Saturday 26 November 2016

कालिया मर्दन : अर्थक्रांती

धन सुद्ध तुझं गोस्त हाये युक्तीमोलाची
तू चाल पुढं तुला रं गड्या भीती कशाची
पर्वा बी कुनाची॥ धृ॥

झेंडा भल्या अर्थाचा जो घेउनि निघाला
भ्रष्टकुटं वाटंमंदी बोचति त्येला
रणही माजंल, तरि बि लढलं शाबास त्येची

                                      धन सुद्ध तुझं गोस्त हाये युक्तीमोलाची
                          तू चाल पुढं तुला रं गड्या भीती कशाची
                           पर्वा बी कुनाची॥ धृ॥

जो वळखितसे नोटम्हंजी मोटि लडाई
अन् इरोधाचं फुलावानी घाव बि खाई
गळ्यामंदी पडंल त्येच्या माळ इजयाची
                                      धन सुद्ध तुझं गोस्त हाये युक्तीमोलाची
                          तू चाल पुढं तुला रं गड्या भीती कशाची
                           पर्वा बी कुनाची॥ धृ॥

                  माननीय पंतप्रधान श्री. नरेन्द्र मोदीजींनी दि. ८ नोव्हेंबर २०१६ रोजी रुपये ५००/= व १०००/=च्या नोटा चलनातून बाद केल्या. देशात नव अर्थक्रांतीचे वारे वाहू लागले.
                 आधुनिक तंत्रज्ञानाकडे समस्त भारताला नेणारी ही अर्थगंगा श्री. नरेंन्द्र मोदीजींनी सुरु करण्याचे धाडसी पाउल उचलले. देशांत वाहू लागलेल्या मतमतांतराच्या प्रवाहात सर्वसामान्य नागरिकाला भ्रष्टाचारमूक्त भारत हवा आहे.

पंतप्रधान झाल्यावर श्री. मोदीजी आपल्या भाषणात म्हणाले,
मै खाऊंगा नही और किसीको खाने नही दुंगा।
ह्या घोषवाक्याचे आचरण प्रत्येक उमेदवाराने केल्यास, दिल्ली सरकारचा हा स्वच्छ कारभार गल्लीपर्यंत पोहोचेल. निवडून आलेल्या उमेदवाराने भ्रष्ट कारभार केला तर श्री. अण्णा हजारे म्हणतात, त्याप्रमाणे मतदार- राजाने त्या उमेदवाराला परत बोलावयास पाहिजे.
                     सुमारे २० वर्षांपासून  अर्थक्रांतीची संकल्पना मांडणाऱ्या श्री. अनिल बोकिलसाहेबांना मनःपूर्वक धन्यवाद.

                        काळ्या धनाचे विष पसरविणाऱ्या कालियाचा समूळ नायनाट आंतरजाल बॅन्किंगद्वारे होवू शकतो. ह्या अर्थक्रांतीमुळे अतिरेक्यांच्या भारतातील उद्योगांना पायबंध बसून, २६ /११ च्या (मुंबई हल्ल्यातील) हुतात्मा वीरांना*  कृतीशील श्रद्धांजली  
आ चंद्र - सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे
 नव अर्थक्रांतीने होवो सुराज्य भारताचे
॥ जय श्रीगुरुदेवदत्त॥
अनुप्रभा, नाशिक


* प्रमुख सुरक्षा अधिकाऱ्यांसह सतरा पोलिसांना  वीरमरण  आले.  
·         तुकाराम ओंबळे - सहाय्यक उपनिरिक्षक, मुंबई पोलिस. यांनीच कसाबवर झडप घालून पकडून ठेवले व स्वत:चे प्राण गमावले.
·         हेमंत करकरे - मुंबई दहशतवाद विरोधी पथक मुख्याधिकारी
·         अशोक कामटे - अॅडिशनल पोलिस कमिशनर
·         विजय साळसकर - एनकाउंटर स्पेशालिस्ट
·         शशांक शिंदे - वरिष्ठ पोलिस निरिक्षक
·         मेजर संदीप उन्नीकृष्णन - एन.एस.जी. कमांडो अधिकारी
·         हवालदार चंदर - एन.एस.जी. कमांडो
·         हवालदार गजेंदर सिंह बिष्ट - एन.एस.जी. कमांडो
·         छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे तीन रेल्वे कर्मचारी गोळीबाराला बळी पडले.
अँड्रियास लिव्हरास   ब्रिटिश उद्योगपती हल्ल्यांत मृत्यू पावले.  जर्मन दूरचित्रवाणी निर्माता राल्फ बर्केई, फ्रेंच उद्योगपती लूमिया हिरिद्जी आणि त्यांचा नवरा हेही मृतांत आहेत.  नरीमन हाउसमध्ये गॅव्रियेल नोआह होल्त्झबर्ग, त्यांची पत्नी रिव्का होल्त्झबर्ग हे मृत्युमुखी पडले.
संदर्भ :-
जुन्या कृष्ण धवल (Black & White) ‘कुंकूचित्रपटातील कालातीत अजरामर गीत
मन सुद्ध तुझं गोस्त --- ‘
गीतकार : शांताराम आठवले
संगीत : केशवराव भोळे
स्वर  : मा. परशुराम

मुखचित्र :- दैनिक लोकसत्ता दि. २६ नोव्हेंबर २०१६