Saturday 10 May 2014

त्रिपुरा रहस्य : ज्ञानी व्यक्तीतील लक्षणे

                                         
 


श्रीदत्तगुरुंनी आपला शिष्य भगवान परशुराम, यास ज्ञानी व्यक्तीत आढळणारी लक्षणे सांगितली :-
) वैराग्य वृत्ती : श्रीगुरुदेवांच्या मते वैराग्यवृत्ती शिकता येत नाही. ती मुळात असावी लागते.
) खरा ज्ञानी माणूस आपल्याला मिळालेले ज्ञान दुसऱ्याला समजावून सांगतो.
आपण खूपदा पहातो, लोक हुशार असतात परंतू ती हुशारी किंवा तो विषय ते दुसऱ्याला सांगू शकत नाहीत.
                  श्रीदत्तगुरु सांगतात, सच्चा भक्ताकडे ईश्वरदत्त वैराग्यवृत्ती असल्याने, तो ह्या मनोदेवेतेमागचे शास्त्र समजू शकतो व इतरांना समजावून सांगू शकतो.”
श्रीदत्तगुरु सांगत असलेली वैराग्यवृत्ती क्वचितच आढळते. नेहमी आपण पहात असतो, ज्ञानी माणूस हा त्याच्या ज्ञानावर स्वतःचा हक्क असल्याच्या अविर्भावात असतो.
 वैराग्यवृत्तीची ज्ञानी व्यक्ती :  महिला शास्त्रज्ञ मादाम मारी क्युरी.
त्यांनी रेडीयमह्या किरणोत्सर्गी मूलद्रव्याचा शोध लावल्यावर लोकांनी त्यांना विचारले,”तुम्ही याचे पेटंट का घेत नाही?” त्यांचे उत्तर त्यांची वैराग्य वृत्ती दर्शविते. त्यांनी सांगितले, “निसर्गाने कुठे पेटंट घेतले आहे?    त्या निसर्गातील एका घटकाचे पेटंट मी कसे घेऊ?”  ह्या किरणोत्सर्गी शोधामुळे कॅन्सर सारख्या दुर्धर आजारावर Radiation चे उपचार मिळून वैद्यकीय क्षेत्रावर अनंत उपकार झालेले आहेत.
                     ह्याच वैद्यकीय जगतातील काही परदेशी ज्ञानी लोकांनी पिढ्यांपिढ्या चालत असलेल्या आजीच्या बटव्यातील निर्जंतूक हळदीचे पेटंट घेतले.
                   हल्लीच्या पिढीला आजीचा बटवा म्हणजे काय असतो? हे माहिती नाही .पूर्वी एकत्र कुटुंबपद्धत असल्याने घरोघरी आजी आजोबा, आई वडील, आत्त्याकाका काकू, मुलेबाळे मिळून जवळ जवळ १० ते १५ लोक एकत्र रहात असत. हल्लीसारखे उठसूठ डॉक्टरकडे न जाता आजीच्या बटव्यातील घरगुती औषधे देत असत. या बटव्यात जायफळ, मायफळ, वेखंड, हळद, सूंठ, दालचिनी, रगत रोडा, लवंग वगैरे औषधी वस्तू असत. ह्या नैसर्गिक वस्तू औषध म्हणून वापरल्याने आजार बरे होत असत. तसेच शरीरावर साइड इफेक्ट होण्याची धास्ती रहात नसे.
                     श्री. रघुनाथ माशेलकर हे खरे  ज्ञानी असल्याने  जगाला हळदीवर पेटंट घेणे कसे गैर आहे, हे पुराव्यानिशी सांगू शकले. यंदाचे पद्मविभूषण त्यांना देऊन आपल्या सरकारने त्यांच्या कार्याचा गौरव केला.
                    दि. १३ फेब्रुवारी २०१४ रोजी यंदाचामोहन धारिया राष्ट्रनिर्माण पुरस्कार डॉ. रघुनाथ माशेलकर यांना जाहीर झालेला आहे. १ लाख रुपये रोख, शाल, श्रीफळ आणि मानचिन्ह हे या पुरस्काराचे स्वरुप असून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या लौकिक कार्याचा ठसा उमटविणाऱ्या व्यक्तीला दरवर्षी हा पुरस्कार दिला जाणार आहे. डॉ. माशेलकर हे वनराईच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष आहेत.
                       आयुष्यातील कमीत कमी १२ वर्षे अनवाणी पायांनी चालणाऱ्या, सार्वजनिक दिव्याखाली अभ्यास करुन ज्ञानवंत झालेल्या डॉ. माशेलकरांना न्युटनने स्वाक्षरी केलेल्या पुस्तकात स्वाक्षरी करण्याचा सन्मान इंग्लंडमध्ये शास्त्रीय जगाने दिला आहे
                  अशा ह्या श्रेष्ट ज्ञानवंतास - डॉ. रघुनाथ माशेलकर यांना श्रीगुरुचरित्र आशय - निधीप्रकल्पातर्फे शुभेच्छा.
)ज्ञानी माणूस आधी स्वतःच्या मनोदेवतेचे शास्त्र ओळखतो. नंतर तो ते शास्त्र दुसऱ्याला समजावून सांगायला लागतो व तिथे त्याला तो सांगत असलेल्या गोष्टीतील सत्य समजते.
आपण विद्यार्थी दशेत शिकतो परंतू एखादा विद्यार्थी त्याचे शिक्षण संपल्यावर जेव्हा शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांपुढे उभा रहातो तेव्हा तो दुसऱ्यांदा शिकतो. शिकत असताना त्याने शिकलेल्या गोष्टी दुसऱ्याला  समजावून सांगताना त्याला त्या गोष्टींच्या मूळ गाभ्यापर्यंत जावे लागतेअसाच शिक्षक विद्यार्थी प्रिय होतो .कारण मुळातला गाभा (ज्याला श्रीदत्तगुरु गोष्टी मागचे सत्य )समजला नाही  तर दुसऱ्याला त्या गोष्टी कशा शिकविणार?
                       ) श्रीगुरुदेव ज्ञानी माणूस हा शेवटी जीवनमुक्त कसा होतो ? ते सांगतात.
                          ज्ञानी माणुस इतर  व्यक्तीमधील शिव म्हणजे पवित्र्य ओळखायला लागतो. त्याच्यावर आनंद व दुःख यांचा परिणाम न झाल्याने तो खरोखरच जीवनमुक्त होतो. ही सर्व मनाची ज्ञानातून येणारी अत्युच्य स्थिती भक्तीमार्गातून येते, म्हणून श्रीदत्तगुरु भक्तिमार्ग हा सर्वश्रेष्ठ मार्ग आहे.
               श्रीगुरुदेव सांगतात ज्ञान मिळविण्यासाठी परमेश्वरी कृपेची नितांत गरज असते.
खुपदा आपण पहातो विद्येमुळे मिळणाऱ्या यशाला नशीबाच्या साथीची गरज असते.
                      श्रीगुरुचरित्रात श्रीगुरुचरित्रकारांची समाजाला भक्तीमार्गाकडे वळविण्याची तळमळ दिसून येते.
 (संदर्भ ग्रंथ :
                    The Mystery Beyond the Trinity
                    Tiprura Rahasya
                    Translated by

                   SWAMI SRI RAMANANANDA SARASWATHI )

No comments:

Post a Comment