Monday 3 March 2014

विद्या व ज्ञान या संकल्पना : अज्ञात पूर्वजांची देणगी

                                                                                 भाग ३ रा
श्रीगणेशाचे विद्याधर रुप : ‘विद्याधर ह्या नावातीलविद्याशब्दाची व्याख्या : -
१)   संस्कृत डिक्शनरी लेखक  M.Monier – Williams पान नंबर १६३ नुसार 
विद्या या शब्दाचा अर्थ Science (विज्ञान), Learning (शिक्षण),  
                                Scolarship (शिष्यवृत्ती),Phylosophy (तत्वज्ञान)
२)   काही लोकांच्या मते विद्येचे चार भाग आहेत :-
त्रयी  - ग्वे , सामवेद आणि यजुर्वेद
आन्विक्षिती - तर्कशास्त्र जीवन शास्त्र
दंडनीति - लोक संचलित करण्याचे शास्त्र
वार्ता - व्यावहारिक कला / शेती, व्यापार, औषध इत्यादी विषयक विज्ञान
३)   सूर्यदेवाचा मुलगा राजा मनू याने  ‘अध्यात्म  विद्याही पाचवी विद्या सांगितली.
अध्यात्म - आत्म ज्ञान, मूलभूत अध्यात्मिक सत्य
श्रीमद् भगवद् गीतेत श्रीकृष्ण सांगतात,
सर्गाणाम्  आदिः  अन्तः    मध्यम्    एव  अहम्  अर्जुन
अध्यात्मविद्या  विद्यानाम्  वादः  प्रवदताम्  अहम् ॥ १ - ३२
अर्थ : हे  अर्जुनासृष्टीचा  आदी  अंत  आणि  मध्य  मीच  आहेसर्व  विद्यांमध्ये  अध्यात्मविद्या वाद     करणाऱ्यांमध्ये     तत्त्वनिर्णयासाठी     केला     जाणारा     वाद  
( तत्त्वबो )  मीच  आहे.
श्रीगुरुचरित्रकार अध्याय पहिलामध्ये श्रीगणेशाला वंदन करताना म्हणतात,
सकळ मंगल कार्यासी। प्रथम वंदिजे तुम्हांसी।
चतुर्दश -विद्यांसी। स्वामी तूचि लंबोदरा॥७॥
ह्या ओवीचा अर्थ  : सर्व मंगल कार्यारंभी तुला प्रथम वंदतात (पूजा करतात).  हे लंबोदरा , तू
१४ विद्यांचा स्वामी आहेस.
 ह्या १४ विद्या पुढीलप्रमाणे  :  चार वेद = ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद
                                       सहा वेदांगे, पुराणे, मीमांसा (पूर्व आणि उत्तर),
                                        न्याय शास्त्र, धर्म शास्त्र

अविद्या : अनित्य, अपवित्र, दुःखकारक आणि अनात्मा यांना नित्य, पवित्र, सुखदायक आणि  शाश्वत मानणे याला अविद्या म्हणतात.
अविद्येच्या उलट तिला विद्या म्हणतात.
आधुनिक शास्त्रात अणुशक्ती म्हणजेविद्याव अणुबॉम्ब म्हणजेअविद्याम्हणता येईल.

ज्ञान ह्या शब्दाचा शब्दकोशातील अर्थ जाणीव, विषयाचे आकलन, माहिती होय.
ह्याचाच अर्थ
विद्या म्हणजे मूलभूत शास्त्र
ज्ञान म्हणजे ह्या विद्येची (अविद्येची नव्हे) शास्त्रीय जाणीव, विषयाचे आकलन, माहिती
दि .२ मार्च २०१४                                                                       क्रमशः


संदर्भ ग्रंथ सूची :
           by Shri  Shrikant Hanumant Joshi
    
2)What is the implied meaning of the many Names of
        Lord       Ganapati? By Hindu Janjagruti Samiti


1 comment:

  1. ‘विद्याधर गणपति’ आपल्याला जगातील विद्यांचा ठेवा सांगतो तर ‘चिंतामणि गणपति’ विद्येतून मिळणाऱ्या ज्ञानाच्या सहाय्याने मनाच्या बिघडलेल्या स्थिती सुधारुन मनःशांती मिळविण्याचा मार्ग दाखवितो.
    विद्या (शास्त्र) व ज्ञान (शास्त्रीय दृष्टीकोन) ह्यांच्या जनकांनी- प्राचीन शास्त्रकर्त्यांनी कोणत्याही शास्त्रीय सिद्धांतास(Theory) स्वतःची नावे दिलेली दिसत नाहीत. काळाच्या ओघात हे प्राचीन शास्त्रज्ञ अज्ञात राहिले परंतू श्रीगणेशाच्या रुपात (विद्याधर व चिंतामणि) ही अजरामर शास्रे त्यांनी आपल्या हवाली केली.
    ‘ अज्ञात प्राचीन शास्त्रज्ञांना सलाम ’

    ReplyDelete