पाहोनिया
आजची शिक्षण यत्ता।
मिळेल कशी हो, उद्याची महासत्ता ?
मारुनी पाटी पेन्सिलवर बत्ता।
का विचारतो, सद्य शिक्षण यत्ता ?
शाळेत नसे पाढ्यांशी लढा।
कसा ओलांडावा, गणिती ओढा ?
पर्याय प्रश्नी नसे विषय रसग्रहण।
कसे मेंदूस मिळेल, ज्ञान संग्रहण ?
असे आमुचा संगणक साथी।
मारितो चाळीशी चवथीत माथी॥
चघळितो आम्ही शिक्षण व्यवस्था।
कुबेरसाहेब सांगती, दुरावस्था॥
आचारोनी नित्य तयांचे भाषण।
स्विकाराल
का, हे शिक्षण वाण ?
--------- अनुराधा आठवले
(घाणेकर),
नासिक, दि १६ जुलै
२०१५
No comments:
Post a Comment