Monday 26 May 2014

त्रिपुरा रहस्य: चैतन्य म्हणजे काय? (भाग ३ रा)


त्रिपुरा रहस्य: चैतन्य म्हणजे काय?                    (भाग ३रा)
ब्रह्मराक्षस राजपुत्रास आपल्या दुसऱ्या प्रश्नाव्दारे  चैतन्य, स्फुरणे, आत्मा ह्या पहिल्या प्रश्नातील शब्दांविषयी विचारतो,
) “चैतन्य   एकाच वेळेला अवकाशापेक्षा विस्तृत व जगातील सर्वात सूक्ष्म गोष्ट कशी?  स्फुरणे म्हणजे काय?  तसेच आत्मा  म्हणजे काय?”
राजपुत्र उत्तर देतो,
चैतन्य हेच सर्वाला कारण असल्याने विस्तृत आहे  व आकलन होण्यास कठीण असल्याने सूक्ष्म आहे.
चैतन्याची आपल्याला जाणीव होते म्हणजे चैतन्य स्फुरते.
हेच जाणीव होणारे चैतन्य म्हणजे आत्मा होय.”
                               चैतन्य म्हणजे नक्की काय? हे आपल्याला सर्वसामान्य माणसाला समजत नाही. आधुनिक विज्ञानालाही अजून चैतन्य म्हणजे काय? ते येते कोठून? व जाते कोठे? हे समजलेले नाही. विज्ञान हे चैतन्य शोधण्याचा अविरत प्रयत्न करीत आहेचैतन्य संपले की आपला प्राण आपल्याला सोडून जातो. देह नावाचे यंत्र बंद पडते.
                                  चैतन्य सर्व सृष्टी संचलित निश्चित करते, म्हणून अवकाशाहूनही विस्तृत आहे, असे श्रीगुरुदेव म्हणतात.
                      चैतन्य म्हणजे नक्की काय? हे आपल्याला सांगता येत नाही व दिसत नाही म्हणून श्रीगुरुदेव ह्या चैतन्यास सूक्ष्माहूनही सूक्ष्म गोष्ट आहे, असे सांगतात.   प्रत्येकाच्या शरीरात  चैतन्य आहे परंतू ते आपल्याला एखाद्याच व्यक्तीमध्ये अनुभवायला येते, ह्याचाच अर्थ ते चैतन्य स्फूरते. तेव्हांच त्याचे अस्तित्व जाणवते, ह्यास श्रीगुरुदेव आत्मा म्हणतात.
-------------------------------------------------------------- 
ब्रह्मराक्षस  राजपुत्रास तिसरा प्रश्न विचारतो,
) “हे चैतन्य सापडण्याचे ठिकाण कोणते?  ते प्राप्त कसे होते?
      त्याच्या प्राप्तीपासून फळ काय मिळते?”
बुद्धी हेच चैतन्याच्या अस्तित्वाचे ठिकाण आहे.
एकाग्रतेने हे चैतन्य  प्राप्त होते .
चैतन्य  प्राप्त झाल्याने पुन्हा जन्म होत नाही.”
--------------------------------------------------------------- 
  ब्रह्मराक्षस  राजपुत्रास  ४था  प्रश्न  विचारतो,
 )”चैतन्याचे अस्तित्व दिसते परंतू त्याची जाणीव का होत नाही?
      जन्म म्हणजे नक्की काय?”
राजपुत्र उत्तर देतो,
अज्ञानामुळे आपल्याला ह्या चैतन्याची जाणीव होत नाही
आत्मा कळण्यासाठी स्वतः स्वतःला ओळखायला पाहिजे, त्यासाठी दुसऱ्या कोणत्याही बाह्य मदतीची गरज नाही
आपल्या देहाला आत्मा मानणे म्हणजे जन्म होय.”
--------------------------------------------------------- 
ब्रह्मराक्षस ५वा प्रश्न विचारतो,
)”चैतन्याची जाणीव होते परंतू ते आपल्याला समजत नाही असे का
    जन्म कशामुळे होतो?”
राजपुत्र उत्तर देतो,
अविवेकामुळे आपल्याला हे  चैतन्य समजत नाही.
कर्तृत्वाचा अभिमान धरल्याने जन्म प्राप्त होतो.”
--------------------------------------------------------
ब्रह्मराक्षस राजपुत्राच्या वरील उत्तरातील अविवेक म्हणजे काय हे ६व्या प्रश्नात विचारतो,
) “अविवेक म्हणजे काय? आपण स्वतः म्हणजे निश्चित कोण ?
     कर्तृत्वाचा अभिमान म्हणजे काय?”
 राजपुत्र सांगतो,
अविवेक म्हणजे स्वतःचा देह व आत्मा हे दोन्ही निराळे आहेत, हे न ओळखता येणे
आपण कोण? ह्या प्रश्नाचे उत्तर तुझे तूच आपल्या स्वतःला विचार.
मी कर्ता  म्हणजे अहंकार ह्यालाच कर्तृत्वाचा अभिमान किंवा मीपणा म्हणतात.”
---------------------------------------------------------------
ब्रह्मराक्षस  ७वा राजपुत्रास विचारतो,
) अविवेक कशाने नष्ट होतो? ह्या सर्व विचाराचे मूळ कोणते व ह्या  
       मुळाचे कारण काय?”
राजपुत्र ब्रह्मराक्षसास  उत्तर देतो,
स्वच्या शोधातून अविवेक नष्ट करता येतो.
वैराग्यवृत्तीतून स्वचा शोध घेता येतो.
जीवन आनंदात न रमणे अनिच्छा असणे म्हणजे वैराग्य”.
--------------------------------------------------------------
ब्रह्मराक्षस  राजपुत्रास  ८वा  प्रश्न  विचारतो,
  ) स्वचा शोध, वैराग्य आणि आनंदाविषयी अनिच्छा म्हणजे काय ?”
स्वचा शोध हा स्वतःच्या परिक्षणातून घेता येतो.
ह्या परिक्षणात आत्मा व देह ह्यातील भेद जाणला पाहिजे. आत्मा जाणण्यासाठी शिस्तबद्ध, प्रामाणिक, मजबूत प्रयत्नांची गरज असते.
वैराग्य वृत्ती म्हणजे आपल्या भोवतालच्या विश्वात न गुंतणे. आसक्तीतून येणारी दुर्दशा आपल्याला समजली की वैराग्यवृत्ती म्हणजे आनंदाविषयी अनिच्छा निर्माण होते.”
------------------------------------------------------
ब्रह्मराक्षस राजपुत्रास ९वा प्रश्न विचारतो,
) ह्या सर्व गरजांचे मूळ कारण कोणते?
राजपुत्र उत्तर देतो,

 “दैवी कृपा हेच ह्या सर्व चांगल्या गोष्टींचे मूळ कारण आहे.
 परमेश्वराच्या भक्तीतून त्याची  प्राप्ती होते.
शहाण्या माणसाच्या सहवासात ही भक्ती निर्माण होऊ शकते, वाढू शकते, हेच ह्या सर्व गोष्टींचे मूळ कारण आहे.”
ह्यानंतरचा ब्रह्मराक्षसाचा १०वा प्रश्न हा आपल्या सर्वांच्या मनात नेहमीचे खदखदणारा प्रश्न आहे.
१०) परमेश्वर म्हणजे कोण आहे?  त्याची भक्ती म्हणजे काय?
       शहाणा कोणाला म्हणतात ?”
राजपुत्र उत्तर देतो,
ह्या विश्वाचा स्वामी परमेश्वर आहे .भक्ती म्हणजे परमेश्वराविषयी दृढ निष्ठा होय. शहाणा माणूस सर्वोच्च शांतीचे पालन करतो  आणि त्याच्या मनात सर्व जगाविषयी प्रेम असते आपल्या प्रेमाने तो जगात मिसळून जातो.”
------------------------------------------------------------------ 
ह्यानंतरचा ब्रह्मराक्षसाचा ११वा प्रश्न जगातील मनुष्य स्वभावाचे नमुने दाखविताना दिसतात,
११) सगळ्यात भित्रा माणूस कोण? आपत्तीग्रस्त कोण? दरिद्री कोण?”
राजपुत्र उत्तर देतो,
              मोठ्या कुटुंबाचा प्रमुख हा सदैव आपत्तीग्रस्त असतो.
               अधाशी इच्छा करणारा सर्वात दरिद्री असतो.”
ह्यातील पहिले उत्तर
अतिशय श्रीमंत माणसाला त्याचा पैसा भित्रा बनविते.
 धनवान माणूस हा भित्रा सांगितलेला आहे. आपण पहातो, श्रीमंत माणूस त्याच्याकडची संपत्ती तिजोऱ्यांमध्ये कडिकुलपात ठेवतो, सुरक्षा रक्षक नेमतो, इमानदार कुत्रा पाळतो, हल्लीच्या जमान्यात क्लोज सर्किट टी. व्ही. बसवितो अर्थात हे उपाय शेवटी सज्जन माणसाला चोरी करण्याचा मोह होवू नये म्हणून असतात. चोरी करणाऱ्यासाठी हे सर्व उपाय कुचकामी ठरतातविविध उपायांनी पैसा सुरक्षित ठेवला तरी त्या धनवान माणसाचे किंवा त्याच्या कुटुंबियांचे अपहरण करुनही गुन्हेगार तो पैसा लुबाडून नेतात. म्हणजे शेवटी श्रीमंत माणसाचे जीवन सदैव भितीच्याच छायेत जाते. शालेय इतिहासात आपण शिकतो, गझनीच्या महंमदाने पैसा पैसा करुन अमाप संपत्ती जमविली. ती सुरक्षित ठेवण्यातच त्याचे आयुष्य गेले, परंतु आयुष्याच्या अखेरीस मृत्युमुळे ही सर्व संपत्ती ह्या इहलोकात सोडून अल्लाकडे जायचे आहे, ह्या कल्पनेने तो ढसा ढसा रडला. म्हणजे तो शेवटी मृत्युला भ्यालेला आहे.
तात्पर्य आयुष्य जगायला पैसा लागतो परंतू पैशातून मिळणारे भित्रे आयुष्य काय कामाचे?
दुसरे उत्तर पाहूया,
मोठ्या कुटुंबाच्या प्रमुखाला आपत्तिग्रस्त म्हटलेले आहे.
                                    मोठ्या कुटुंबातील लोक कौटुंबिक सुरक्षितेत मजेत जगत असतात. परंतू हे कुटुंब एकत्र बांधणे, त्यातील निरनिराळ्या स्वभावांच्या लोकांची मोट वळणे, तसेच कुटुंबाला आर्थिक स्थैर्य देणे म्हणजे कुटुंबप्रमुखाची रोजची तारेवरची कसरत असते. ह्यासाठी मला वाटते आपल्या भारताचे पंतप्रधान पद हे उत्कृष्ट उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे .
                                   आपले (माजी) पंतप्रधान माननीय मनमोहनसिंग हे जागतिक मान्यताप्राप्त अर्थशास्त्रज्ञ आहेत. त्यांच्या स्वागतास जगातील महाशक्तीचे अमेरिकेचे अध्यक्ष श्री.बराक ओबामा आपल्या ऑफिसबाहेर स्वतः येतात, ह्यात श्री मनमोहनसिंग ह्यांना जगाने दाखविलेला आदर दिसतो. परंतू भारतासारख्या विशाल देशाचा कुटुंबप्रमुख, ह्या नात्याने त्यांच्यावर येणारे रोजचे ताणतणाव पाहिल्यावर पंतप्रधानपद म्हणजे सोनेरी सिंहासन. ह्या सिंहासनात डोक्यावर सदैव टांगलेली टांगती तलवार  असते.
                            ही गोष्ट झाली आपल्या भारतासारख्या महाकाय देशाची व त्या देशाच्या पंतप्रधानाची देशातील लोक, त्यांचे स्वभाव, आपल्या हातात नसतात. व्यक्ती तितक्या प्रवृत्ति परंतु चार भिंतीच्या घरात रहाणाऱ्या कुटुंबाला, आपला कुटुंबप्रमुख आपत्तीग्रस्त होवू नये, एवढी काळजी निश्चित घेता येईल.
आता तिसरे उत्तर पाहुया
अधाशी इच्छा करणारा सर्वात दरिद्री असतो.
                           सोन्याच्या अधाशी इच्छेसाठी आपली भारतीयांचा सोन्याचा सोस जगात प्रसिद्ध आहे. भारत हा जगातील एकमेव देश आहे, जिथे कितीही सोने बाहेरच्या देशातून विक्रीस पाठवा, भारत हा देश अक्षरशः
गिळंकृत करतो. एवढे प्रचंड सोने आपण भारतीय दिमाखात विकत घेतो, परंतू त्याच्यामुळे आपली महागाई कमी होत नाही. देशाची आर्थिक बाजू मजबूत होत नाही. भारतास स्वातंत्र्य मिळून ६७ वर्षे झाली तरी आपण अजुनही विकसनशील देश आहोत. देशातील प्रचंड सोन्याचे भांडार आपल्याला विकसीत देश बनविताना दिसत नाही.
                                     हे उदाहरण झाले सोन्याच्या हव्यासाचे ह्याच्या जोडीला भ्रष्टाचाऱ्यांची अधाशी वृत्ती, आपल्याला खरोखरीच पोखरत आहे, दरिद्री बनवीत आहे.
क्रमशः




No comments:

Post a Comment