Thursday 1 May 2014

‘ प्रगतीची पाऊले चालावीत अध्यात्माची वाट ’


                     श्री. अण्णा हजारे यांनी उभारलेल्या भ्रष्टाचार निर्मूलक आंदोलनातून यंदाच्या २०१४ सालच्या लोकसभा निवडणूकांकडे समस्त जग आशेने पहात आहे.
                 ऑफीसचे काम संपवून कोल्हापूरमार्गे नासिकला परत येत असताना, मागच्या आठवड्यात कोल्हापूरच्या अंबाबाईचे दर्शन घेतल्यावर आमची गाडी पुणे मार्गे नासिकला परत न येता राळे गण सिद्धिला वळाली. अचानक आलेल्या उर्मीतून प्लॅन केल्याने  श्री. अण्णांची अपॉइंटमेंट घेतली नव्हती, ते भेटतात की नाही? ही धाकधुक मनात होती. तिथे पोहोचल्यावर कळाले की, दुपारी १२ पर्यंत भेटण्याची वेळ असून लोकांची रीघ दुपारी २:३० वाजेपर्यंत होती. त्यामुळे आता जेवण झाल्यावर श्री. अण्णा भेटतीलच हे सांगता येत नाही. पुढची भेटण्याची वेळ संध्याकाळी ५:३० ला सुरु होते. रात्रीच्या आत नासिकला परतायचे असल्याने संध्याकाळी ५:३० पर्यंत थांबणे अशक्य होते.
                  परंतु जेवण झाल्यावर आम्हाला तसेच सिंदखेडराजा, जिल्हा बुलढाण्याहून आमच्यासारख्याच अचानक आलेल्या लोकांना श्री अण्णा हजारे हसतमुख भेटले.
                   इतके दिवस फक्त भ्रष्टाचार निर्मूलक म्हणून मनःचक्षूसमोर असलेली श्री. अण्णांची प्रतिमा साक्षात ज्ञानेश्वरी जगणारा माणुस ह्या रुपात भेटली.
                   त्यांच्या कार्यालयाचा परिसर हा एक स्वच्छ आधुनिक आश्रम आहे. कार्यालयातील लोक तसेच गांवकऱ्यांमध्ये सहकार्याची भावना दिसली.दुष्काळी प्रदेशातील ह्या गावात झाडाला आंबे खूप लगडलेले आहेत. वडाच्या वृक्षाचे उच्चाटन न करता त्याला पूर्ण वाढू देऊन फक्त त्रासदायक पारंब्या कापलेल्या दिसतात. कुलरपाशी पक्षी माणसांना न घाबरता पाणी पिताना दिसतात. हिमाचलप्रदेशातील काही लोक पाणी संवर्धनाचा कोर्स करण्यासाठी ह्या आश्रमात आलेले आहेत. २००४ साल पर्यंत १४ हजारहून जास्त लोक येथून जल संवर्धन शिकून गेलेले आहेत.
                       पाण्याचा दुष्काळ असलेल्या ह्या गावात
श्री. अण्णांनी प्रत्येक गावकऱ्यातला कामगार जागा केला. गावाजवळच्या डोंगरमाथ्यावर गावकऱ्यांच्या श्रमदानातून मातीचे चौकोनी तळे निर्माण केले. ह्या डोंगरास उतारवर समपातळीची तळी चारही बाजूंनी निरनिराळ्या टप्प्यात तयार केली. सर्वात  खालच्या तळ्याच्या टप्प्यातील पाणी गावातील शेताच्याकडेनी फिरविलेले दिसले. ह्या पाण्याच्या ओढ्यात ठिकठिकाणी बंधारे लोकांच्या श्रमदानातून बांधलेले दिसतात. आज एप्रिल- मे महिन्यातील भर उन्हाळ्यात गावातील विहीरी पाण्यानी भरलेल्या आहेत. गावातील शेती श्रमदानाच्या सहकार्यातून होते.
                            गावातील प्राथमिक सरकारी जिल्हा परिषद शाळा गावकऱ्यांनी श्रमदानातून बांधली आहे. ह्याच शाळेसमोर ५वी ते १२वी अशी गावाने खाजगी शाळा वसतिगृहासहित  उभारली आहे. ह्या शाळेचे वैशिष्ट्य म्हणजे नापासांना प्राधान्य. श्री अण्णा हजारेंना मिळणारा विविध पुरस्कार निधी ह्या शाळेवर खर्च होतो. गावाचा केलेला कायापालट छायाचित्र व मॉडेल रुपात आपल्या दिसतो. हे पुरस्कार ठेवण्यासाठी बांधकाम सुरु असलेली सिमेंटची इमारत (संग्रहालयाची वास्तू) बांबूची वाटते.येथील सिमेंटच्या कुंड्याही वृक्षाची खोड वाटतात. झाडाची मुळे जादा पाण्याने सडू नयेत म्हणुन ह्या अतिरिक्त पाण्यास प्रत्येक कुंडी वाट ठेवलेली दिसते. शाळेतील १०वी पास मुले सुट्टीचा सदुपयोग -शाळेत चिमण्यांची घरे बनविताना दिसली.
                       अशा ह्या आदर्श गावातील पुष्कळ तरुण सैन्यात भरती झालेले आहेत. जागतिक बॅन्केने राळे गण सिद्धी ह्या गावाला गौरविलेले आहे.
                   श्री. अण्णा हजारेंच्या मते अध्यात्म हेच जीवनातील   मार्गदर्शक आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर भक्त त्यांच्यात दिसला.
ह्या अनोख्या आदर्श गावामागची प्रेरणा श्री. अण्णा हजारे कडून समजली :-
ज्ञानेश्वरी अध्याय १४ ओवी क्रमांक २३३
नगरेचि रचावी। जलाशये निर्मावी।
महावने लावावी। नानाविधे॥ १४ -२३३॥
ह्याच पद्धतीने आपणही आपली गावे सुधारली तर,
भारत = भाः( दिव्य प्रकाश) + रत (रमलेला देशहे  हेनाव सार्थ करेल.
त्यासाठी प्रत्येक भारतीयाने भ्रष्टाचार निर्मूलक कामगार होणेगरजेचे आहे.

'१ मे २०१४ कामगार दिनाच्या शुभेच्छा'

No comments:

Post a Comment