Sunday, 5 March 2017

चिठ्यांचा खेळ

चिठ्यांची नाही झाली, अदलाबदल  ।
तिच्या जीवनी आली, सर्वत्र दलदल  ॥

त्या दलदलीतून मिळविले, तिने आरक्षण  ।
आरक्षणाने खरेच होईल का ? तिचे रक्षण  ॥

आरक्षणे न ठरावे, तिचे स्वरुप अबला  ।
स्व-जाणिवेतून सिद्ध व्हावी, ती सबला  ॥

आंदोलने मिळविला, तिने मंदिर प्रवेश ।
स्त्रीमुक्तीचा भासला, तिथे निव्वळ आवेश॥

स्त्रीमुक्तीचा पाया रचिला, फुले सावित्रीने ।
पिडीत स्त्रियांना आधारिले, सिंधू सपकाळने ॥

 निवडणुकीतुन  प्रकटावे, तिने इंदिरा गांधी ।
तयासाठी हटवावी लागेल, गुंडांची  ऑंधी ॥

चिठ्यांचा खेळ संपताना, व्हावी मात  ।
प्रगतिपथास लागते, परस्परांची साथ  ॥
                          ---- अनुप्रभा नाशिक
                 www.shrigurucharitra.com

संदर्भ :-
 आदरणीय अमृता प्रीतम ह्यांची 'बोला व ऐका' अशा चिठ्यांच्या खेळाची अप्रतिम हिंदी कविता.
  

No comments:

Post a Comment