Sunday 11 December 2016

कॅशलेस अर्थक्रांती



                      सुमारे ७५०० वर्षांपूर्वी भारतवर्षातील लोकतंत्र पुरस्कारकर्ते व भ्रष्टाचार निर्मुलक श्रीअत्री ऋषींच्या सुपुत्राची (श्रीदत्तगुरुंची) आज (दि.१२ डिसेंबर २०१६) जयंती. श्रीअत्री ऋषींनी केलेल्या भ्रष्टाचार निर्मुलनाच्या कार्यास विरोध करणाऱ्या समाजकंटकांनी, श्रीअत्री ऋषी व त्यांच्या संपूर्ण कुटुंबास पेटविलेल्या भाताच्या तुसाच्या कुंडात कैद केले होते. पेटविलेल्या भाताच्या तुसाच्या ज्वाळा दिसत नाही पण धग खूप जबरदस्त असते. ह्या अशा धगधगीत कुंडातून श्री अश्विनीकुमारांनी समस्त अत्री परिवारास बाहेर काढले, असा   प्राचीन कथेत उल्लेख आहे.
                            श्रीदत्तात्रेयांनी भावी आयुष्यात मनुष्याचे शरीर निरोगी रहावे, ह्या साठी योगशास्त्र निर्माण केले; म्हणून ते योगाधिराज दत्तगुरुझाले. श्रीदत्तगुरुंचे शिष्य पतंजलीयांनी योगशास्त्राचा प्रसार केला.
                              शरीरातील मनाचे शास्त्र, त्रिपुरा रहस्यात सांगून श्रीदत्तात्रेयांनी मानसशास्त्राची निर्मिती केली. जगातील श्रीदत्तगुरु ह्या आद्य मानसशास्त्रज्ञाने त्रिपुरा म्हणजे मनाच्या तीन अवस्था जागृत, स्वप्नावस्था, सुषुप्ति (देहभान सर्व जाणीवा विसरलेले मनसांगितलेल्या आहेत.
                                 श्रीदत्तगुरुंनी दिलेला ठेवा प्राचीन भारतीयांनी जपून आपल्यापर्यंत पोहोचविला. २१व्या शतकातील भारत भ्रष्टाचार मुक्त व्हावा म्हणून आदरणीय अण्णा हजारेंनी उपोषण करुन जन जागृती केली.
                          भ्रष्टाचाराची विषवल्ली मुळापासून उखडून टाकण्यासाठी माननीय पंतप्रधान श्री. नरेन्द्र मोदीजींनी दि. ८ नोव्हेंबर २०१६ रोजी रु ५००/= व रु १०००/= ह्या नोटा चलनातून बाद केल्या.
                           नोटाबंदी निर्णयाचे स्वागत तसेच विरोध अशा प्रचंड लाटा भारतीय लोकशाहीत निर्माण झाल्या. ‘ही मोहीम फसली तर ------‘ असे नारे देशात घुमू लागले.
                        नोटाबंदीच्या जागतिक इतिहासातील नोंदी नुसार, नायजेरिया घाना, झिम्वाबे, म्यानमार ह्या अविकसित देशांनी तसेच विकसित देशात नॉर्थ कोरिया, सोव्हिएत, युनियन अमेरिका अशा विविध देशांनी नोटाबंदी राबविलेली आहे.
{ संदर्भ :- प्रसिद्ध अर्थतज्ञ डॉ. सुभाष देसाई C.A. मुंबई यांनी फेसबुकवर दिलेली अभ्यासपूर्ण माहिती }
                          नोटाबंदीने अविकसित देशांचे प्रश्न सुटले नाहीत. काळाच्या ओघात रशिया फुटला. नॉर्थ कोरियाची प्रगती झाली नाही.
                          अमेरिकेने मात्र नोटाबंदीचा मार्ग योग्य रितीने हाताळला. त्यांनी पुढील काळांत १०० डॉलर-वरच्या नोटा छापल्या नाहीत. त्यामुळे स्वाभाविकच पुनश्च नोटाबंदीची वेळच येऊ शकली नाही.
                        इतिहासातून मागच्यास ठेच पुढचा शहाणाहा धडा भारतासकट जगातील सर्व देशांनी घेत, काळ्या धनाचा भस्मासूर भस्म केला पाहिजे. दैनंदिन व्यवहार आंतरजाल बॅन्किंगने गुंफणे, हा एकमेव पर्याय सध्या अस्तित्वात आहे.

                  कॅशलेस व्यवहार ग्रामीण भागातील अडाणी व्यक्तीला तसेच वयोवृद्ध व्यक्तीला  येतील का ?
                   ग्रामीण तसेच दुर्गम भागातील अडाणी व्यक्ती लिलया मोबाईल वापरते. मोबाईलवर बोलण्यातील भारतीयांचा पहिला नंबरजगातील अन्य देशास मिळविता आलेला नाही. अशा मोबाईलधारी भारतीयांना बॅन्केने खात्याबरोबर जसे पासबुक देतात तसे स्वतःचे अॅप डाउनलोड करुन दिले तर  ATM कार्ड वगैरेचीही गरज पडणार नाही. भारतीय बनावटीच्या ह्या मोबाईलच्या टच स्क्रीनवर अंगठा उठविण्याची सोय केली की, सर्व देश अंगठेबहाद्दर होईल. अंगठ्याच्या ठशांचा नैसर्गिक पासवर्ड अडाणी, वृद्ध, अपंग यांची कामे चोख बजावेल.

               अमेरिकेप्रमाणे आपणही परत नोटा छापण्याचे विचार सोडले तर देश आपोआप कॅशलेस व्यवहाराकडे वळेल.
                    नुकतीच चलनात आलेली   नवीन ५००/=रुपयांची नोट व जुनी १००/= रुपयांची नोट ह्यांच्यात गोंधळ (अंधारात, घाई गडबडीत, किंवा डिस्टर्ब मनःस्थितीत) सहज होऊ शकतो.
                   नोटा छापणे कमी झाल्याने, कागद निर्मितीसाठी होणारी जंगलतोडही थांबेल. प्लास्टीकच्या नोटांनी मात्र भविष्यात  पर्यावरण प्रदुषणाची समस्या गंभीर होऊ शकते. कागदाच्या लगद्यापासून बॅकेलाईट तसेच प्लायवूड निर्मिती होऊन औद्योगिक विश्वाची गरज भागते, परंतु प्लास्टिकच्या कचऱ्याचे करायचे काय?

                      काळ्या धनाची गुंतवणूक नोटांप्रमाणे सोन्यातही होते म्हणून सुर्वण संचयाचे नियम विद्यमान सरकारने बनविणे योग्य असले तरी पुरुष (१० तोळे) व स्त्रीस सामाजिक दर्जा नुसार विवाहित (५० तोळे) व अविवाहित (२५ तोळे) असा नियम का ?
अलंकार, वस्त्र, छानछोकीची रहाणी ह्या गोष्टी व्यक्तिगणिक बदलतात. त्यात लिंग अथवा सामाजिक दर्जाचा भेदभाव निसर्गाने केलेला नाही, कायद्यानेही असा अन्याय करु नये.

                           भारतीयांचा सोन्याचा हव्यास सुरक्षित भविष्य तरतुदीतून आलेला आहे. कौटुंबिक सोन्याहून कैकपटीने जास्त धन व सोने-चांदी देवस्थानांकडे पडून आहे. ह्या पैशातून पेट्रोल, डिझेल इत्यादी इंधन खरेदी केल्यास, देशात स्वताईची लाट येईल. धार्मिक स्थळांच्या तिजोरीतील काही पैसा लष्करावर खर्च केल्यास, देशाची संरक्षण व्यवस्थाही मजबूत होईल.
                    महागाईवर तोडगा म्हणून सरकार पगारवाढ करण्यासाठी जास्त नोटा छापते. जास्त नोटा छापून, कर वाढवून देश महागाईच्या चक्रातून बाहेर पडू शकत नाही, हे  कटू सत्य आहे.
                    कॅशलेस व्यवहारात दिलेल्या भरगोस सवलतींबरोबर कमीत कर आकारणी झाली तर आपोआप किंमती खाली येऊन महागाई रोखता येईल. कॅशलेस व्यवहारास  कर -कमी दर व सेट-ऑफ  सुविधा आणि रोकड व्यवहारास कर - जास्त दर व सेट- ऑफची सुविधा नसलेली प्रणाली अशी व्यवस्था झाल्यास रोकड व्यवहार बंद होऊ शकतील.
                           कॅशलेस व्यवहारातून भ्रष्टाचाराचा भस्मासूर रोखला गेला तर मनुष्याचा जीवन संघर्ष कमी होईल. सुस्थापित समाजाची पाऊले कास्टलेसच्या दिशेने चालावीत, ह्यासाठी श्रीदत्तगुरु चरणी प्रार्थना
कॅशलेस अर्थक्रांती व्हावी समस्त भूमंडळी
   कास्टलेस क्रांतीने द्यावी सामाजिक  झळाळी
॥श्रीगुरुदेवदत्त॥
----- अनुप्रभा, नाशिक

www.shrigurucharitra.com

No comments:

Post a Comment