Saturday 17 May 2014

त्रिपुरा रहस्य : चैतन्य म्हणजे काय ? ( भाग २ )




  श्रीगुरुदेव उवाच  भाग २ :-
                           ब्रह्मराक्षसाने धाकट्या राजपुत्रास सांगितले,”खूप दिवसांनी त्याला अशी वादविवादात हरलेली शिकार मिळालेली आहे, त्यामुळे तो ब्रह्मराक्षस खूप भूकेजला झालेला होता. ह्या ब्रह्मराक्षसाने पूर्वी एका देवव्रतनावाच्या वशिष्ठ ऋषींच्या शिष्यास  जंगलातून जाताना  शिकार म्हणून पकडले होते. तेव्हा ह्या देवव्रताने ब्रह्मराक्षसास शाप दिला की, कोणत्याही मानवाची शिकार तू खायला लागलास तर तुझे तोंड जळून जाईल. ब्रह्मराक्षसाने देवव्रताचे पाय धरुन क्षमा मागितली.  तेव्हा देवव्रताने ह्या ब्रह्मराक्षसास उःशाप दिला की, ‘तू फक्त वादविवादात हरलेल्या मनुष्यास खाऊ शकतोस.”
                                त्यामुळे तो ब्रह्मराक्षस म्हणाला, “मला खूप भूक लागली आहे. पहिले मला माझी शिकार खाऊ दे, नंतर मी तुझ्याशी वाद विवाद घालतो.”
                                   धाकट्या भावाने परत एकदा ब्रह्मराक्षसास विनंति केली की, “मी तुला दुसरे अन्न आणून देतो. तू माझ्या भावाला सोड.” ब्रह्मराक्षसाने राजपुत्रास सांगितले, “दिलेले वचन हे पाळावेच लागते, त्याची अशी किंमत करता येत नाहीपरंतू मी तुला शब्द देतो की तू  माझ्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिलीस तर मी तुझ्या भावाला जिवंत सोडीन.”
                                 ब्रह्मराक्षसाची ही अट धाकट्या राजपुत्राने मान्य केलीब्रह्मराक्षसाने त्याच्या मनातले प्रश्न राजपुत्रास विचारायला सुरवात केली.
ब्रह्मराक्षसाने पहिला प्रश्न विचारला,
१) अवकाशापेक्षा विस्तृत व सूक्ष्माहूनही सूक्ष्म अशी गोष्ट कोणती? तिचा गुणधर्म कोणता? व ती कोठे असते?”
राजपुत्राने उत्तर दिले, “चैतन्य ही अवकाशाहूनही विस्तृत आहे व ती जगातील सूक्ष्मतम गोष्ट आहे.
स्फुरणे  हाच तिचा गुणधर्म आहे.
   आत्मा हेच तिचे ठिकाण आहे. “
                                 इथे आपल्या एक गोष्ट लक्षात येते, श्रीगुरुदेवांच्या काळातआकाशाच्या बाहेर असलेल्या पोकळी म्हणजे अवकाश लोकांना माहित असलेले दिसते. कारण आपल्याला पृथ्वीचे बाह्य आवरण फक्त आकाशच दिसते परंतू त्या आकाशाच्याही बाहेर पसरलेल्या अवकाशाचे उदाहरण चैतन्याची व्याप्ती सांगताना दिलेले दिसते
                                                   क्रमशः    

No comments:

Post a Comment