Saturday 22 February 2014

पूर्वजांनी दिलेला सगुण विविध मूर्तिंचा अमूल्य ठेवा (भाग २ )


सगुण मूर्ति : संकल्पना (भाग २ )
 श्रीगणेश प्रार्थना :                                                           ॥श्रीगणेशाय नमः
चिंता नुरे हरतसे मनु देह ताप।
विद्येमुळे मिळतसे यश अमाप॥
भजा हो तुम्हीविद्यारदेवदेवा।
याचीतसें तव पदीं दृढ ज्ञान ठेवा॥
या प्रार्थनेतील,
चिंता नुरे हरतसे मनु देह ताप।
चिंता नुरे म्हणजे चिंता न उरे, हरतसे म्हणजे नाश होणे, मनु म्हणजे माणसाचे देह- ताप problems.
ह्याचा अर्थ चिंता उरली नाही तर माणसाच्या शरीराचे त्रास संपतील.
आपल्याला माहित आहे की चिंता मनाबरोबर शरीराला पोखरते. मधुमेह, रक्तदाब अगदी साधे सर्दी, पडसे इत्यादी पाहुणे त्या शरीरात प्रवेश करतात. शरीराच्या घरात मन रहात असल्याने ते एकमेकांना बांधलेले असतात. मनाची चिंता शरीर बिघडविते तर शारीरिक व्याधी मन पोखरते. अशा वेळेला डॉक्टर बरोबर देवाकडेही धाव घेतो.
श्रीगणपतिला चिंतामणि म्हणजे चिंता दूर करणारा  म्हणतात.
 मुद् गल पुराणातचिंतामणिह्या श्रीगणेशाच्या नावाची व्याख्या दिलेली आहे.
चिंतामणि ह्या शब्दाची व्याख्या सांगताना, मनाच्या ५ बिघडलेल्या अवस्था सांगितलेल्या आहेत : -
) बर्हिमुख व्यक्ती - बाहेरच्या जगाचा विचार करणारी व्यक्ती
) जास्त बर्हिमुख व्यक्ती  - बाहेरच्या जगाचाच विचार करताना पापाच्या मार्गाकडे जाऊ
    शकते.
) अंतर्मुख व्यक्ती  हिला   विक्षिप्त म्हटले आहे.
) जास्त अंतर्मुख व्यक्ती हिला  एकाग्र म्हटलेले आहे.
) निष्क्रीय मन ह्याला निरुद्ध म्हटलेले आहे.
मनाच्या ह्या पाचही स्थिती ज्ञानाच्या सहाय्याने नष्ट करतो व  मनाला शांती देतो तो चिंतामणि.
                     आपल्याला रोजच्या जीवनात माझा पहिला नंबर येऊ दे, बॉस चांगला वागू दे अशा तात्कालिक चिंता असतात व त्यांचे उत्तरही आपल्या रोजच्या वागणुकीत, कामात दडलेले असते. ते उत्तर मिळवायचा प्रयत्न न करता आपण नाहक चिंताग्रस्त होतो  व देवाकडे धाव घेतो.
               ह्या ठिकाणी आपल्याला मानसिक आधार निश्चित मिळत असेलही परंतु सर्वप्रथम संतुलित मन रहाण्यासाठी मनाला अंतर्मुख किंवा बहिर्मुख होण्यापासून थांबवायला पाहिजे.
              मनाला ज्ञानाच्या सहाय्याने संतुलित ठेवता येते.  ‘ज्ञानह्या शब्दाचा अर्थ जाणीव, विषयाचे आकलन, माहिती, ब्रह्मज्ञान असा आहे.
 श्रीगणेशाला १४ विद्यांचा स्वामी म्हणतात.  
१४ विद्या = ४ वेद  +  ६ वेदांगे –(शिक्षा ,कल्पज्योतिष , निरुक्त ,छंद आणि व्याकरण )
                 + ४ उपांगे – (पुराणे , मीमांसा ,न्यायशास्त्र व धर्मशास्त्र)    
चिंतामणि आपल्याला संदेश देतो : -
विद्याभ्यासातून मिळणाऱ्या ज्ञानाच्या सहाय्याने मन संतुलित राखता येते. मनःशांती  ही संतुलित मनाने प्राप्त होते.
दि. २२ फेब्रुवारी २०१४                                                                           क्रमशः
(संदर्भ ग्रंथ : What is the implied meaning of the many Names of Lord Ganapati?
                   By Hindu Janjagruti Samiti)



No comments:

Post a Comment