Wednesday 19 March 2014

श्रीगणेशाचे चिंतामणि रुप

श्रीगणेशाचे चिंतामणि रुप  
मुद् गल पुराणात चिंतामणिह्या श्रीगणेशाच्या नावाची व्याख्या दिलेली आहे.
चिंतामणि ह्या शब्दाची व्याख्या सांगताना मनाच्या ५ बिघडलेल्या अवस्था सांगितलेल्या आहेत.
बर्हिमुख व्यक्तीबाहेरच्या जगाचा विचार करणारी व्यक्ती).
२ जास्त बर्हिमुख व्यक्ती बाहेरच्या जगाचाच विचार करताना पापाच्या मार्गाकडे जाऊ शकते.
अंतर्मुख व्यक्ती तिला आपण विक्षिप्त म्हटले आहे.
जास्त अंतर्मुख व्यक्ती तिला एकाग्र म्हटलेले आहे.
५ निष्क्रीय मन ह्याला निरुद्ध म्हटलेले आहे.
मनाच्या ह्या पाचही स्थिती ज्ञानाच्या सहाय्याने नष्ट करतो व  मनाला शांती देतो तो चिंतामणि.
आता आपण बहिर्मुख मनही कसे घातक असते ते पाहू या
शाळेत शिक्षिका म्हणून काम करताना बर्हिमुख झालेली विद्यार्थिनी मी पाहिली. ही मुलगी हुशार होती परंतु तिला दर परिक्षेत कमी मार्कस पडायला लागल्यावर मी तिच्या मैत्रीणींकडे तिची चौकशी केली, तर मला ध क्कादायक समजले. मधल्या सुट्टीत ही मुलगी शाळे बाहेर जाते, ती परत शाळेत दुसऱ्या दिवशीच येते. ह्या मुलीला न रागवता तिच्याकडून कुठे जाते? काय करतेस? ही माहिती मिळविली. ही मुलगी वेश्यावस्तीतील एका मावशीकडे दुपारी जात असे, परंतु ह्या मुलीला वैश्यावस्ती वगैरे काहीच माहित नव्हते. रस्त्यात ओळख झालेली ही मावशी तिचे खूप लाड करीत असल्याने, तिला आवडत होती. मी तिच्या वडीलांना शाळेत भेटायला बोलावून सांगितले, तिला रागावू नका पण तिचे गाव बदला, तिचे जग बदलले तरच ती ह्यातून बाहेर येईल. त्या पालकांनी माझे ऐकले. दोन दिवसात स्वतःची दुसऱ्या गावाला बदली करुन  मुलीला त्या बाह्य जगातून बाहेर काढले.

) बाह्य जगाचा जास्त विचार करणारी व्यक्ती पापाकडे जाते, असे
मुद् गल पुराण सांगते ह्याचे उदाहरण म्हणजे श्रीदत्त शिष्य भगवान परशुराम,  असे आम्हाला वाटते.
--------------------------------------------------------------------
अंर्तमुख व्यक्तीला विक्षिप्त म्हटलेले आहे अशा विक्षिप्त व्यक्तींपासून समाज चार हात दूर पळतो
) नंतरची अवस्था येते ती व्यक्ती जास्तच अंतर्मुख होते. स्वतःच्या कोशात गुरफटायला लागते. जास्त अंतर्मुख मनाला एकाग्र म्हटलेले आहे.
 श्रीदत्तगुरु सांगतात एकाग्र चित्ताने कोणतेही काम करावे, परंतु जास्त एकाग्र होऊ नये म्हणजे विचारांच्या भोवऱ्यात मनाला गुरफटू देऊ नये यासाठी श्रीदत्तगुरुंनी कोळी या किड्याचे उदाहरण दिलेले आहे. कोळी हा किडा आपल्या लाळेने जाळे विणतो व त्या स्वतःच्या जाळ्यात स्वतः अडकतो, तसेच मनालाही जास्त स्वतःत गुरफटू देणे चांगले नाही, त्यामुळे बाहेरच्या जगाचा संपर्क तुटतो, माणूस शेखमहंमदी करू लागतो अशा माणसाला लोक मूढ म्हणतात. समाज तिच्याकडे एक मूढ, मूर्ख व्यक्ती म्हणून पहातो.
) ह्या नंतर अंर्तमुखतेचा कडेलोट होतो ती व्यक्ती निष्क्रीय होते.
हल्ली किशोर वयातील मुले अंर्तमुखतेचे बळी पडताना दिसत आहेत. ही मुले विचारांनी   परिपक्व न झाल्याने आपल्या कोशात गुरफटतात, परंतु त्यांच्या आजुबाजुच्या लोकांनी पौगंडावस्था म्हणुन दुर्लक्ष करु नये, त्यांचे प्रश्न समजावून घ्यावेतशिकवणीला येणारा एक विद्यार्थी निष्क्रीय   झालेला शिकवणीच्या बाईंना आढळला. त्या बा ईंनी त्या मुलाच्या आई वडिलांना बोलावून ह्या मुलाला ताबडतोब मानस रोग तज्ञाकडे घेऊन जा म्हणून सांगितले. ते पालक मुलाला मानस रोग तज्ञाकडे घेऊन गेले. डॉक्टरांनी त्याच्या अंर्तमुखतेचे कारण त्याच्याकडून गप्पा मारुन काढून घेतले. मित्रांबरोबर अश्लील सीडी पाहिल्याने घरी खूप बोलणी बसली. त्यातून ह्या सरळ मार्गी मुलाला आपण काहीतरी मोठे पाप केले, असे वाटायला लागले. वेळीच उपचार झले म्हणून तो मुलगा सावरला नाहीतर डॉक्टरांच्या मते ह्या मन खाण्याचा शेवट आत्महत्त्येत झाला असता.

जग झपाट्याने बदलत आहे मुलांचे  प्रश्न रागावून बंद करण्यापेक्षा मोठ्या लोकांनी त्यांच्याशी नीट संवाद साधला तर पुढे पश्चाताप करण्याची वेळ येत नाही.
 श्रीगणेशाचे चिंतामणि रुप आपल्याला सांगत असते :
मन रहाण्यासाठी मनाला अंतर्मुख किंवा बहिर्मुख होण्यापासून थांबवायला पाहिजे.
                                                                     समाप्त
दिनांक २० मार्च २०१४
(संदर्भ ग्रंथ : What is the implied meaning of the many Names of Lord Ganapati?
                   By Hindu Janjagruti Samiti)




No comments:

Post a Comment