Saturday, 3 December 2016

अर्थक्रांती-अष्टपदी

घोषणाबाजी देशांत चाले,
देश हितास आली भरती
गंभीरपणे नरेन्द्र बोले,
‘आली क्रांती - गेली भ्रांती’

नरेन्द्रास ह्या झाली घाई,
विसाव्यात न मिळे शांती;
त्याचे म्हणणे ध्यानी येई -
‘आली क्रांती - गेली भ्रांती’

कर भरणे, तत्पर ज्यांचे
कर भरुन मिळे, अर्थगती
नरेन्द्र बोले, आपुल्या साचे -
‘आली क्रांती - गेली भ्रांती’

काळ्या धनास जे कवटाळती
त्यांची होईल तुरुंग - भरती
मतदार राजा, ऐक - गाणे गाती
‘आली क्रांती - गेली भ्रांती’

सुर्वणसाठ्यास मनुज लपविसी
आयकराची वक्रदृष्टीस पडती ;
कर भरुन जर, हे सावध रहासी
‘आली क्रांती - गेली भ्रांती’ 

सुवर्ण संचयीचा नियम झाला
विवाहितेस मिळे, ५० तोळा;
अविवाहितेवर अन्याय जाहला
असावे, तिचे सुवर्ण २५ तोळा;
दस नंबरी नर, ओटीवर* बोलती -
 ‘आली क्रांती - गेली भ्रांती’

कौतुक भारी वाटे लोकां
श्रद्धेचा दाखविण्या दिमाखा,
देवदारी दिसे धन सुवर्णाची होरी*
ह्या होराने भरेल सरकारी तिजोरी;
मानसी ऐसे मतदार राजा, वदती -
‘आली क्रांती - गेली भ्रांती’

जीवन जर सौख्यात जावया
व्हावे पश्चाताप न उरुनिया;
तर मतदारा, क्रांतीस वाटते -
 ध्यानी सतत आपुल्या चिंती
नरेन्द्र हे जे अविरत  वदते -
‘आली क्रांती - गेली भ्रांती’

{होर* = वाहून आलेला गाळ,
 ओटी*= सोपा, घराची ओसरी }

कवितेला सौंदर्यवादी,  स्वच्छंद व मुक्त रुप देणारे आधुनिक मराठी कवितेचे जनक कवी केशवसुत (कै. कृष्णाजी केशव दामले) यांच्या  ‘घड्याळ’  कवितेवर आधारित (आमच्या शालेय - जीवन आठवणीतील कविता -‘घड्याळ’ )
                         विडंबन काव्य  : ‘अर्थक्रांती-अष्टपदी’
------ अनुप्रभा, नासिक
संदर्भ :-
कवी केशवसुत

कवी गिरीश

No comments:

Post a Comment