Saturday 3 December 2016

अर्थक्रांती-अष्टपदी

घोषणाबाजी देशांत चाले,
देश हितास आली रती
गंभीरपणे नरेन्द्र बोले,
आली क्रांती - गेली भ्रांती

नरेन्द्रास ह्या झाली घाई,
विसाव्यात न मिळे शांती;
त्याचे म्हणणे ध्यानी येई -
आली क्रांती - गेली भ्रांती

कर भरणे, तत्पर ज्यांचे
कर रुन मिळे, अर्थगती
नरेन्द्र बोले, आपुल्या साचे -
आली क्रांती - गेली भ्रांती

काळ्या नास जे कवटाळती
त्यांची होईल तुरुंग - रती
मतदार राजा, ऐक - गाणे गाती
आली क्रांती - गेली भ्रांती

सुर्वणसाठ्यास मनुज लपविसी
आयकराची वक्रदृष्टीस पडती ;
कर रुन जर, हे सावरहासी
आली क्रांती - गेली भ्रांती 

सुवर्ण संचयीचा नियम झाला
विवाहितेस मिळे, ५० तोळा;
अविवाहितेवर अन्याय जाहला
असावे, तिचे सुवर्ण २५ तोळा;
दस नंबरी नर, ओटीवर* बोलती -
 ‘आली क्रांती - गेली भ्रांती

कौतुक भारी वाटे लोकां
श्रद्धेचा दाखविण्या दिमाखा,
देवदारी दिसे न सुवर्णाची होरी*
ह्या होराने रेल सरकारी तिजोरी;
मानसी ऐसे मतदार राजा, वदती -
आली क्रांती - गेली भ्रांती

जीवन जर सौख्यात जावया
व्हावे पश्चाताप न उरुनिया;
तर मतदारा, क्रांतीस वाटते -
 ध्यानी सतत आपुल्या चिंती
नरेन्द्र हे जे अविरत  वदते -
आली क्रांती - गेली भ्रांती

{होर* = वाहून आलेला गाळ,
 ओटी*= सोपा, घराची ओसरी }

कवितेला सौंदर्यवादीस्वच्छंद व मुक्त रुप देणारे आधुनिक मराठी कवितेचे जनक कवी केशवसुत (कै. कृष्णाजी केशव दामले) यांच्या  घड्याळ’  कवितेवर आधारित (आमच्या शालेय - जीवन आठवणीतील कविता -‘घड्याळ’ )
                         विडंबन काव्य  : अर्थक्रांती-अष्टपदी
------ अनुप्रभा, नासिक
संदर्भ :-
कवी केशवसुत

कवी गिरीश

No comments:

Post a Comment