निवडणूक १५ ऑक्टोबर, वार बुधवार
रिंगणात उतरले, तऱ्हेतऱ्हेचे उमेदवार
काही उमेदवार आहेत, सक्षम जबाबदार
पण पुष्कळ आहेत, नादान बेजबाबदार
स्वार्थांध सत्तांध जनांचा भरला, बाजार
मतासाठी लाचार होऊन ठोठावतात, दार
परस्परांची खिल्ली उडवत करतात, वार
भाषणातून त्यांच्या वाणीला येते, धार
मतदारांनो जागृत राहून करा, मतदान
दानात दान सर्वश्रेष्ठ आहे, मतदान
मी आहे, स्वतंत्र भारताची मतदार
हात जोडून विनविते, हाकला भ्रष्टाचार
योग्य उमेदवार योग्य मत, हाच हक्क
सत्याला मतदान जग होईल, थक्क
अनुराधा आठवले (घाणेकर)
उद्योजिका
www.shrigurucharitra.com

No comments:
Post a Comment