Thursday 15 May 2014

त्रिपुरा रहस्य : चैतन्य म्हणजे काय ?

भाग १



श्रीगुरुदेवांनी आपला शिष्य भगवान परशुराम ह्यास एक काल्पनिक गोष्ट सांगितली ह्या गोष्टीतील पात्रांच्या संवादातून त्यांनी जीवनात अनुभवयास येणारे परंतू अनाकलनीय असे सत्य सांगितलेले दिसते .
                               लहानापासून मोठ्यापर्यंत गोष्टी सर्वांनाच आवडतात. गोष्टीरुपात आपण कल्पनेतील दुनियेत फेरफटका मारू शकतो व अशा ह्या शिक्षणाचे विद्यार्थ्याला ओझे होत नाही, ह्यातून श्रीगुरुदेवांची अवघड विषय अत्यंत सोपा करुन सांगण्याची हातोटी दिसते.  
                               ही गोष्ट म्हणजे लहानपणापासून आपल्याला आवडणाऱ्या विक्रम वेताळ गोष्टीसारखी आहे. ह्या कथेत ब्रह्मराक्षस व दोन राजपुत्र भाऊ ही काल्पनिक पात्र आहेत. ब्रह्मराक्षस व मोठा राजपुत्र हे दोघे शास्त्री म्हणजे आजच्या भाषेत चार बुक शिकलेले दाखविले आहेत तर लहान राजपुत्र हा श्रेष्ठ दर्जाचा ज्ञानी. गोष्टीरुप पद्धतीत शिष्याच्या मनात येणाऱ्या शंका ब्रह्मराक्षस धाकट्या राजपुत्रास विचारताना दिसतो.
                              श्रीगुरुदेवांच्या गोष्टीतील राजपुत्र हे विपासा नदीच्या काठावरील अमृता नगरीच्या रत्नगड राजाचे सुपुत्र आहेत.  ह्यातील मोठ्या राजपुत्राचे नाव रुकंगड असून तो शास्त्री पंडीत आहे. धाकटा राजपुत्र हेमंगड हा श्रेष्ठ दर्जाचा विद्वानआहेहे राज घराण क्षत्रिय असल्याने शिकार करता येणे, हे त्यांचे आयुष्यातील महत्वाचे शिक्षण. हे दोघे भाऊ एकदा घनदाट जंगलात वाघ, सिंह, हरीण अशा प्राण्यांची शिकार करण्यासाठी, आपले नियमित काम करण्यासाठी जातात. त्यादिवशी खूप प्रयत्न करुन त्या भावांना शिकार मिळ नाही. दमून भागून दोघे भाऊ विश्रांतीसाठी जंगलातील एका झऱ्याकाठी बसलेले  असताना जंगलातील लोक जवळच रहाणाऱ्या ब्रह्मराक्षसाची बातमी ह्या दोघा राजपुत्रास देतात. हे जंगलवासी सांगतात, “हा ब्रह्मराक्षस खूप हुशार आहे. तो प्रथम माणसास वादविवादात हरवितो व अशा हरलेल्या माणसास नंतर तो ब्रह्मराक्षस खातो.”
                        रुकंगड हा राजपुत्र स्वतः शास्त्र शिकलेला होता व त्याला हे असे शास्त्रविषयक वाद विवाद करायला आवडत होते. ब्रह्मराक्षसाची बातमी कळल्यावर तो स्वाभाविकच आपल्या भावाला घेऊन ब्रह्मराक्षसाकडे शास्त्र विषयक वाद विवाद करण्यास गेला.

                             परंतू ब्रह्मराक्षसाने वादविवादात त्याला हरविले. ह्या पराभूत राजपुत्रास ब्रह्मराक्षसाने त्याच्या नियमानुसार खाण्यासाठी म्हणून पकडले. हे सर्व पाहिल्यावर धाकटा भाऊ हेमंगडाने ब्रह्मराक्षसाला विनंती केली की,तू माझ्या मोठ्या भावाला खाऊ नकोस. प्रथम मला शास्त्र विषयक वाद विवादात हरव. नंतर आम्हा दोन्ही भावांना तू खा.”
 क्रमशः

No comments:

Post a Comment