Saturday, 24 June 2017

मायबोलीचे भुक्कड ४ :-

शिक्षणातील 3 G
                          ‘गणित विषय ऐच्छिक होऊ शकतो का?’ असा प्रश्न उच्च न्यायालयाने शिक्षण मंडळाला विचारल्याची चर्चा, सध्या वर्तमानपत्रातून वाचावयास मिळते. मनुष्य सुशिक्षित अथवा अडाणी असला तरी रोजच्या जीवनात गणिताची गरज पडत असते.
                              घरगुती प्लंबिंगच्या कामातील गणिताचे महत्त्व गृहिणीला समजले नाही तर होणारा गोंधळ मी पाहिलेला आहे. एक वकीलबाई प्लंबरकडून घरात काही सुधारणा करुन घेत होत्या. वकीलबाईंना ड्रेनेजसाठी लागणाऱ्या स्लोपचा खर्च प्लंबर सांगत होता. वकील असलेल्या गृहस्वामिनीला पाण्याच्या उताराचे गणित कळत नव्हते. त्यांना वाटत होते, ‘हा प्लंबर आपल्याला हिशोबात गुंडाळतोय. नाहक जास्त खर्च करायला लावतोय.’ हिशोबात झालेल्या कटकटीतून गृहस्वामिनी गरजल्या, “तुला माहित आहे का? मी वकील आहे!” प्लंबरसाहेबही इरेला पेटले ते म्हणाले, “तुम्ही वकील असाल तर मी प्लंबिंगमधला फौजदार आहे.” फौजदारसाहेब काम अर्धवट टाकून निघून गेले.
                              ह्या प्रसंगातील वकीलबाई हल्लीच्या शॉर्टकट अभ्यासक्रमानुसार १२वी नंतर डायरेक्ट वकील झालेल्या आहेत. पदवी शिक्षणात निरनिराळ्या विषयांची तोंड ओळख होत असल्याने, अमेरिकेत पदवी प्राप्त केल्यानंतर वकील, डॉक्टर, इंजीनिअर ह्या व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश मिळतो.
                                आधुनिक जगाबरोबर आपला विद्यार्थी रहावा म्हणून १९७५साली १०+२ अभ्यासक्रमाद्वारे शिक्षणक्षेत्राने अमूलाग्र क्रांती केली. ह्या अभ्यासक्रमांत एक विषयात नापास होऊनही, पास करणारी ढकलगाडी बंद झाली. विविध विषयांच्या अभ्यासांत भर पडून, विद्यार्थ्याला भावी संगणकयुगासाठी सक्षम बनविण्याचे प्रयत्न झाले.
                                 १०+२ अभ्यासक्रमानुसार इयत्ता सातवीत सेट थिअरीह्या विषयाचा नव-गणितात समावेश झाला. ‘सेट थिअरीची जीवनांत गरज नाही. नाहक विद्यार्थ्यांवरचा बोज वाढविलेला आहे’, अशी घरा-घरांतील वडिलधाऱ्या  मंडळींची टीका-टिपण्णी आम्ही विद्यार्थ्यांनी ऐकली.
                              आमच्या ग. . शाळेतील पांगारकरबाई(छोट्या केळकरबाई), वैद्यबाई, डांगेबाई ह्या गणित- शास्त्र विभागाच्या  शिक्षकांनी  सेट थिअरी स्वतः शिकून आम्हाला अप्रतिम शिकवली. सेट थिअरीच्या बळावर संगणक क्षेत्रात क्रांती(Image Processing)होऊन आंतरिक्षक्षेत्र(चंद्र-मंगळमोहिम),तसेचआंतरजालक्षेत्र(Facebook,Whatsapp,Website)  विकसित झाले. आधुनिक तंत्रज्ञानाची फळे चाखणारी तसेच आधुनिक तंत्रज्ञानांत काम करणारी आमची पिढी, शालेय जीवनातील शिक्षकांची सदैव ऋणी आहे.
                    मध्यंतरी शाळेत जाण्याचा प्रसंग आला. मन विषण्ण झाले. आमच्या शाळेचे वैभव असलेली बाग, ‘संगीत- शिवण -होमसायन्स -ड्रांईंग हॉल; डबल बार, सिंगल बार इत्यादी खेळाची साधने; व्हॉलीबॉल तसेच खोखोचे मैदान ह्या गोष्टी अदृश्य कश्या झाल्या? मुख्य म्हणजे ब्रिटीशकालीन वारसा लाभलेला, आमच्या व्यक्तिमत्वाचा  अविभाज्य भाग असलेला, सेंट्रल हॉल कुठे गेला? काळाच्या ओघांत शाळेचे रुप बदलले. परंतु आमचे शिक्षक सेवानिवृत्तिनंतरही शाळेत येऊन ज्ञानदानाचे काम करीत आहेत, हे पाहून मन नतमस्तक झाले.
                                जिना चढून गेले तर शेलारबाईंनी प्रथम स्वागत केले. सेवा निवृत्तीनंतरही शेलारबाई विद्यार्थिनींचे नुकसान होऊ नये म्हणून शाळेत गणित-शास्त्र पूर्वीच्याच उत्साहाने शिकवीत होत्या. शाळेत झालेल्या गप्पांमधून समजले वैद्य बाई, गीतेबाईंची आई - अंजना वाघ बाई, सेवानिवृत्त मुख्याध्यापिका म. . पा. शाळा क्र. ११ (१९८२ साली आदर्श शिक्षिका - धर्माधिकारी पुरस्काराने सन्मानित) ह्यांच्या सारखे अनेक शिक्षक सेवानिवृत्तिनंतर शाळेत शिकविण्यास येत आहेत.
                             आमची ग. . ही सरकारी शाळा असताना, शिक्षकांची वानवा का? सरकारी शाळा असल्यामुळे, आमच्या शाळेला निधीची कमतरता कधीच भासली नाही. २०व्या शतकांत प्रशिक्षित शिक्षकांसहित, शाळेचे रुप सदैव अत्याधुनिक होते. त्या काळात शाळेसाठी देणगी किंवा पालक सभाह्या गोष्टींचा जन्म झाला नव्हता. शाळेची फी इयत्ता ५वीला नाममात्र रुपये ५/= होती. दरवर्षी आठ आणे फी (५० पैसे) फी वाढायची. शिक्षकांच्या पाल्यांना फी माफ नव्हती. आमचे शिक्षक एक पैसा ही जास्त न घेता शनिवार-रविवार तसेच इतर वारी जास्त वेळ शिकवायचे. कोणतीही फी न आकरता, आमची स्कॉलरशिपटिळक-महाराष्ट्र विद्यापीठ(गणित, इंग्रजी), हिंदी विशारद तसेच ड्रॉईंगच्या परिक्षांची तयारी करुन घेत असत. . . हायस्कूलचा ह्या परिक्षांमधील निकाल अत्युत्तम लागायचा. शाळा बाह्य विश्वातील ह्या विविध परिक्षांमुळे आम्हा विद्यार्थिनींचे गणित तसेच इंग्रजी  व्याकरण खूप पक्के झाले.
                              आमच्या शाळेत अभ्यासाबरोबर खेळ, नाट्य, संगीत,  शिवण इत्यादी क्षेत्रातील गुणी विद्यार्थिनींना खूप प्रोत्साहन नेहमी मिळत असे.
१९७५साली महाराष्ट्र बोर्डाची शेवटची ११वी मॅट्रिकची परिक्षा झाली. ११वी मॅट्रिकच्या विद्यार्थ्यांना  ‘गणितविषय सोडून मॅट्रिक पास होण्याची सवलत होती. गणितात कच्च्या असणाऱ्या मुलींना गणित विषय मिळाला नाही की, दरवर्षी शाळेत थोडा गोंधळ व्हायचा. काही पालक आपल्या मुलींना दुसऱ्या शाळेत किंवा दुसऱ्या गावी पाठवून मॅट्रिक करवून घ्यायचे. काही विद्यार्थिनी धुसफुसत गणित विषय सोडून, मॅट्रिक परिक्षा पास व्हायच्या. कला शाखेत जाऊन B.A. करणाऱ्या ह्या मुलींना पुढील जीवनांत  नोकरीचे दरवाजे बंद व्हायचे. गणिताविना भविष्यातील अंधकाराच्या भितीने ह्या मुली बिथरायच्या. एकदा ह्या सर्व परिस्थितीचा उद्रेक झाला. चिडलेल्या काही विद्यार्थिनींनी वर्गातील शिक्षकांच्या टेबल खुर्चीला खाज-कुइली लावली होती. शिस्तप्रिय शाळेच्या इतिहासाने एक कटू प्रसंग अनुभविला.
                      १९८०पर्यंत नाशिकमधील शिक्षणक्षेत्रांत अग्रगण्य असलेल्या ग. . शाळेतील विद्यार्थिनींचे आई-वडील सुशिक्षित सुस्थापित मध्यमवर्गातील होते.   ह्या पालकांमध्ये आपल्या मुलींना स्वतःच्या पायावर उभे करण्याची कुवत होती.
                                 २१व्या शतकात ग. . तसेच इतर मराठी माध्यमाच्या शाळांचे चित्र बदलेले आहे. ह्या शाळांमध्ये  येणाऱ्या विद्यार्थिनींचे पालक पोटाला चिमटा देवून आपल्या कन्येचे भविष्य घडत आहेत. शिक्षणाचा गंध नसणाऱ्या पालक पिढीला गणिताचे भविष्यातील महत्त्व कळणार नाही. शाळेत पुरेसे शिक्षक नसल्याने विद्यार्थी जीवनाचे कधीही भरुन न निघणारे नुकसान होत आहे. गणिताचा बागुलबुवा  दूर झाल्यास, सध्याचा विद्यार्थी सहज पदवीधारक होईल. अशा प्रकारे प्राप्त झालेली पदवी स्वतःचे पोट भरु शकत नाही, हे समजल्यावर वेळ हातातून निघून गेलेली असेल. त्यावेळी बेकार असलेल्या तरुणाईचा उद्रेक झाल्यास,समाज धुरिणांचे हताश उद्गार (कविवर्य बा भ बोरकरांच्या शब्दसामर्थ्याचा आधार) ऐकावयास मिळतील   
उभ्या जगाचे अश्रू  पुसाया
जरी आपुले हात उणे
तरी समुद्रायणी प्रमाणे
पोसू तटिची म्लान तृणे
हे भीषण भविष्य टाळण्यासाठी आमच्या ग. .हायस्कूल, नाशिक  सारख्या सर्व मराठी माध्यमाच्या शाळांना समाजाने तसेच सरकारने गतवैभव प्राप्त करुन द्यावे.     प्रशिक्षित गुरुजनांद्वारे ह्या शाळांचा विद्यार्थी घडविल्यास, तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण-गंगा पोहोचेल.
सर्व शिक्षण अभियानाद्वारे भावी पिढ्यांच्या शिक्षणातील 3G  (गणिताची गणिती गरज) भागवावी, ही न्याय-देवतेला प्रार्थना.
अनुप्रभा नाशिक


संदर्भ :-
दिव्यमराठी बातमी दिनांक २० ज़ून २०१७ (पान क्रमांक ७, नासिक सिटी)

लोकसत्ता :- दिनांक २१ जून २०१७
कविवर्य बा. . बोरकर यांच्याकांचनसंध्याकवितेतील चौथे  कडवे
उभ्या जगाचे अश्रू  पुसाया
जरी आपुले हात उणे
तरी समुद्रायणी प्रमाणे
पोसू तटिची म्लान तृणे
* भुक्कड = निरुद्योगी बुभुक्षित (भुकेला हपापलेला गरजू )

Saturday, 17 June 2017

मायबोलीचे भुक्कड ३ :-

                               स्वातंत्र्य मिळून इतकी वर्षे झाली, पण इंग्लिश भाषेचा आपल्या मनावरील पगडा दूर झालेला दिसत नाही. पालक गरीब असो अथवा श्रीमंत’, आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या भारी(?)शाळेत घालण्यात, न्यता मानताना दिसतो.
                              २०व्या शतकांत स्वातंत्र्योत्तर काळांत, मराठी माध्यमात शिकलेली पिढी आजच्या संगणक युगात कुठेही कमी पडताना दिसत नाही.
                              स्वातंत्र्यपूर्व काळात जन्माला आमची पिढी एकत्र कुटुंबपद्धतीत वाढली. घरात कमीत-कमी ४-५ भावंडे, आजी आजोबा, घरातील मुलांमध्ये शिकणारा एखादा काका किंवा लग्नाळू आत्या. मिळवता एकटा पुरुष. त्याला पगार १५०-२०० रुपये महिना. त्यावेळी भ्रष्टाचार, लाचलूचपत, घोटाळे ह्याचे फारसे अस्तित्व नव्हते. वडिलांची हयात पैसे मिळविण्यात व आईचा जन्म धुणे, भांडी, स्वयंपाक करण्यात संपायचा.
                                दुसरे महायुद्ध संपले, तरी त्याचे परिणाम समाजावर होत होते. साखर, रॉकेल रेशन दुकानातून मिळत असे, परंतु तेही अपुरे. मुलाचे तसेच मुलीचे नाव शाळेत घालताना प्रवेश फी, डोनेशन हा प्रकार नव्हता. मोठ्या मुलाला नवीन पुस्तके मिळत असत. वर्तमानपत्राच्या कागदाचे कव्हर. पुस्तके व्यवस्थित वापरावी लागत. लागोपाठ भावंडे असल्याने, धाकटी भावंडे तीच पुस्तके वापरीत असत. भ्यासक्रमात फार बदल होत नसे. एखाद्याच विषयाचे पुस्तक बदलत असे. सबं पेन्सिल कधीच मिळत नसे, एका पेन्सिलचे दोन तुकडे. दोन भावंडांत कंपास पेटी एकच. ज्याचा तास असेल त्याने वापरायची. दुसऱ्याने तासाला तीच कंपासपेटी घेऊन यायची. एकाच छत्रीतून २ भावंडांनी जायचे. पायात चप्पल असली तर असली, नाहीतर तसेच शाळेत जायचे. त्यावाचून काही अडत नसे. दप्तर म्हणजे घरातील त्यातल्या त्यात बरी पिशवी. जेवणाचा डबा घरातील एखादा असावयाचा. डब्यात पोळी / भाकरी - भाजी किंवा लोणचे- पोळी. आजच्या सारखे सॉस किंवा जॅम प्रकार नसावयाचे. शाळेतून कोणतीही तक्रार येता कामा नये, ही आई - वडिलांची ताकीद. पास झालात तर शिक्षण चालू. नापास झाला तर शिक्षण बंद. प्रत्येक कुटुंबात मुलगा असो अथवा मुलगी असो शिक्षणाच्या बाबतीत एकच नियम. सर्वसामान्य माणसाचे जीवन शिस्तबद्ध असल्याने शिक्षणाचे खरे मूल्य कळाले.
                                 हल्लीच्या काळातील शिक्षणावर खर्च होणारे मूल्य (द्रव्य) पाहिल्यावर; मनात विचार येतो, ‘बरे झाले, आपण स्वातंत्र्यपूर्व काळांत जन्माला आलो नाहीतर आजच्या युगात आपण अंगठेबहाद्दर राहिलो असतो.’
                               जितकी महागडी पॉश शाळा म्हणजे उत्तम शिक्षण हे आजचे २१व्या शतकांतील समीकरण(?) मोठ्या उत्साहात पहिली १-२ वर्षे आई-वडील पोटाला चिमटा देऊन; शाळेचा गणवेश, फी, स्कूल बस किंवा रिक्क्षा वगैरे खर्च करतात. महागड्या शाळातील शिक्षण खरोखरचलय भारीअसत का?                                     ‘ह्या महागड्या शाळांचा खर्च पालकांना झेपत नाही तसेच इंग्रजी भाषेतील शिक्षण मुलांना पेलवत  नाही’, अशा कचाट्यात सापडलेले पालक मुलांची अॅडमिशन परत घराजवळच्या स्वस्त मराठी शाळेत घेतात. -२ वर्षे पॉश शाळेत वावरलेली मुले स्वाभाविकच जनता क्लासच्या शाळेत शिकायला नाराज असतात.
                                 इंग्रजी शाळेत वाढलेले हे छोटेसे रोपटे मराठी शाळेत कसे रुजणार ? मराठी भाषेशी इतके दिवस संपर्क नसल्याने, मराठीतील शिक्षण ह्या मुलांना समजत नाही. बाल-मानसशास्त्र जपणारी हल्लीची शिक्षणपद्धती विद्यार्थ्याला १०वी पर्यंत आरामात घेऊन जाते. १०वीतील ही मुले मराठी भाषेत १० वाक्य लिहू शकत नाहीत मग इंग्रजी येण्याची गोष्ट दूरच राहिली.
                                    ह्या मुलांच्या व त्यांच्या आई वडिलांना पिढीला  ‘वर्तमानपत्रम्हटले तर कळत नाही पण पेपरम्हटले की बरोबर समजते. बारसे, नामकरणविधी वगैरे कार्यक्रम त्यांना माहित नसतात.   Birth-Day माहिती  असतो. बर्थ-डे न म्हणता बड्-डे म्हणतात. केक कापतात. निरांजनानी ओवाळणे, माहिती नसते. एकंदरीत आपल्या संस्कृतीचा विसर पडलेला दिसतो.
                                       नवीन पिढीला श्राद्ध हा प्रकार माहित नसावा. एका ठिकाणी आजी आणि नातीचा संवाद चालला होता. माझी भूमिका श्रोत्याची होती. आजीने नातीला विचारले, “काय  ग, आज तुझी ती संगीता मैत्रिण आली नाही?” नातीने उत्तर दिले, “आजी, आज संगीताचे ग्रॅण्डफादर (आजोबा) मरण पावले म्हणून त्यांचा बर्थ-डे होता. त्यामुळे ती आली नाही.” आजी व मी खूप हंसलो. आजीने तिला समजावून सांगितले (कारण तिची आजी शिक्षिका होती), “अग बर्थ-डेम्हणायचे नाही. ‘श्राद्धम्हणावयाचे.” श्राद्ध म्हणजे काय? हे आजीने नातीला थोडक्यात सांगितले.
                                भाषा बोलण्यावरुन ती व्यक्ति कोणत्या संस्कारात वाढलेली आहे, ह्याची जाणीव होते. शब्द उच्चारण्याची पद्धत, शब्दसंपत्ती, कोणत्या शब्दांवर केव्हा जोर द्यावा- केव्हा नाही, आवाजातील सोज्वळता, शब्दांची लयबद्धता ह्या सर्व गोष्टींचा समावेश भाषा संस्कारात होतो.
                                 कोणतीही भाषा ही व्यक्ति- स्थल- काल तसेच सामाजिक परिस्थिती ह्यांवर अवलंबून असते. ‘भाषा ५ कोसांवर बदलते’, असे म्हणतात. आपली मराठी भाषा कोकणात कोकणीअसते तर सांगली सातारचा ठसकापुणे-मुंबई मराठीपेक्षा वेगळा असतो. कानडी हेल काढत बेळगावी मराठीमायबोलीची अस्मिता जपताना दिसते. हीच मराठी भाषा जळगाव खानदेशात अहिराणीरुप धारण करते तर नागपूर विदर्भात ती अस्सल वऱ्हाडीहोते. नाशिक जवळील सापुतारा-वघईच्या जंगलात गुजराथीचा पदर धारण केलेली मराठी भाषा डांगीभाषेत प्रकट होते. तंजावरची मराठी शिवकालीन मराठीच्या अस्तित्व खुणाजपताना आढळते.
                           मराठी शब्दांना जपानी भाषेतील प्रतिशब्द लिहा, हीच मायबोली जपानी भाषेत लिलया बोलू शकते. ह्याचे कारण आपले बुद्ध भिक्क्षु बौद्ध  ‘अहिंसा परमो र्मः।ह्या तत्वाचा प्रसार करण्यासाठी चीन-जपान ब्रह्मदेश ह्या देशात गेले. ह्या बैद्ध भिक्क्षुंच्या तत्वज्ञानाबरोबर, भारतीय व्याकरण जपानला पोहोचले. जपानी व मराठी भाषेचे व्याकरण समान असल्याने, मराठी माणसाला जपानी भाषा शिकणे सुल होते
                             संस्कृत व प्राकृत भाषेच्या मिलाफातून तयार झालेली मराठी भाषा स्वतःचा प्रादेशिक गोडवा जपताना दिसते. जाण्याची अनुमती देताना मराठी भाषा जावा कीची सोलापूरी चादर पांघरवीते. ‘उद्या सकाळी पहाट जाऊ याम्हणणारी मराठी मराठवाड्यात सकाळी १०वाजता निघते’. (आरामात जगायला शिकविणारी मराठवाड्याची मराठी भाषा 'बोले तैसा चाले' ह्या उक्तीचा अनुभव देते. मध्यंतरी काही महिने मराठवाड्यात रहाण्याचा योग आला. सकाळी घरी दुधाचा रतीब घालणाऱ्या आजीबाईंनी पहिल्याच दिवशी मला सांगितले, "ज्या दिवशी तुमची दुधाविषयी तक्रार येईल, त्या दिवसापासून माझे दुध बंद होईल." मराठ्वाड्यातील मुक्कामांत दररोज भाकरी एवढी जाड साय आम्हाला आजीबाईंच्या दुधावर रोज मिळत होती.) ह्या निघालेल्या व्यक्तीचे वर्णन करताना येऊन राहिलायम्हणत नासिकला क्षणभर हीच मराठी थबकविते. परक्या व्यक्तीला वाटते सकाळी निघालेली व्यक्ती येता-येता निघण्याच्या ठिकाणी राहून गेली, परंतु नाशिककर मराठीला व्यक्ती प्रवासात असून, येत आहे;’ हा अर्थ अभिप्रेत असतो.
                        जग झपाट्याने बदलत चालले आहे. समाजातील स्थल - काल परिस्थितीनुसार अंतर्गत व बाह्य वातावरणाच्या परिणाम होऊन, भाषाही बदलत चाललेली आहे. हे सर्व बदल आत्मसात करण्यास आपली मायबोली समर्थ आहे. माय मराठीत अॅपल’, ‘मॅंगोहे उच्चार लिहिण्याची क्षमता असताना; लेफ्ट साईड, राइट साईड, थॅन्क्यु, प्लिज ह्या शब्दांची पेरणी कशासाठी? अर्थवाही सुटसुटीत परकीय शब्द माय-मराठीने नेहमीच सामावून घेतले आहेत. मराठी भाषांतराचा अतिरेकही मजेशीर विनोद निर्माण करु शकतो. ह्या विनोदाचे वर्णन करताना दिलेलेले उदाहरण :-
 ‘रेल्वे सिग्नलह्या इंग्रजी शब्दाचे आचार्य अत्रेंनी  मायबोलीत केलेले भाषांतर अग्निरथ गमनागमनी दर्शक पट्टिका
                                मराठी भाषाही स्पष्ट बोलणारी असली तरी दुराग्रही कधीच नव्हतीभाषा बोलताना प्रत्येक व्यक्तीने काळजी घ्यावयास हवी. शब्दाचा उच्चार स्पष्ट असावा. योग्य शब्दांचा वापर करावा. शब्दांवर योग्य ठिकाणी जोर देऊन बोलण्यात लयबद्धता साता येते. लोकांना भाषा ऐकाविशी वाटते. भाषेतून जसे  विचार व्यक्त करता येतात तसेच दुसऱ्याच्या भावनाही जपता येतात. इतर भाषांचा आदर करणारी भाषा, व्यक्ति-व्यक्तिंमध्ये सुसंवाद साधू शकते.
                             ऑफिसमध्ये बोलण्याची भाषा, सहकाऱ्यांशी बोलण्याची भाषा, वरिष्ठांशी बोलण्याची भाषा, कनिष्ठांशी बोलण्याची भाषा, तारतम्य राखून वापरावी लागते.
                                 कुटुंबात बोलण्याची भाषा, नातेसंबंधात बोलण्याची भाषा, लहानमंडळींशी बोलण्याची भाषा, शेजाऱ्याशी बोलण्याची भाषा, समाजात बोलण्याची भाषा स्थल - काल प्रसंगानुसार बदलावी लागते.
                              भाषेचे हे संस्कार आमच्या लहानपणी आई-आजीच्या पिढीकडून न-कळत होत होते. शाळेचे तोंडही न पाहिलेली ही पिढी, -३ वाक्यांनंतर म्हणींचा वापर अर्थ समजून करायची. त्यांच्या म्हणींच्या खजिन्यातून आमच्या पिढीला बालपणी व्यावहारिक ज्ञान न कळत मिळत गेले.
                                  इंग्लिश माध्यम शिक्षित माय-लेकरांचा सुसंवाद ऐकल्यावर मी कपाळाला हात लावला. इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या  चिरंजीवांनी आईला विचारले, “आई, अंथरुण पाहून पाय पसरावे म्हणजे काय ग?” मातोश्री म्हणाल्या, “हे अंथरुण आहे, तेवढेच आपले हात-पाय लांब करुन झोपायचे.” ‘आपल्या ऐपतीप्रमाणे खर्च करावाहा गभितार्थ मातेलाच माहिती नाही तर मुलाला कोठून समजणार
                              कविवर्य बा. . बोरकरांच्या शब्दसामर्थ्याच्या आधारातून उद्याचा आशावाद (भुक्कड* )व्यक्त करताना म्हणावेसे वाटते,
सले मनाची विसरुन सगळी
              ले मराठीस जिव्ही शिकवू
शिशुहृदयात पुन्हा एकदा
                या मायबोलीचे प्रेम रुजवू
क्रमशः
अनुप्रभा, नाशिक

संदर्भ:-
कविवर्य बा. . बोरकर यांच्याकांचनसंध्याकवितेतील  तिसरे कडवे
सले कालची विसरुन सगळी
                    ले जमेचे जिवी स्मरु
शिशुहृदयाने पुन्हा एकदा
                      या जगतावर प्रेम करु

* भुक्कड = निरुद्योगी बुभुक्षित (भुकेला हपापलेला गरजू )