रेय ज्ञानकोश॥ लेखक डॉ. प्र. . जोशी
                     प्रकाशक : श्रीदत्तात्रेय ज्ञानकोश प्रकाशन, पुणे)